सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. किशोरवयीन मुलांचे सोशल मीडिया हाताळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यात मित्रांशी गप्पागोष्टी, नवीन व्यक्तींशी मैत्री करणे, आपले सुख-दुःख शेअर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होतात. सोशल मीडियाच्या क्षेत्रात सर्वाधिक वापर होणारा प्लॅटफॉर्म चालविणारी ‘मेटा’ ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. मात्र, आता हाच प्लॅटफॉर्म मुलांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. एक लाख मुलांचे दररोज लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक आरोप असलेला अहवाल आता समोर आला आहे.

‘मेटा’तील अंतर्गत दस्तऐवज आणि कर्मचाऱ्यांशी साधलेल्या संवादातून न्यू मेक्सिकोच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने या संदर्भात मेटाविरोधात एक खटला दाखल केला. किशोरवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले कंपनीने उचलली आहेत. मात्र, केवळ फायद्याचेच मुद्दे उचलून हा अहवाल समोर आणण्यात आला आहे, असा युक्तिवाद मेटातर्फे करण्यात आला आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral
VIDEO : नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रुममध्ये बोलावणाऱ्या उपअभियंत्याला तरुणीने दिला चपलेचा प्रसाद; बघा कशी केली पोलखोल
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?

हा डेटा काय सांगतो? ‘मेटा’ काही उपाययोजना खरेच करीत आहे का?

कंपनीच्या स्वतःच्याच अंतर्गत कागदपत्रांनुसार मेटावर दररोज सुमारे एक लाख मुलांचा लैंगिक छळ होत असल्याचा आरोप आहे. न्यू मेक्सिकोच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने मेटा आणि मार्क झुकरबर्ग यांच्यावर लैंगिक शोषणासंदर्भात खटला दाखल केला आहे. ” ‘मेटा’चे प्लॅटफॉर्म्स ही मुलांसाठी सुरक्षित जागा नसून, चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्यापार करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंधांसाठी प्रेरित करण्यासाठी मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो, असे तपासणीत समोर आले आहे” असे अॅटर्नी जनरल राऊल टोरेझ यांनी गेल्या महिन्यात सांगितले.

‘सीएनबीसी’नुसार कंपनीच्या फाइल्समध्ये स्पष्ट आहे की, २०२१ मध्ये कंपनीच्या अंदाजित डेटानुसार फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर दररोज प्रौढ जननेंद्रियाची छायाचित्रे प्राप्त करण्यासह सुमारे एक लाख मुलांचा लैंगिक छळ केला जात आहे.
‘द गार्डियन’च्या गोपनीय ऑनलाइन तपासणीनंतर न्यू मेक्सिकोच्या अॅटर्नी जनरल यांनी डिसेंबर २०२३ मध्ये त्याविरोधात खटला दाखल केला होता.

न्यू मेक्सिकोमधील तपासकर्त्यांनी १४ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची खोटी खाती तयार केली; ज्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. विशेष सरकारी वकिलांनी असाही दावा केला आहे की, मेटाची विद्यमान प्रणाली बाललैंगिक शोषण करणाऱ्यांना मुलांपर्यंत सहज पोहोचू देणारी आणि प्रसंगी अश्लील छायाचित्रे पाठवण्यासाठी प्रोत्साहित करणारी आहे..

तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खात्यांना चुकीच्या ग्रुपमध्ये सामील होण्याच्या नोटिफिकेशनही आल्या आहेत. मेटा आपल्या वापरकर्त्यांना ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’संदर्भात शोध घेण्याची, अशा पोस्ट शेअर करण्याची आणि विकण्याचीही परवानगी देत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या मानसिक आरोग्याला आघात पोहोचतो आणि त्यांची शारीरिक सुरक्षितताही धोक्यात येत असल्याचे या माहितीत स्पष्ट झाले.

‘द गार्डियन’नुसार ही तक्रार मेटा कर्मचार्‍यांमधील अंतर्गत संवाद आणि कंपनी कर्मचार्‍यांच्या सादरीकरणांवरच आधारित आहे. याविषयी ‘सीएनबीसी’ने म्हटले आहे की, या अहवालात २०२० च्या कंपनीतील अंतर्गत चॅटचा समावेश आहे. त्यामध्ये एका कर्मचाऱ्याने विचारले, “आपण लहान मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी काय करीत आहोत (मी नुकतेच ऐकले आहे की ‘टिकटॉक’वर बरेच काही घडते आहे)?”

‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार या दस्तऐवजात ‘अॅपल’चा अधिकारी असलेल्या एका व्यक्तीच्या १२ वर्षांच्या मुलीचेही इन्स्टाग्रामवर शोषण करण्यात आले. मेटाच्या एका कर्मचार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याही मुलीला इन्स्टाग्रामद्वारे चुकीच्या गोष्टींसाठी प्रवृत्त करण्यात आले होते. हा प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेला नसून दुर्लक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. या तक्रारीत संदर्भात मुलांच्या सुरक्षेवरील कंपनीच्या अंतर्गत माहितीचा हवाला देत म्हटले आहे, “अल्पवयीन लैंगिकतेच्या सुरक्षेत मेटा कमी पडतेय. या संदर्भातील गोष्टींवर उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यात अल्पवयीन मुलांनी पोस्ट केलेल्या गोष्टींवर वाईट कमेंट करणे याचाही समावेश आहे. पोस्ट करणाऱ्यांसह पाहणाऱ्यांसाठीही हा एक भयंकर अनुभव आहे.”

‘पीवायएमके’ प्रोग्राम आहे तरी काय?

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने नमूद केले आहे की, एका दस्तऐवजातील माहितीप्रमाणे मेटा कर्मचारी अशा प्रकारे अल्गोरिदम तयार करतात की, त्यामुळे सतत नोटिफिकेशन येतात. कंपनीतील कर्मचार्‍यांच्या मते, या प्रोग्रामला अंतर्गतरीत्या ‘पीवायएमके’, ‘पीपल यू मे नो’, असे म्हटले जाते. त्यातून लहान मुले चुकीच्या लोकांशीही सहज जोडली जातात. फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने लिहिले की, आतापर्यंत अल्पवयीन मुलांबरोबर चुकीच्या व्यक्तींचा संपर्क होऊ शकला; त्यास ७५ टक्के हा अल्गोरिदमच कारणीभूत आहे. “

“आपण पीवायएमके हा प्रोग्राम बंद का केला नाही? हे खरोखर अस्वस्थ करणारे आहे,” असे मतही एका कर्मचाऱ्याचे व्यक्त केले होते. कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांना या समस्येबद्दल माहिती दिल्याचाही दावा केला. त्यासह अल्गोरिदमही बदलण्याची शिफारस केली; जी अनेकदा नाकारण्यात आली. वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये ‘चाइल्ड सेफ्टी : स्टेट ऑफ प्ले’ या शीर्षकाच्या सादरीकरणात नमूद केले होते की, इन्स्टाग्राममध्ये बालसुरक्षा संरक्षणासंदर्भातील अतिशय कमी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात किशोरवयीन लैंगिकता संबंधातील धोरण याचे वर्णनही ‘अपरिपक्व’, असे केले आहे.

या खटल्यात दावा करण्यात आला आहे की, मेटातील अधिकाऱ्यांनी २०२२ च्या अखेरपर्यंतही हे थांबवण्यासाठी कुठलीही पावले उचललेली नाहीत. सुरक्षा टीमने या संदर्भात माहिती दिल्यानंतरही या प्रकरणात कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. “झुकरबर्ग आणि इतर मेटा अधिकाऱ्यांना त्यांच्या या प्रोग्राममुळे तरुण वापरकर्त्यांना होणाऱ्या गंभीर नुकसानीविषयी पूर्ण माहिती आहे. तरीही ते त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये पुरेसे बदल करण्यात अयशस्वी ठरले आहेत,” असे टोरेझ म्हणाले. मेटाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांवर आरोप करीत ते म्हणाले “समाजातील सदस्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत जाहिरात कमाईला मेटा प्राधान्य देते.”

फेसबुक आणि इन्स्टाग्राममधून अनेकांना नैराश्य?

मुलांनी अधिकाअधिक प्रमाणात ही अॅप्स वापरावीत आणि त्यातूनच त्यांना त्याची सवय लागावी अशा पद्धतीनेच इन्स्टाग्राम आणि फेसबुकची रचना करण्यात आली आहे, असा सूर ३३ अन्य राज्यांच्या अॅटर्नी जनरल यांनी दाखल केलेल्या खटल्यात उमटलेला पाहायला मिळाला. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते आणि त्यांना नैराश्य येते. त्यातून चिंता आणि अतिखाण्याचे विकार होत असल्याचेही सांगितले.

२०२३ मध्ये केलेल्या ‘प्यु रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील किशोरवयीन मुलांनी ६३ टक्के टिकटॉक आणि ५९ टक्के इन्स्टाग्राम वापरल्याची नोंद करण्यात आली आहे; तर केवळ ३३ टक्के मुलांनी फेसबुक वापरल्याचे उघड झाले आहे.

मेटा काय सांगते?

मेटाने दावा केला आहे की, तक्रारीत त्यांच्या अंतर्गत कागदपत्रांमधून केवळ फायदेशीर माहिती निवडून त्यांना चुकीचे ठरविण्यात आले आहे. ‘सीएनबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार मेटाने म्हटले आहे, “किशोरवयीन मुलांना त्यांच्या वयोमानानुसार ऑनलाइन चांगल्या गोष्टींचा अनुभव घेता यावा, अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडे त्यांना आणि त्यांच्या पालकांना सहकार्य करण्यासाठी ३० हून अधिक उपाययोजना आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून या समस्यांवर काम करीत आहोत. तरुणांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ऑनलाइन मदत करण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील असतो.“

हेही वाचा : रामायण भारताबाहेर कसे लोकप्रिय झाले? आशियातील लाओसपासून आफ्रिकेतील मॉरिशसपर्यंत रामायण कथेचा आश्चर्यकारक प्रवास…

जगभरात आता मेटावर दबाव आल्यामुळे इन्स्टाग्राम आणि फेसबुक किशोरवयीन मुलांना आता अॅप्सवरील सर्वांत प्रतिबंधात्मक पोस्ट्स नियंत्रण सेटिंग्जमध्ये ठेवली जातील. त्यासह इन्स्टाग्रामवर करण्यात येणारी सर्च प्रक्रियाही मर्यादित असणार आहे, असे मेटाने ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले. मेटाच्या म्हणण्यानुसार, ”किशोरवयीन मुलांनी इन्स्टाग्रामवर सर्च आणि एक्सप्लोरसारख्या वैशिष्ट्यांचा वापर केल्यानंतर आत्महत्या, स्वत:ला दुखापत यांसारखी संवेदनशील माहिती पाहता येणे आता सहज शक्य होणार नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये हे अपेक्षित असलेले उपाय लागू होतील. मेटाने म्हटले की, तरुण वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ते अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम घेत आहेत. बालसुरक्षा तज्ज्ञांची नियुक्तीही करण्यात आली असून, ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन’ला माहितीचा अहवालही सादर करण्यात येतो. त्यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठीही मदत होते.” “केवळ एका महिन्यात बालसुरक्षा धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच लाखांहून अधिक खाती पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत,” असेही कंपनीने म्हटले आहे.

Story img Loader