वैद्यकशास्त्रासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरीच्या कॅटलिन कारिको आणि अमेरिकेचे ड्र्यू वेसमन यांना जाहीर झाला आहे. करोना प्रतिबंधक ‘मेसेंजर रिबोन्यूक्लिक ॲसिड’ (एमआरएनए) लशींच्या विकासासाठी केलेल्या संशोधनाबद्दल या वैद्यकीय संशोधकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या दोघांना हा पुरस्कार जाहीर करण्यामागचे कारण आणि एमआरएनए लस म्हणजे काय याचा आढावा.

‘एमआरएनए’ लस काय आहे? करोनाकाळात त्या महत्त्वपूर्ण का ठरल्या?

मानवी शरीरात मृत किंवा कमकुवत विषाणूच्या आधारे साधारणपणे लस तयार केली जाते. त्यामुळे ती या विषाणूंविरोधात प्रतिपिंडे तयार करू शकतात. वास्तविक विषाणू एखाद्याला संक्रमित करतो, तेव्हा त्याचे शरीर या विषाणूविरोधात लढण्यासाठी तयार होते. जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तसतसे संपूर्ण विषाणूऐवजी व्हायरल आनुवंशिक कोडचा फक्त एक भाग लशींसाठी वापरला जाऊ लागला. शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची लस विकसित केली, जी वास्तविक लशीमध्ये मृत किंवा कमकुवत विषाणूच्या भागाऐवजी मेसेंजर आरएनए (एमआरएनए) नावाचा रेणू वापरते. मेसेंजर आरएनए हा एक प्रकारचा आरएनए (रिबोन्यूक्लिक ॲसिड) आहे, जो प्रथिने उत्पादनासाठी आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान १९८० च्या दशकापासून ओळखले जात होते, परंतु व्यवहार्य प्रमाणात लस तयार करण्यासाठी पुरेसे परिपूर्ण झाले नव्हते. मुळात रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय करण्यासाठी शरीरात निष्क्रिय विषाणूंऐवजी या तंत्रज्ञानाचा वापर करून लस रोकप्रतिकारक यंत्रणेला संदेश देण्यासाठी ‘मेसेंजर आरएनए’चा वापर करतात. मेसेंजर आरएनए हे विशिष्ट विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक प्रथिने तयार करण्यासाठी पेशींना निर्देश देऊ शकते. आरएनए हे आधीच पेशींमध्ये अस्तित्वात असतात.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

हेही वाचा – विश्लेषणः गुगलसाठी भारतात क्रोमबुक लॅपटॉपचे उत्पादन करणे का महत्त्वाचे?

कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांनी काय केले?

एमआरएनए तंत्रज्ञान याआधी विकसित झाले असले तरी लस तयार करण्यासाठी ते पुरेसे परिपूर्ण नव्हते. कारिको आणि वेसमन या दोन्ही शास्त्रज्ञांनी न्यूक्लयोसाइड बेस मॉडिफिकेशन विकसित केले. जे प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या ‘एमआरएनए’विरोधात प्रक्षोभक हल्ला सुरू करण्यापासून रोगप्रतिकारक प्रणालीला रोखतात. यापूर्वी ‘एमआरएनए’विरोधात विषाणूंचा हल्ला रोखणे हा या तंत्रज्ञानाच्या वापरातील मोठा अडथळा होता. शरीरातील ‘एमआरएनए’चे कार्य डीएनएपासून पेशींना विशिष्ट सूचना वितरित करण्यास मदत करणे आहे. या प्रतिपिंडामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती विषाणूशी लढा देण्यास सज्ज होते आणि करोनाबाधिताच्या शरीरात प्रवेश केल्यास करोनाला निष्प्रभ करण्यास मदत करते. पेशींनी शरीरात प्रथिने तयार केल्यानंतर शरीर एमआरएनएपासून मुक्त होते. या दोन्ही शास्त्रज्ञांचे एमआरएनए तंत्रज्ञानावरील लशींचे काम आधीच सुरू होते. मात्र करोनाकाळात लशीसाठी प्रयत्न सुरू झाल्यानंतर हे तंत्रज्ञान खरोखर उपयुक्त ठरले.

एमआरएनए लशीचा करोनाकाळात कसा फायदा झाला?

करोनाच्या प्रादुर्भावादरम्यान प्राणघातक आणि वेगाने पसरणाऱ्या विषाणूविरोधात अस्त्र शोधण्यात वेळ महत्त्वाचा होता. त्या वेळी एमआरएनए तंत्रज्ञान निर्णायक ठरले. कारिको आणि वेसमन यांच्या संशोधनानंतर मॉडेर्ना आणि फायझर यांनी लस तयार करताना हे तंत्रज्ञान वापरले. ‘बायाे एन टेक’ने जूनमध्ये जाहीर केले की, प्रमुख औषधनिर्मिती कंपनी ‘फायझर’सह विकसित केलेल्या ‘एमआरएनए’ लशीची मात्रा जगभरातील सुमारे दीड अब्ज नागरिकांना देण्यात आली. करोनाचे गंभीर परिणाम रोखण्यास या लशीची मदत झाली आणि लाखो नागरिकांचे जीव वाचले. युरोपियन औषध संस्थेने (ईएमए) २०२३च्या सुरुवातीला व्यक्त केलेल्या अंदाजानुसार करोना महासाथीच्या पहिल्या वर्षात या करोना प्रतिबंधक लशींनी जागतिक स्तरावर सुमारे दोन कोटी नागरिकांचे जीव वाचविण्यास मोलाची भूमिका बजावली आहे. पाश्चात्त्य देशांत एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो एन टेक’ आणि ‘फायझर’ने विकसित केलेल्या लशींच्या मात्रा व्यापक प्रमाणात वापरण्यात आल्या. करोनाकाळात विस्कळीत झालेल्या जगाला आणि टाळेबंदीत अडकलेल्या समाजाला आपले व्यवहार पूर्ववत करण्यास या लशींमुळे मोलाची मदत झाली.

हेही वाचा – बिहारच्या जातनिहाय सर्वेक्षणातून नव्या राष्ट्रीय राजकारणाची नांदी?

नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांविषयी…

कॅटालिन करिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीतील स्झोलनोक येथे झाला. सेगेड विद्यापीठातून त्यांनी १९८२ मध्ये पीएचडी केली. हंगेरियन अकादमी ऑफ सायन्समधून १९८५ मध्ये त्यांनी पोस्टडॉक्टरल फेलोशिप मिळविली. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी १९८९ मध्ये नियुक्ती झाली. २०१३ पर्यंत त्या या विद्यापीठात कार्यरत होत्या. २०२२ पर्यंत त्या ‘बायो एन टेक’ या जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ‘आरएनए प्रोटिन रिप्लेसमेंट’ विभागाच्या प्रमुख होत्या आणि तेव्हापासून त्यांनी कंपनीचे सल्लागार म्हणूनही काम सांभाळले. सध्या त्या हंगेरीतील सेगेड विद्यापीठात प्राध्यापिका असून पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या ‘पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिन’मध्ये सहयोगी प्राध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

वेसमन यांचा जन्म अमेरिकेतील लेक्सिंग्टन येथे १९५९ मध्ये झाला. १९८७ मध्ये बोस्टन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. सध्या ते ‘पेरेलमन स्कूल’मध्ये लस संशोधन विभागाचे प्राध्यापक आहेत. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातच त्यांची कारिको यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनतर दोघांनी एकत्र मिळून संशोधन केले.