अंतराळ संशोधनासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रोजन नवनवे प्रयोग करतात. परग्रहावर जीवसृष्टी आहे का? आपल्या सूर्यमालेत काय दडलेलं आहे? मंगळ ग्रहावर नेमकं काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करतात. विज्ञान-तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे काळानुसार अंतराळ संशोधनातही बरेच बदल झाले आहेत. दरम्यान, संशोधक आता आण्विक उर्जेवर चालणारे क्षेपणास्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयोग सत्यात उतरल्यास मंगळावर पोहचण्यासाठीचा वेळ निम्म्याहून कमी होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून सुरू असलेला हा प्रयोग काय आहे? हा प्रयोग सत्यात कधी उतरणार? हे जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रकल्पाला ४९९ दशलक्ष डॉलर्सचा खर्च येणार
नासा अंतराळ संशोधन संस्था आणि डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी (डीएआरपीए, DARPA)यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) आण्विक उर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राविषयी काही घोषणा केल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकहीड मार्टीन या कंपनीवर क्षेपणास्त्रासाठी लागणाऱ्या उर्जानिर्मिती प्रमाणीचे डिझाईन, त्याची निर्मिती आणि चाचणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर व्हर्जिनियामधील लिंचबर्ग येथील बीडब्ल्यूएक्स टेक्नॉलॉजीस या कंपनीला क्षेपणास्त्राच्या इंजिनमध्ये न्यूक्लिअर फिजन रिअॅक्टर तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पाला एकूण ४९९ दशलक्ष डॉलर्सचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाला डेमॉन्स्ट्रेशन रॉकेट फॉर अजाईल सिसलुनार ऑपरेश्नस म्हणजेच डीआरएसीओ असे नाव देण्यात आले आले.
अंतराळयान निम्म्या वेळेत मंगळावर?
प्रत्येक २६ महिन्यात मंगळ आणि पृथ्वी एकमेकांच्या खूप जवळ येतात. याच जवळीकीचा फायदा घेत पृथ्वीवरून मंगळ गृहावर कमी वेळेत पोहोचता येऊ शकते. असे असले तरी पृथ्वी आणि मंगळ यांच्यात खूप जास्त अंतर आहे. हे अंतर पार करायचे असल्यास साधारण सात ते नऊ महिने लागतात. त्यामुळे कित्येक महिने प्रवास करू शकणारे अंतरळायान तयार करण्यासाठी खूप सारा खर्च येतो.
…आणि क्षेपणास्त्रांना मोठ्या प्रमाणात इंधनरुपी उर्जा मिळेल
मात्र युरेनियमच्या विभाजनातून (स्प्लिटिंग) आण्विक अभिक्रिया करून त्यातून उर्जा निर्माण करता येते. ही उर्जा क्षेपणास्त्रांना अधिक वेगाने प्रवास करण्यास मदत करू शकते. डीआरएसीओ मोहिमेत तयार करण्यात येत असलेल्या इंजिनमध्ये न्यूक्लियर रिअॅक्टरर्स असणार आहेत. या न्यूक्लियर रिअॅक्टर्सच्या मदतीने हायड्रोजन या मूलद्रव्याला उने ४२० डिग्री फॅरेनहाइटपासून ४४०० डिग्री फॅरेनहाइटपर्यंत तापवता येऊ शकतेच या प्रक्रियेच्या मदतीने गरम वायू निर्माण होतो. हा वायू पुढे एका नोझलच्या (एका प्रकारची नळी) माध्यमातून दाब निर्माण करेल. ज्यामुळे क्षेपणास्त्रांना मोठ्या प्रमाणात इंधनरुपी उर्जा मिळेल. ज्यामुळे चंद्राकडे जाण्याचा प्रवास अधिक वेगाने होऊ शकतो.
‘ऑरिअन’ नावाची मोहीम राबवण्यात आली होती
याआधीही आण्विक उर्जेच्या मदतीने क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. १९५० आणि १९६० च्या दशकात ‘ऑरिअन’ नावाची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेला नासा, वायूसेना तसेच डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीएआरपीए) आर्थिक मदत केली होती. अणूंचा स्फोट करून अंतराळयानाला गती देण्याचा या मोहिमेत प्रयत्न करण्यात आला होता.
न्यूक्लियर थर्मल इंजिन तयार करण्याचा प्रयत्न
याच काळात नासा तसेच अन्य अंतराळ संशोधन संस्थानी ‘रोव्हर’ आणि ‘एनईआरव्हीए’ हे दोन प्रोजेक्ट राबवले होते. सध्या डीआरएसीओ काम करत असलेल्या प्रकल्पाप्रमाणेच रोव्हर आणि एनईआरव्हीए (न्यूक्लियर इंजिन फॉर रॉकेट व्हेइकल अॅप्लिकेशन) या प्रकल्पांत न्यूक्लियर थर्मल इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत एकूण २३ रिअॅक्टर्स तयार करण्यात आले होते. मात्र या रिअॅक्टर्सच्या मदतीने एकदाही अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले नव्हते. हा प्रकल्प १९७३ साली बंद करण्यात आला. मात्र याच प्रयोगांच्या जोरावर नासाने अणूउर्जेच्या मदतीने गुरू, शनी आणि सूर्यमालेत संशोधन करण्याचा विचार केला होता.
एनईआरव्हीए आणि डीआरएसीओ मोहिमांत काय फरक आहे?
एनईआरव्हीए आणि डीआरएसीओ यामध्ये काही मूलभूत फरक आहे. एनईआरव्हीएमध्ये शस्त्रास्त्रांसाठी वापरण्यात येणाऱ्या युरेनियमचा वापर करण्यात आला होता. तर डीआरएसीओ मोहिमेत कमी क्षमतेच्या (कमी संपन्न) युरेनियमचा वापर करण्यात आला होता.
दरम्यान, अणूउर्जेचा वापर करून अंतराळयानाचे प्रक्षेपण करायचे असल्यामुळे पृथ्वीवर असताना कोणताही अपघात होऊन कसलीही हानी होऊ नये यासाठी अंतराळयान अवकाशात गेल्यानंतर न्यूक्लियर रिअॅक्टर सुरू करण्यात येणार आहे. याबाबत DRACO प्रकल्प व्यवस्थापक तबिता डॉडसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या प्रयोगामुळे होणाऱ्या संभाव्य अपघात आणि धोक्यांचा डीआरएसीओने अभ्यास केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
क्षेपणास्त्र अवकाशात कधी झेपावणार?
न्यूक्लियर थर्मल इंजिनच्या मदतीने क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे उड्डाण २०२५ किंवा २०२६ या साली केले जाऊ शकते. चाचणीसाठी निवडण्यात आलेले अंतराळयाण अंतराळात ४३५ ते १२४० मैल अंतरावरील कक्षेत जाऊ शकते. अंतराळयानाने इथपर्यंत यशस्वी प्रवास केल्यास ते आगामी ३०० वर्षे हे यान या कक्षेत राहू शकते, असेही डॉडसन यांनी सांगितले.