Google DeepMind ने बुधवारी एक अद्वितीय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल सादर केले असून, चे माणसाप्रमाणेच 3D व्हिडीओ गेमसुद्धा खेळू शकते. AI मॉडेलला स्केलेबल इंस्ट्रक्शनल मल्टिवर्ल्ड एजंट (SIMA) म्हटले जाते आणि ते वेगवेगळ्या गेमिंग वातावरणाशी कसे संवाद साधायचे आणि वेगवेगळी कामे कशी पूर्ण करायची हे शिकत आहे. मॉडेल सध्या प्राथमिक टप्प्यात असून, अधिक गुंतागुंतीच्या हालचालींमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. एकदा मॉडेल परिपूर्ण झाल्यानंतर AI मॉडेल्समध्ये ऑनलाइन आणि वास्तविक जगात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जाऊ शकतो, असेही Google चे म्हणणे आहे. ज्येष्ठांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच एआय रोबो आला होता. त्यानंतर आता मुलांबरोबर गेम खेळण्यासाठी SIMA मॉडेल आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिमा म्हणजे काय?

खरं तर AI संशोधन प्रयोगशाळा Google Deepmind SIMA हे इतर AI मॉडेलपेक्षा विशेष असल्याचे सांगते. तसेच ते OpenAI च्या ChatGPT किंवा Google Gemini यांसारख्या AI मॉडेलपेक्षा वेगळी कार्ये करू शकते. खरं तर एआय मॉडेल्सना मोठ्या डेटा सेटवर प्रशिक्षित केले जाते. त्यामुळे ते कोणतेही काम करताना मर्यादा पाळतात. तसेच सीमा हे एआय एजंट डेटावर प्रक्रिया करून त्यानुसार कार्य करू शकते. खरं तर हे गेम खेळताना एखाद्या आभासी मित्रासारखाच अनुभव देते. एआय सीमा हे आभासी जगातील सगळे संकेत समजू शकते. खेळातील किल्ले बांधण्यापासून ते इतर अनेक कामे करू शकते. खरं तर हा सुपर स्मार्ट संगणक प्रोग्राम असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यात आपल्याला काय अपेक्षित आहे हे समजून घेण्याची क्षमता असून, आभासी जगात कार्य करण्यास हे फायदेशीर ठरणार आहे.

SIMA कसे काम करते?

SIMA तुम्ही दिलेले आदेश पाळते, कारण त्याला मानवी भाषेद्वारे प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला खेळात किल्ला बांधायला सांगता किंवा खजिना शोधायला सांगता तेव्हा या संकेतांचा नेमका अर्थ काय समजून ते काम करते. SIMA हे वापरकर्त्याशी केलेल्या परस्परसंवादाद्वारे कार्य करते. तुम्ही SIMA शी जितका अधिक संवाद साधता, तितकेच ते त्याच्या अनुभवांमधून शिकून अधिक हुशार होते आणि कालांतराने स्वतःमध्ये सुधारणा करत जाते. खरं तर याला वापरकर्त्याच्या विनंत्या समजून घेणे आणि पूर्ण करणे अधिक चांगल्या पद्धतीने समजते. एआय तंत्रज्ञानाच्या सध्याच्या टप्प्यात एआय तंत्रज्ञानाद्वारे एक गेम खेळता येणे ही एक मोठी कामगिरी आहे. विशेष म्हणजे SIMA त्यापलीकडे जाऊन विविध गेम सेटिंग्जमधील सूचनांचे पालन करू शकते. Google DeepMind च्या नव्या संशोधनानुसार, नव्या एआय मॉडेल्सना भाषा समजून ती भाषांतरित करणे सोपे आहे.

SIMA चे प्रशिक्षण कसे होते?

एका ब्लॉगमध्ये Google DeepMind कडून यासंदर्भात माहिती पोस्ट करण्यात आली आहे. आम्ही SIMA ला विविध व्हिडीओ गेम्सचे प्रशिक्षण देण्यासाठी गेम डेव्हलपर्सबरोबर भागीदारी केली आहे. खरं तर AI मॉडेल कोणत्याही गेमला पराभूत करू शकणारे सुपर इंटेलिजेंट गेमर म्हणून विकसित केले जात नाही, तर खुल्या जागतिक परिस्थितीत 3D गेममध्ये कसे कार्य करायचे आणि नैसर्गिक भाषेतील सूचना वापरून एखादी व्यक्ती कशी प्रतिक्रिया देऊ शकते हे समजून त्याला शिकवले जाते.

SIMA टीमने सांगितले की, “सर्वसाधारणपणे AI साठी भाषा समजून कार्य करणे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, कारण मोठ्या भाषेच्या मॉडेल्सनी शक्तिशाली प्रणाली विकसित केल्या आहेत. ज्या जगातील कोणत्याही भाषेचे ज्ञान आत्मसाद करू शकतात. तसेच त्यानुसार योजना तयार करू शकतात, परंतु सध्या त्यांच्याकडे कार्य करण्याच्या क्षमतेचा अभाव आहे. त्यामुळे एआय मॉडेल त्यादृष्टीनं फायदेशीर ठरणार आहे.” AI मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी Google DeepMind ने आठ गेम स्टुडिओसह भागीदारी केली असून, SIMA ला नऊ वेगवेगळ्या व्हिडीओ गेमवर प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात नो मॅन्स स्काय बाय हॅलो गेम्स, टक्सेडो लॅब्सचे टीअरडाउन, गोट सिम्युलेटर 3 आणि कॉफी स्टुडिओचे व्हॅल्हेम आणि इतर बऱ्याच गेमचा समावेश आहे. एआय मॉडेलला प्रत्येक गेममध्ये नवीन परस्परसंवादाचं कौशल्य आत्मसाद करावे लागणार असून, आभासी जगामध्ये कसे कार्य करावे आणि इतरांशी कसा संवाद साधावा, असे बरेच काही शिकावे लागणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now google will play video games with you why not have a partner vrd
Show comments