Blue Blood Octopus: ऑक्टोपस हा एक अद्भुत सागरी प्राणी आहे, जो त्याच्या बुद्धिमत्तेपासून ते अप्रतिम रंग बदलण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या शारीरिक वैशिष्ट्यांपैकी सर्वात विचित्र आणि आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचे निळ्या रंगाचे रक्त. माणसांप्रमाणेच ऑक्टोपसला देखील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी रक्ताची गरज असते, परंतु त्यासाठी हिमोग्लोबिन ऐवजी, ऑक्टोपस तांब्यावर आधारित हिमोस्यानिन वापरतो. हे विशेष प्रथिन ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी योग्य प्रकारे तयार झाले आहे आणि त्याच्या विशिष्ट रासायनिक संरचनेमुळे ऑक्टोपसच्या रक्ताला निळा रंग मिळतो. या लेखात आपण ऑक्टोपसच्या रक्ताचा निळा रंग का असतो आणि तो त्याच्या जीवनशैलीसाठी कसा उपयुक्त आहे, याबद्दल जाणून घेऊ.

रक्ताचा निळ्या रंगामागील रासायनिक कारण

ऑक्टोपसच्या रक्ताचा निळा रंग तांब्याने समृद्ध असलेल्या हिमोस्यानिन नावाच्या प्रथिनामुळे असतो. हे प्रथिन ऑक्सिजनला जोडून वाहून नेण्याचे काम करते. मानवांच्या रक्तामध्ये लोहावर आधारित हिमोग्लोबिन असते, ज्याचा संपर्क ऑक्सिजनशी आल्यावर लाल रंग प्राप्त होतो, तर ऑक्टोपसच्या रक्तामध्ये तांब्याच्या अणूंमुळे ऑक्सिजनशी संयोग झाल्यावर निळा रंग प्राप्त होतो वा दिसतो.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
From Jack the Penguin to Volcano Rabbit This 10 creatures that thrive in volcanic environments
जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
Do You Know Which Animals can survive without oxygen
Animals That Live Without Oxygen: अविश्वसनीय! पण ‘हे’ प्राणी जगात ऑक्सिजनशिवाय जगू शकतात; कोणते ते घ्या जाणून…
Squid Game
Video: “पुण्यात खेळला जाणार का Squid Game?”, पुणे स्टेशनवर Ddakji खेळताना दिसल्या दोन व्यक्ती? वाचा, पुणेकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया

अधिक वाचा: Discovering the Blue-Eyed Child: १७ हजार वर्षांपूर्वीच्या निळ्या डोळ्यांच्या बालकाचे अवशेष कोणती जनुकीय व इतर माहिती सांगतात?

हिमोग्लोबिन आणि हिमोस्यानिनमधील मुख्य फरक काय आहे?

हिमोग्लोबिन (लोहावर आधारित): हिमोग्लोबिन हे माणसांसारख्या प्राण्यांमध्ये आढळते. हिमोग्लोबिन हे उष्णकटिबंधीय आणि ऑक्सिजन-समृद्ध वातावरणासाठी अनुकूल. हिमोग्लोबिन मुळेच रक्ताला लाल रंग प्राप्त होतो.

हिमोस्यानिन (तांबे महत्त्वाचे): हिमोस्यानिन हे ऑक्टोपस, स्क्विड्स आणि इतर काही सागरी प्राण्यांमध्ये आढळते. हिमोस्यानिन हे थंड, ऑक्सिजन-अभाव असलेल्या सागरी वातावरणासाठी अधिक उपयुक्त आहे. शिवाय ते रक्ताला निळा रंग देते. तांब्याचे अणू ऑक्सिजनशी संयोग केल्यावर त्याचा ऑक्सिडेशन स्तर बदलतो, त्यामुळे रक्ताला निळा रंग प्राप्त होतो.

सागरी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीची उत्क्रांती

ऑक्टोपस ही प्रजाती मुख्यत्वे समुद्रात राहते, जिथे त्यांना कमी ऑक्सिजन, थंड पाणी आणि खारं वातावरण अशा विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत हिमोस्यानिन हे प्रथिन ऑक्टोपससाठी हिमोग्लोबिनच्या तुलनेत अधिक उपयुक्त ठरते.

ऑक्सिजनची उपलब्धता

समुद्रात खोलवर ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते. हिमोस्यानिन कमी ऑक्सिजनच्या परिस्थितीत देखील कार्यक्षमतेने ऑक्सिजन वाहून नेते, त्यामुळे ऑक्टोपसच्या ऊतींना आवश्यक ऑक्सिजन मिळतो.

थंड तापमान

ऑक्टोपस थंड पाण्यातही राहतात, जिथे हिमोग्लोबिन प्रभावी ठरत नाही. हिमोस्यानिन थंड तापमानात अधिक कार्यक्षमतेने काम करते, जे ऑक्टोपसला उर्जेचा प्रभावी वापर करण्यास मदत करते.

अधिक वाचा: Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?

उच्च दाब आणि खारटपणा

खोल समुद्रात दाब खूप जास्त असतो आणि पाण्यात खारटपणा जास्त असतो. हिमोस्यानिन अशा उच्च दाब आणि खारट पाण्यात अधिक स्थिर राहते, ज्यामुळे ऑक्टोपस तग धरून राहतो.

ऑक्टोपसच्या शरीरक्रियेत हिमोस्यानिनचे महत्त्व

ऑक्टोपसचे रक्तफेरण तंत्र अनोखे आहे, ऑक्टोपसला तीन हृदये असतात. दोन हृदय गिल्समध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी आणि एक शरीरभर ऑक्सिजन वितरित करण्यासाठी असते. हिमोस्यानिन ऑक्टोपसच्या या अत्यंत सक्रिय आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीसाठी अपरिहार्य आहे. ऑक्टोपस एक अत्यंत सक्रिय शिकारी आहे, ज्याच्या स्नायूंना सतत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याची आवश्यकता असते. हिमोस्यानिन त्याच्या उच्च ऑक्सिजनच्या गरजांची पूर्तता करते. ऑक्टोपसचे हिमोस्यानिन कमी pH (अम्लीय वातावरण) आणि कमी ऑक्सिजनच्या परिस्थितीत देखील कार्यक्षम असते. त्यामुळे ऑक्टोपस विविध समुद्री परिस्थितींमध्ये तग धरू शकतो.

इतर निळ्या रक्ताचे प्राणी

ऑक्टोपस हा निळ्या रक्ताचा एकमेव प्राणी नाही. स्क्विड, लॉबस्टर, आणि हॉर्सशू क्रॅब यांसारखे काही प्राणी देखील हिमोस्यानिन वापरतात. मात्र, प्रत्येक प्रजातीमध्ये हिमोस्यानिन थोड्या वेगळ्या प्रकारे कार्य करते. हॉर्सशू क्रॅब मध्ये हिमोस्यानिन व्यतिरिक्त त्यांच्या रक्तात अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे त्यांना जिवाणूंविरुद्ध संरक्षण देतात. तर स्क्विडमध्ये त्याच्या हिमोस्यानिनची संरचना अधिक वेगवान हालचालींसाठी अनुकूलित केलेली आहे.

हिमोस्यानिनचे तोटे

हिमोस्यानिन ऑक्टोपससाठी फायदेशीर असले तरी त्याला काही मर्यादा देखील आहेत. हिमोस्यानिन एका वेळी हिमोग्लोबिनच्या तुलनेत कमी ऑक्सिजन वाहून नेते, त्यामुळे जास्त ऊर्जेची गरज असते. ऑक्टोपसला तीन हृदयांच्या मदतीने रक्तफेरणाची पूर्तता केली जाते, त्यामुळे जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.

उत्क्रांतीची कथा

ऑक्टोपसचे निळे रक्त ही त्याच्या सागरी जीवनशैलीला अनुकूल असलेल्या उत्क्रांतीची एक विलक्षण कथा आहे. तांब्यावर आधारित हिमोस्यानिन या प्रथिनामुळे ऑक्टोपस कमी ऑक्सिजन, थंड पाणी आणि खारटपणाच्या कठीण परिस्थितीतही तग धरतो. या वैशिष्ट्याने ऑक्टोपसला महासागरातील सर्वात यशस्वी आणि आकर्षक प्राण्यांपैकी एक ठरवले आहे. ऑक्टोपसचे निळे रक्त हे केवळ एक जैविक वैशिष्ट्य नसून, निसर्गाच्या अद्वितीय सर्जनशीलतेचे प्रतिक आहे.

Story img Loader