दक्षिण आणि उत्तर कोरियामधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हुकूमशहा किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरिया दक्षिणेविरुद्ध नवनवीन कुरापती काढताना दिसत असून, काही महिन्यांपासून उत्तर कोरियातून दक्षिणेच्या दिशेने विष्ठा आणि कचऱ्याने भरलेले फुगे पाठवले जात होते. आता दक्षिणेविरुद्ध उत्तर कोरियाने एक नवीन शस्त्र तैनात केले आहे. ते म्हणजे ‘नॉईज बॉम्बिंग’. दक्षिण कोरियामधील एका गावातील रहिवाशांनी डिमिलिटराइज्ड झोन (डीएमझेड)जवळ राहणाऱ्या, उत्तर कोरियातील ध्वनिवर्धकामधून गोंगाटासारखे आवाज आणि इतर भयानक विचित्र आवाज ऐकू येत असल्याची तक्रार केली आहे. या आवाजाचा त्रास होत असल्याचे त्यांचे सांगणे आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन आणि दक्षिणेचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या नेतृत्वाखाली दोन देशांचे संबंध अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यामुळे तणाव अधिक वाढलाय. काय आहे ‘नॉईज बॉम्बिंग’? याचा वापर कसा केला जात आहे? तणाव वाढण्याची कारणे काय? त्याविषयी जाणून घेऊ.

‘नॉईज बॉम्बिंग’ म्हणजे काय?

उत्तर कोरियापासून फक्त १.६ किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या डांगसान येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ‘नॉईज बॉम्बिंग’ला बळी ठरले आहेत. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया मुद्दाम ध्वनिवर्धकावर मोठा आणि कर्कश आवाज गावकऱ्यांना ऐकवत आहे. काही गावकऱ्यांनी या आवाजाचे वर्णन लांडग्यांचे रडणे, धातू एकमेकांना घासणे किंवा भुतांचे ओरडणे म्हणून केला आहे. काही रहिवाशांनी तोफखान्याचा आवाज म्हणून या आवाजाचे वर्णन केले होते. “आम्हाला याचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही या आवाजात रात्री झोपू शकत नाही,” असे एन मी-ही नावाच्या एका गावकऱ्याने ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. डांगसान या गावाची लोकसंख्या केवळ ३५४ आहे आणि मुख्यत: या गावात ६० वर्षे आणि त्यावरील वयाचे लोक राहतात.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
हुकूमशहा किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरिया दक्षिणेविरुद्ध नवनवीन कुरापती काढताना दिसत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : विष्ठा आणि कचर्‍याने भरलेले फुगे उत्तर कोरिया कुठे पाठवतोय? हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घ्या…

उत्तर कोरिया जुलैपासून दिवसाचे १० ते २४ तास दक्षिण कोरियाच्या सीमेवर ध्वनिवर्धक वाजवत आहे. उत्तर कोरियाच्या कुरापतींचा सर्वांत जास्त फटका डांगसानला बसला आहे. डीएमझेडच्या परिसरातील रहिवाशांनी १९६० पासून ध्वनिवर्धकाद्वारे प्रचार-प्रसार केला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या नेत्यांच्या पुतळ्यांचा अपमान केला गेला आहे. दक्षिण कोरियाने के-पॉपसह उत्तर कोरियाच्या सैनिकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. “माझी इच्छा आहे की, त्यांनी फक्त त्यांची प्रचारगाणी प्रसारित करावीत,” असे एन सीओन-हो या गावकऱ्याने सांगितले. “किमान ते माणसांचे आवाज होते आणि आम्ही ते सहन करू शकत होतो,” असेही ते म्हणाले. गावकऱ्यांनी संगीत किंवा मानवी आवाज नसलेल्या या नवीनतम विचित्र आवाजांचे वर्णन त्रासदायक आणि तणावपूर्ण, असे केले आहे.

गावकरी त्यांच्या घराच्या खिडक्या बंद ठेवत आहेत आणि काहींनी उत्तरेकडील आवाज बाहेर ठेवण्यासाठी स्टायरोफोम स्थापित केले आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, आवाजामुळे त्यांना निद्रानाश, डोकेदुखीचा त्रास होत असून, त्यांच्या शेळ्याही कमी दूध देत आहेत आणि कोंबड्यांनीही अंडी देणे कमी केले आहे, असे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. राजकारण्यांनी डांगसानला भेट दिली आहे आणि कायदेकर्त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. परंतु, गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ते उत्तर कोरियाचे मानसिक युद्ध थांबविण्यासाठी उपाय योजण्यात अयशस्वी ठरले आहेत.

काही महिन्यांपासून उत्तर कोरियातून दक्षिणेच्या दिशेने विष्ठा आणि कचऱ्याने भरलेले फुगे पाठवले जात होते. (छायाचित्र-एपी)

दोन देशांतील तणावात वाढ

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उन काही वर्षांपासून अधिक कठोर भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चिघळले आहेत. मे महिन्याअखेरपासून उत्तर कोरियाने दक्षिण कोरियामध्ये कचरा वाहून नेणारे हजारो फुगे पाठवले आहेत. दक्षिणेतील कार्यकर्त्यांकडून सीमावर्ती भागात वारंवार पत्रके पाठविण्यात आल्यानंतर उत्तर कोरियाने प्रत्युत्तर म्हणून विष्ठा आणि कचऱ्याने भरलेले फुगे दक्षिण कोरियाला पाठवायला सुरुवात केली. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला पाठविलेल्या पत्रकात किम जोंग यांना ‘खुनी हुकूमशहा’ व ‘डुक्कर’ असे संबोधले होते. जूनमध्ये दक्षिण कोरियाने उत्तरेविरुद्ध प्रचार, के-पॉप संगीत यांच्याविरोधात २४ तास ध्वनिवर्धक प्रसारण मोहीम पुन्हा सुरू केली. प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने स्वतःचे ‘नॉईज बॉम्बिंग’ सुरू केले. दोन्ही देशांदरम्यान २०१८ मध्ये झालेल्या शांतता करारानुसार हे प्रसारण बंद करण्यात आले होते. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार दोन्ही बाजूंनी रद्दबातल ठरवला गेला आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना दक्षिणेतील डोंग-ए विद्यापीठातील तज्ज्ञ कांग डोंग-वान म्हणाले, “उत्तर कोरियाला माहीत आहे की, त्यांचा प्रचार आता दक्षिण कोरियावर चालणार नाही.” ऑक्टोबरमध्ये उत्तर कोरियाने दक्षिणेवर ड्रोन पाठविल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच दक्षिण कोरियाने प्रचार पत्रके पाठवण्यास सुरुवात केली होती. “सशस्त्र संघर्ष आणि युद्धदेखील होऊ शकते,” असा इशारा या पत्रकांमधून देण्यात आला होता, असे वृत्त बीबीसीने दिले. दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे की, ते प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास उत्तर कोरियाच्या राजवटीचा अंत होईल. उत्तरेने दक्षिण कोरियाशी जोडणारे सर्व रेल्वे आणि रस्ते मार्गही बंद केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, दक्षिण कोरियाच्या सैन्याने उत्तर कोरियावर सीमावर्ती भागांजवळील जीपीएस सिग्नल विस्कळित केल्याचा आरोप केला; ज्यामुळे नागरी जहाज आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला.

हेही वाचा : … तर तिसरे महायुद्ध होणार? युक्रेनच्या क्षेपणास्त्र वापराविरुद्ध रशियाचा इशारा; कारण काय?

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी किम यांची झालेली चर्चा अयशस्वी ठरली. तेव्हापासून म्हणजेच २०१९ पासून दक्षिण कोरियाविषयीचे उत्तरेचे शत्रुत्व वाढत आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला रोखण्यासाठी अमेरिका आणि जपानबरोबर संयुक्त लष्करी कवायती वाढवल्या आहेत. ट्रम्प जानेवारीमध्ये पुन्हा सत्तेवर परत येत असल्याने दोन्ही देशांतील संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असे वृत्त अमेरिकन दैनिकाने दिले आहे.