सिंगापूर एअरलाइन्सच्या लंडन-सिंगापूर उड्डाणादरम्यान एअर टर्ब्युलन्समुळे विमानाला धक्के बसल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आणि विमान तातडीने बँकॉकला उतरवावे लागले. अनेक प्रवासी जखमी झाले. टर्ब्युलन्स म्हणजे काय आणि तो किती धोकादायक ठरू शकतो, याविषयी.
सिंगापूर एअरलाइन्सची घटना…
२० मे रोजी लंडनहूनहून सिंगापूरला निघालेल्या सिंगापूर एअरलाइन्स (उड्डाण क्र. एसक्यू ३२१) विमानात उड्डाणानंतर काही वेळात हवेच्या विक्षोभामुळे किंवा एअर टर्ब्युलन्समुळे धक्के बसू लागले. त्यामुळे हे विमान तातडीने निर्धारित उड्डाण मार्ग सोडून थायलँडकडे न्यावे लागले आणि बँकॉक विमानतळावर उतरवावे लागले. विमानातील एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे सिंगापूर एअरलाइन्सने जाहीर केले. तर एकूण ३० प्रवासी जखमी झाल्याचे थायलँड पोलिसांनी सांगितले. थायलँड किंवा म्यानमारच्या हवाई हद्दीमध्ये अतितीव्र टर्ब्युलन्समुळे हे घडले असावे असे हवाई मार्गांचा वेध घेणाऱ्या एका हौशी वेबसाइटने म्हटले आहे.
टर्ब्युलन्स कशामुळे होतो?
खाली काही कारणांमुळे असे घडू शकते :
वाऱ्याच्या दिशेत अचानक बदल – अतिउंचीवर हवेच्या प्रवाहामध्ये व्यत्यय आल्यामुळे विमानाच्या उड्डाणामध्ये चढ-उतार होतो. कधी हवेच्या प्रवाहाच्या विरोधात विमानाला उड्डाण करावे लागते. कधी असा प्रवाह विमानाच्या मागील भागावर परिणाम करू शकतो. बहुतेक जेट विमाने सहसा अशा हवेच्या प्रवाहातील चढउतार क्षेत्राच्या बरीच वरून उड्डाणे करतात. पण हवेच्या, वाऱ्याच्या दिशेमध्ये कधीही बदल होऊ शकतो. त्यामुळे विमानाला कोणत्याही बाजूकडून ‘खेच’ मिळू शकतो आणि उड्डाणात बाधा येऊ शकते.
हेही वाचा >>>विश्लेषण: शिष्यवृत्तीवर शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची आर्थिक कुचंबणा?
सौर वारे – काही वेळा सूर्याच्या उष्णतेमुळे सौर वारे निर्माण होतात. या वाऱ्यांमुळे नेहमीच्या वायू प्रवाहात व्यत्यय निर्माण होऊन टर्ब्युलन्स उद्भवतो.
इतर विमाने – मोठ्या आकाराची विमाने उड्डाण करतात, त्यावेळी त्यांच्या पंखाग्रांभोवती हवेचे भोवरे (व्होर्टेक्स) निर्माण होतात. या काळात तेथून छोट्या विमानांनी उड्डाण केले तर त्यांच्या उड्डाणात या हवेच्या चक्राकार प्रवाहांमुळे व्यत्यय येऊ शकतो. यासाठीच मोठ्या विमानांच्या उड्डाणानंतर छोटी विमाने विशिष्ट अवधीनंतर उड्डाण करतात.
टर्ब्युलन्समुळे काय परिणाम?
टर्ब्युलन्समुळे विमानाला अपघात होण्याची संभावना दुर्मिळात दुर्मीळ असते. पण विमानाला सतत धक्के बसत राहिल्यामुळे विमानातील वस्तू इतस्ततः फेकल्या जाऊ शकतात. या वस्तूंमुळे प्रवाशांना गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते. प्रवाशांनी आणि केबिन कर्मचाऱ्यांनी सीटबेल्ट बांधलेले नसतील तरीदेखील इजा होऊ शकते. टर्ब्युलन्सचा इशारा विमानातील रडारद्वारे मिळतो, त्यामुळे असा मार्ग टाळून इतर मार्गाने विमान वळवता येऊ शकते. पण कधीकधी अशी स्थिती अचानक उद्भवते किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध नसतो. अशा वेळी आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याचे प्रशिक्षण वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना मिळालेले असते.
हेही वाचा >>>निबंध लिहिण्याच्या अटीसह मुलाला जामीन; वडिलांना अटक, असं का?
प्रवाशांवर काय परिणाम?
टर्ब्युलन्समुळे उड्डाणाच्या उंचीत, वेगात अचानक मोठा बदल ओघडून येतो. याचा परिणाम केबिनमधील दाबावर होऊ शकतो. तसेच उंचीतील फेरफारामुळे गुरुत्वीय बलही वेगवेगळ्या तीव्रतेने परिणाम करते. त्यामुळे चक्कर येणे, पोटात ढवळणे, उलटी येणे असे दुष्परिणाम संभवतात. याशिवाय मोठा घटक मानसिक परिणामांचा असतो. अनेक प्रवाशांसाठी विमान प्रवास हाच मुळात धास्तीमूलक असतो. त्यामुळे उड्डाणादरम्यान एरवीही असे प्रवासी विलक्षण तणावाखाली असतात. त्यामुळे काही वेळा टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला, की अनेक प्रवासी त्या परिस्थितीा पाहूनच गर्भगळीत होतात. संपूर्ण विमान थडथडत असते आणि काही प्रवाशांना ‘आता आपले काही ओखरे नाही’ ही भावना घेरते. काही वेळा अशा प्रवाशांचे समूपदेशन करावे लागते. क्वचित प्रसंगी टर्ब्युलन्समुळे काहींनी विमान प्रवासाचा कायमस्वरूपी त्याग केल्याचीही उदाहरणे आढळतात.
टर्ब्युलन्सदरम्यान मृत्यू होऊ शकतो?
सहसा हे होत नाही. पण प्रवासी गंभीर जखमी होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. दोन वर्षांपूर्वी स्पाइसजेटच्या विमानाला अशाच तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. त्यावेळी दोन प्रवासी जखमी झाले होते. अमेरिकेत फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीनुसार, २००९ ते २०२१ या कालखंडात १४६ प्रवासी आणि केबिन कर्मचारी गभीर जखमी झाल्याची नोंद आहे.