ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ॲमेझॉन’वरून आज आपण प्रत्येक वस्तू खरेदी करू शकतो. हे प्लॅटफॉर्म आपल्या जीवनाचा एक भागच बनले आहे. अगदी जी वस्तू आपल्याला हवी असते ती वस्तू या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असते. त्यासाठी आपल्याला बाजारात उठून खरेदी करायला जाण्याचीही आवश्यकता उरलेली नाही. लोक आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाणे टाळतात. कदाचित याचाच विचार करून ॲमेझॉन एक नवीन प्रोग्रॅम लॉंच करणार आहे. यामुळे आता कपडे, मोबाइल, टीव्ही याव्यतिरिक्त ‘कार’सुद्धा ॲमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे. अगदी याच वर्षापासून ॲमेझॉनवरून कार खरेदी करणे शक्य होणार आहे.

१६ नोव्हेंबर २०२३ रोजी लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये ॲमेझॉन आणि ह्युंदाईने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या एका नव्या पायलट प्रोग्राममध्ये खरेदीदारांना ॲमेझॉन डॉट कॉमवर ह्युंदाई कार केवळ बघता येणार नसून पैसे भरून ही कार विकतही घेता येणार आहे. “मार्केटिंगचा प्राध्यापक म्हणून मी या गोष्टीला फार जवळून पाहिले. ग्राहक थेट ॲमेझॉनवर नवीन वाहने खरेदी करू शकणार आहेत”, असे ऑनलाइन रिटेल जायंटचे कार्यकारी अधिकारी यांनी या घोषणेदरम्यान सांगितले आणि याबद्दल आनंद व्यक्त केला.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 

डिजिटल शोरूम

कुठल्याही व्यक्तीला थेट ॲमेझॉनवरून कार खरेदी करणे अद्याप शक्य नाही. अद्याप केवळ दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू आपण यावरून खरेदी करू शकतो. ॲमेझॉन आणि ह्युंदाईने पायलट प्रोग्राम लॉंच होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु हा प्रोग्रॅम लॉंच झाल्यावर अगदी गरजेच्या वस्तूंप्रमाणेच कार खरेदी करणेही सोप्पे होणार आहे.

२०१८ पासून ह्युंदाईने ॲमेझॉनवर “इलेक्ट्रॉनिक शोरूम” सुरू केले आहे, जे खरेदीदारांना कार ब्राउझ करू देते, म्हणजेच काय तर आपल्या आवडीच्या कार, त्या कारचे वैशिष्ट्य ग्राहकांना पाहता येते. जवळजवळ हे कार खरेदी करण्यासारखेच आहे, परंतु प्रत्यक्षात नाही. आत्ता, तुम्ही ॲमेझॉन डॉट कॉम उघडल्यास आणि यावर ह्युंदाई शोधल्यास, तुम्हाला ॲमेझॉन डॉट कॉमवर ह्युंदाईचे वेबपेज दिसेल. तुम्ही या वेबपेजवर क्लिक करू शकता, तुमचा पिन कोड टाकू शकता आणि जवळपासच्या सहभागी डीलर्सजवळ विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या नवीन ह्युंदाई कार्स पाहू शकता.

सध्याच्या सिस्टीममध्ये तुम्हाला कारचे मॉडेल, ट्रिम आणि रंग निवडता येतो. यावर तुम्ही रक्कम, महिन्याची इन्स्टॉलमेंटही माहीत करून घेऊ शकता; ज्यावरून तुम्हाला खर्चाचा अंदाज बांधता येतो. परंतु, अद्याप तरी तुम्ही तुमच्या कार्टमध्ये ठेवलेली कार प्रत्यक्षात चेक आउट (खरेदी) करू शकत नाही. त्याऐवजी एकदा तुम्ही तुम्हाला हवी असलेली कार निवडल्यानंतर, ॲमेझॉन तुम्हाला स्थानिक डीलरचा संदर्भ देईल. जेणेकरून तुम्ही रक्कम आणि महिन्याचे इन्स्टॉलमेंट निवडू शकता आणि जवळच्या डीलरला खरेदी केलेल्या कारचे पैसे देऊ शकता.

यासह ॲमेझॉन साइटवरील किमतीचे तपशील केवळ उदाहरणासाठी दिले आहेत आणि अंतिम किंमत ही ह्युंदाई डीलरशिपवरच निर्धारित केली जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले, तर ॲमेझॉन कार खरेदीदारांना माहिती प्रदान करते, परंतु प्रत्यक्षात कार खरेदी करू देत नाही.

ॲमेझॉनचा ‘कार’ विक्री प्रोग्राम काय आहे?

यू.एस.मधील राज्यांना सामान्यतः लेगेसी ऑटोमेकर्स ‘कार’ डीलर्सद्वारे खरेदीदारांना विकतात. काही राज्यांनी टेस्लासारख्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मात्यांना या कार थेट खरेदीदारांना विकण्याची परवानगी दिली आहे.

फ्रँचायझी डीलरशिप कायद्यांचे पालन करण्यासाठी, ॲमेझॉन इतर वस्तूंप्रमाणे विक्रीसाठी वाहनांची यादी करू शकत नाही. यासोबत यात डीलर्ससह भागीदारी असणेही आवश्यक असते. त्यामुळे असे म्हणता येईल की, ॲमेझॉनचा हा प्रोग्राम पाच राज्यांमध्ये १८ ह्युंदाई डीलर्सचा समावेश करून डिजिटल ह्युंदाई शोरूमचा विस्तार करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रोग्रॅममध्ये ग्राहकांना कार्स फक्त बघता येणार नाही तर थेट खरेदीही करता येणार आहे.

यामध्ये ग्राहक वाहनासाठी ॲमेझॉनवरूनच पैसे देऊ शकेल आणि ॲमेझॉनवर कर्ज किंवा भाड्याने घेण्याचा पर्यायही यात निवडता येणार आहे. स्थानिक डीलर कारचा विक्रेता असेल, जो ॲमेझॉन प्लॅटफॉर्मद्वारे कारची विक्री करेल. खरेदीदारांना नवीन वाहने खरेदी करण्याचा सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मताधिकार कायद्यांचे पालन करून, ॲमेझॉनने हा प्रोग्रॅम तयार केला आहे. ॲमेझॉन हा पायलट प्रोग्रॅम ह्युंदाईसह सुरू करेल. ॲमेझॉनने म्हटले आहे की, ते इतर ऑटो ब्रँड समाविष्ट करण्यासाठी प्रोग्रामचा विस्तार करण्याचीही योजना आखत आहे. त्यामुळे भविष्यात ह्युंदाईच नाही तर कुठल्याही कंपनीची कार ॲमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे.

२०२४ मध्ये कार खरेदी करण्याचा मार्ग होईल सोयीस्कर

अहवालांवर विश्वास ठेवल्यास २०२४ मध्ये ॲमेझॉन ग्राहकांना जशी शॅम्पूची बाटली तपासायला (ट्रायलसाठी) देतो अगदी तशीच ह्युंदाई कारही तपासू देणार असल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच लोकांसाठी ही आनंदाची बाब आहे. विशेषतः ॲमेझॉनवर विश्वास ठेवणाऱ्या, ऑनलाइन कागदपत्रे पूर्ण करण्यास प्राधान्य देणाऱ्या आणि डीलरशी व्यवस्थित संवाद साधू शकतील, अशा लोकांसाठी हा प्रोग्रॅम फायद्याचा ठरेल. यासह हा प्रोग्रॅम सहभागी डीलर्सकडे अधिक खरेदीदार आकर्षित करून कारच्या विक्रीत वाढ करू शकेल.

हा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी सुरुवातीला ॲमेझॉन फक्त नवीन ह्युंदाई कार विकेल. परंतु, यात खरेदीदारांना ह्युंदाईची प्रतिस्पर्धी मॉडेलशी तुलना करायची असल्यास ते शक्य होऊ शकणार नाही. ॲमेझॉन वापरलेली वाहने (सेकंड हँड) विकणार नाही किंवा ट्रेड-इनला परवानगी देणार नाही. याचा अर्थ ग्राहकांची बरीच मागणी इथे पूर्ण होणार नाही. यातील एक गोष्ट म्हणजे ऑटो डीलर्सही ॲमेझॉनसह काम करण्यास नकार देऊ शकतात. यातून ते खरेदीदारांशी सहज संपर्क साधण्याची आणि कार विक्री वाढवण्याची संधी गमावतील.

हेही वाचा : “ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर हिंदू मंदिर अस्तित्वात होते”; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून इतिहासातील पुरावे सादर

परंतु, काहीही असले तरी आता कार खरेदीचा मार्ग अगदी सोपा आणि सोयीस्कर होणार आहे. आपल्याला आवडणाऱ्या कार आपण आता ॲमेझॉन कार्टमध्ये अगदी प्रसाधन सामग्री, स्वयंपाकघरातील वस्तू, मोबाइल यांसह साठवून ठेऊ शकणार आहे.

Story img Loader