Teflon Flu जसजशी आपली जीवनशैली बदलत आहे, तसतसे आपले राहणीमान, खानपान सर्वच बदलत चाललं आहे. काळानुरूप आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतींमध्येही खूप बदल झाला आहे. पूर्वी चुलीवर तयार होणारा स्वयंपाक आज गॅस आणि मायक्रोवेव्हमध्ये तयार होतोय आणि मातीच्या भाड्यांची जागाही नॉन-स्टिक भांड्यांनी घेतली आहे. या सर्व वस्तू आयुष्याला सुकर करत असल्या, तरी आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. आपल्या स्वयंपाकघरातील नॉन-स्टिक भांड्यांमुळे जीवघेणा आजार पसरत असल्याची माहिती, एका संशोधनातून समोर आली आहे.

अमेरिकेत तर या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी यूएस पॉईझन सेंटर्समध्ये पॉलिमर फ्यूम नावाने ओळखल्या जाणार्‍या टेफ्लॉन फ्लूची २६७ संशयित प्रकरणे आढळून आली. तापलेल्या नॉन-स्टिक पॅनमधून निघणारा धूर श्वासाद्वारे शरीराच्या आत घेतल्याने हा आजार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. टेफ्लॉन फ्लू आजार नक्की काय आहे? हा आजार शरीरासाठी किती घातक? याची लक्षणे आणि उपाय काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात

हेही वाचा : आयटी कर्मचार्‍यांच्या कामाची वेळ दिवसाला १४ आणि आठवड्याला ७० तास करण्याचा प्रस्ताव; इतके तास काम केल्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

‘टेफ्लॉन फ्लू’ नक्की आहे तरी काय?

नॉन-स्टिक भांड्यांवर टेफ्लॉनचे कोटिंग असते. टेफ्लॉन हे एक प्रकारचे कृत्रिम रसायन आहे. हे रसायन कार्बन आणि फ्लोरिनपासून तयार झालेले आहे; ज्याला पॉलीटेट्राफ्लुरोइथिलीन (PTFE) म्हणतात. नॉन-स्टिक भांड्यांवर पॉली-फ्लुरोआल्काइलचा (PFAS) थर असतो. हे रसायन पर्यावरण आणि मानवी शरीरासाठी अतिशय घातक मानले जाते, याचे विघटन होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जेव्हा पॉलीटेट्राफ्लुरोइथिलीनने कोट असलेले भांडे ५०० फॅरेनहाइट (२६० अंश सेल्सिअस) पेक्षा जास्त तापवले जाते, तेव्हा भांड्यांची कोटिंग निघण्यास सुरुवात होते. त्यानंतर भांड्यातून विषारी धूर आणि कण बाहेर पडतात; ज्यामुळे ‘टेफ्लॉन फ्लू’ हा आजार होऊ शकतो.

तापलेल्या नॉन-स्टिक पॅनमधून निघणारा धूर श्वासाद्वारे शरीराच्या आत घेतल्याने हा आजार होत असल्याचे सांगण्यात आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील रसायनशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक झॅकरी हडसन यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, “ते ऑक्सिडायझ्ड, फ्लोरिनेटेड पदार्थांचे एक घातक मिश्रण असते आणि म्हणूनच तुम्हाला सांगितले जाते की, स्वयंपाकघरातील टेफ्लॉन भांडी उच्च तापमानात गरम करू नका.” एका जर्मन अभ्यासात असे दिसून आले आहे की, रिकामे नॉन-स्टिक पॅन ३० मिनिटे गरम केल्याने उच्च तापमानात पॉली-फ्लुरोआल्काइलचे उत्सर्जन वाढते. या रसायनाने कर्करोग, वंध्यत्व आणि गर्भधारणेच्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

‘डेली मेल’च्या वृत्तात जागतिक बाजारपेठ नॉन-स्टिक पॅनच्या वाढत्या लोकप्रियतेविषयी सांगण्यात आले आहे; ज्यामुळे या आजाराचा धोका आणखी वाढू शकतो. जागतिक बाजारपेठेत २०१० मध्ये नॉन-स्टिक पॅनचे मूल्यांकन १.३ बिलियन डॉलर्स होते, जे २०१७ मध्ये १.७ बिलियन डॉलर्सवर पोहोचले. ही आकडेवारी सूचित करते की, जितके अधिक ग्राहक हे पॅन विकत घेतात, तसतसे त्यांच्या संभाव्य जोखमींबद्दल जागरूकता अधिक महत्त्वाची ठरते.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

टेफ्लॉन फ्लूची लक्षणे सामान्यत: त्याची लागण झाल्याच्या काही तासांतच दिसून येतात. कधीकधी त्यासाठी २४ तासांचा कलावधीही लागू शकतो. त्यात थंडी वाजून येणे, खोकला, छातीत दाटणे, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, अस्वस्थता, मळमळ, उलट्या, स्नायू आणि सांधेदुखी यांसह अनेक लक्षणे दिसून येतात, असे फरीदाबाद येथील मारेंगो एशिया हॉस्पिटल्समधील अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संतोष कुमार अग्रवाल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

सुदैवाने, बहुतांश व्यक्ती काही दिवसांत पूर्णपणे बरे होतात. मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व यांसारखे गंभीर परिणाम अत्यंत दुर्मीळ असतात. परंतु, या आजराची ओळख लगेच होत नाही, कारण या आजाराची लागण झाल्यास सर्दी आणि ताप येतो. त्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. सरकारी डेटा सूचित करतो की, २००६ आणि २०१२ दरम्यान, यूएस पॉईझन कंट्रोल सेंटरमध्ये दरवर्षी नऊ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

‘टेफ्लॉन फ्लू’ टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?

हेल्थलाइननुसार, नॉनस्टिक भांडी नेहमी लोणी, तेल किंवा पाणी घालून गरम करा, जेणेकरून भांडी जास्त गरम होणार नाही आणि कोटिंगमधील रसायने बाहेर पडणार नाहीत. दुसरे म्हणजे, कोटिंग निघू नये म्हणून लाकडी किंवा सिलिकॉनचे चम्मच वापरा. याव्यतिरिक्त, भांडी स्वच्छ करताना कोटिंग निघू नये याची काळजी घ्या. हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण टेफ्लॉन भांड्यांना लहान स्क्रॅच किंवा चिरा पडल्यानेदेखील उच्च तापमानात त्यातून विषारी धूर आणि हानिकारक रसायने अन्नामध्ये जाऊ शकतात, असे भारताची सर्वोच्च आरोग्य संस्था आयसीएमआरने म्हटले आहे.

हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा युक्रेनला भेट देणार? या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष; कारण काय?

टेफ्लॉन फ्लू होऊ नये यासाठी आणखी एक उपाय म्हणजे स्वयंपाकघर शक्य तितके हवेशीर ठेवा, जेणेकरून तिथे धूर जास्त काळ राहणार नाही. ‘ओरेगॉन-अलास्का-गुआम पॉयझन सेंटर’चे होरोविट्झ यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, “हा धूर कुठूनही येत असला, तरीही तो श्वासाद्वारे शरीरात जाण्यापासून रोखावा.” काही उकळण्यासाठी किंवा बेकिंगसाठी नॉनस्टिक पॅन वापर टाळा. त्याऐवजी मातीची भांडी पर्याय म्हणून वापरू शकता, असे भारतीय वैद्यकीय संस्था ‘आयसीएमआर’ने सुचवले आहे. भारतीयांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये मातीच्या भांड्यांना सर्वात सुरक्षित म्हटले आहे. मातीच्या भांड्यांमध्ये केवळ स्वयंपाकाला कमी तेलच लागत नाही, तर मोठ्या प्रमाणात अन्नाचे पौष्टिक संतुलन राखून ठेवले जाते.