सध्या नोरोव्हायरस विषाणूने अमेरिकेत चिंताजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस नोरोव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत ९० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, या महिन्यात लॉस एंजेलिसमधील रेस्टॉरंट इव्हेंटमध्ये सर्व्ह केलेल्या कच्च्या ऑयस्टरमुळे नोरोव्हायरसची लागण होऊन किमान ८० लोक आजारी पडले. ऑयस्टर ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा येथून आणले गेले होते आणि अमेरिकेतील एकूण १४ राज्यांमध्ये त्याची विक्री करण्यात आली होती. याचे सेवन करणाऱ्यांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे वृत्त समोर येताच बाजारातून ऑयस्टर परत मागवण्यात आले आहेत. यापूर्वी भारतात केरळमध्ये नोरोव्हायरसची प्रकरणे आढळून आली होती. काय आहे हा आजार? तो कसा पसरतो? त्याची लक्षणे आणि उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नोरोव्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो?
नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे, ज्याला ‘विंटर वोमीटिंग बग’ असेही संबोधले जाते. नोरोव्हायरस हा दूषित अन्न, पाणी आणि पृष्ठभागाद्वारे व्यक्तीमार्फत पसरतो. हा विषाणू सर्वाधिक दोन मार्गांनी पसरू शकतो, ते म्हणजे तोंडावाटे किंवा विष्ठेद्वारे. नोरोव्हायरस डायरियाप्रेरक रोटाव्हायरससारखेच आहे आणि विविध वयोगटातील लोकांना संक्रमित करते. रोगाचा प्रादुर्भाव सामान्यत: क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होम, वसतिगृहे आणि इतर बंद जागांवर होतो. नोरोव्हायरस निरोगी लोकांवर प्रभावी ठरत नाही, परंतु वयोवृद्ध, लहान मुले आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो.
हेही वाचा : कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी होतोय सरकारच्या ‘डिजी यात्रा’ अॅपचा वापर? यामागील सत्य काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, उदयोन्मुख पुरावे सूचित करतात की नोरोव्हायरस संसर्ग आतड्यांसंबंधी जळजळ, कुपोषणाशी संबंधित आहे आणि त्यामुळे दीर्घकालीन विकृती होऊ शकते. यात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, दरवर्षी नोरोव्हायरसची अंदाजे ६८५ दशलक्ष प्रकरणांची नोंद केली जाते, ज्यात पाच वर्षांखालील मुलांमधील २०० दशलक्ष प्रकरणांचा समावेश आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनची वेबसाइट पुढे सांगते की, अमेरिकेतील अन्नजन्य आजाराचे प्रमुख कारण नोरोव्हायरस आहे; ज्यामुळे देशातील सर्व अन्नजन्य आजारांपैकी ५८ टक्के प्रकरणे नोरोव्हायरसची आहेत.
नोरोव्हायरसची लक्षणे काय आहेत?
नोरोव्हायरसची सुरुवातीची लक्षणे म्हणजे उलट्या किंवा अतिसार. ही लक्षणे विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांत दिसून येतात. रुग्णांना मळमळ वाटू लागते, पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होतो. संसर्ग झाल्यानंतर काही प्रकरणांमध्ये शरीरातील द्रव कमी झाल्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. हा विषाणू अत्यंत वेगाने पसरू शकतो. तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, एका संक्रमित व्यक्तीमुळे कोट्यावधी लोकांना या विषाणूची लागण होऊ शकते. याचे कारण म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीच्या थुंकण्यामुळे आणि व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेदेखील या आजाराची लागण होऊ शकते.
नोरोव्हायरसकरिता सुरक्षात्मक उपाय काय आहेत?
एखाद्याला अनेक वेळा संसर्ग होऊ शकतो, कारण विषाणूचे विविध प्रकार असतात. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे. याचा अर्थ असा की, इतर विषाणूप्रमाणे हे विषाणू अल्कोहलमुळे नष्ट होत नाही, म्हणजेच हँड सॅनिटायझर्स विषाणू नष्ट करण्यास सक्षम नाही. तसेच हे विषाणू ६० डिग्री सेल्सियसपर्यंत उष्णता सहन करू शकतात, त्यामुळे फक्त अन्न वाफवल्याने किंवा क्लोरीनयुक्त पाण्याने विषाणू मरत नाहीत, त्यामुळे मूलभूत खबरदारी अत्यावश्यक आहे. शौचालय वापरल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर वारंवार साबणाने हात धुणे. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात काळजीपूर्वक धुणे महत्त्वाचे आहे. उद्रेकादरम्यान, पृष्ठभागांना हायपोक्लोराईटच्या द्रावणाने निर्जंतूक करणे आवश्यक आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सूचित करते की, संसर्ग झालेल्यांनी इतरांशी संपर्क टाळावा आणि आजारी असताना व लक्षणे थांबल्यानंतर दोन दिवस इतरांसाठी अन्न तयार करणे टाळावे.
\
नोरोव्हायरसचा उपचार काय आहे?
नोरोव्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णाला बरे व्हायला वेळ लागतो. परंतु, हा विषाणू साधारणपणे फक्त दोन किंवा तीन दिवस टिकतो. बहुतेक व्यक्ती जे फार तरुण, खूप वृद्ध किंवा कुपोषित नसतात त्यांनी पुरेशी विश्रांती घेतल्यास आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास यापासून लवकर सुटका होऊ शकते. रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेझ चेन रिॲक्शनद्वारे या आजाराचे निदान केले जाते. या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही. या आजाराची लागण झाल्यास तीव्र टप्प्यात स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना रीहायड्रेशन फ्लुइड्स इंट्राव्हेनस द्यावे लागतात.
हेही वाचा : अब्जावधी वर्षांचं काम मिनिटांत होणार? ‘Google Willow’ चिप काय आहे?
अन्य उपाय
- आपले हात वारंवार धुवा
- शिंपले तयार करण्याआधी स्वच्छ धुवा
- फळ आणि भाज्यांना धुवून वापरा
- विषाणूची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर घरातून बाहेर जाणे टाळा
- विषाणूची लागण झाल्यानंतर दुसऱ्यांसाठी जेवण तयार करणे टाळा