देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या महादेव बुक ॲपच्या लीला चव्हाट्यावर आणल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने अशा डझनभर बेकायदा ऑनलाइन बेटिंग ॲपच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. या बेकायदा ॲपमुळे एक लाख कोटींच्या महसुलाचे नुकसान झाल्याचा दावा संचालनालयाने केला आहे. या ॲपच्या निमित्ताने छत्तीसगड ते दुबई असा काळ्या पैशाचा प्रवास उघड झाला. या प्रकरणाचा तपास करतानाच अनेक धक्कादायक बाबी तपासात समोर आल्या आहेत. आजही हे बेकायदा ऑनलाइन बेटिंग ॲप सुरू आहेत. यातून निर्माण होणारा काळा पैसा क्रिप्टोकरन्सी, बोगस आयात देयके तसेच शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवून पांढरा केला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींची समांतर यंत्रणा उभी राहत असून ती भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. हे ॲप का धोकादायक आहेत, याचा हा आढावा…

महादेव ॲप काय?

छत्तीसगडच्या भिलाईमधील रहिवासी असलेला सौरभ चंद्राकर हा महादेव बेटिंग ॲपचा मालक. तो दुबईत बसून महादेव बेटिंग ॲप चालवत होता. फळांच्या रस विक्रीचे काम करणाऱ्या चंद्राकार याच्या विवाह सोहळ्यात २०० कोटी रुपये खर्च झाल्यामुळेच हा प्रकार उघड झाला. या सोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांनी हजेरी लावल्याने खरे तर हा प्रकार उघड झाला. अन्यथा राजरोसपणे बेटिंग ॲप सुरू होते व कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा छत्तीसगडमार्गे दुबईला रवाना होत होता. चंद्राकार हा करोना काळात टाळेबंदी असताना सट्टेबाजाच्या संपर्कात आला आणि त्याने सट्टेबाजी अर्थात बेटिंग करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. त्यासाठी त्याने हैदराबादला जाऊन ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून बेटिंग ॲपची निर्मिती झाली. महादेव ॲप प्रकरण देशात सध्या खूप गाजत आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आहे. या ॲपची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा संशय आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे. यासोबतच हे ॲप यूजर आयडी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी केली जायची.

Fair Play Betting App Case, ED , ED seizes assets ,
फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरण : ईडीकडून आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
buldhana Makar Sankranti nylon manja disrupted electricity in Nandura city
बुलढाणा : नायलॉन मांजामुळे वीज पुरवठा खंडित; विद्युत तारा तुटल्या, १५ ते २० मीटर जळाले…
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
445 Anganwadis in Shahapur taluka in darkness due to lack of electricity connection
शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात

हेही वाचा : इस्रोने गगनयानमधील ह्युमनॉइडच्या मेंदूसाठी कवटीची रचना कशी केली?; काय आहेत तिची वैशिष्ट्ये?

ऑनलाइन बेटिंग ॲप काय आहे?

ऑनलाइन बेटिंग ॲपला देशात मान्यता नाही. तरीही विविध प्रकारच्या नावाखाली ॲप सुरू आहेत. महादेव बेटिंग ॲपवरील कारवाईनंतर तपास यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत. तरीही परदेशी बेटिंग ॲप उपलब्ध आहेत. सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायदा १८६७ नुसार देशात सट्टेबाजी आणि जुगाराला प्रतिबंध आहे. देशात सर्वत्र ते बेकायदा मानले जाते. तरीही मोबाइल ॲप तसेच विविध संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन बेटिंग ॲप सुरू आहे. क्रिकेट, फुटबॉल, बेसबॉल, टेनिस आदीं खेळांवर ऑनलाइन सट्टेबाजी उपलब्ध आहे. परदेशातील बेटिंग ॲपही ऑनलाइन उपलब्ध आहेत. आयपीएल तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात ऑनलाइन बेटिंग ॲपचा सुळसुळाट झाला होता. अखेरीस याची दखल घेऊन केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला अशा प्रकारच्या ऑनलाइन बेटिंग ॲपचा शोध घेऊन ती बंद करणे व त्याविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले आहे.

हे ॲप का धोकादायक?

ऑनलाइन बेटिंग ॲप हे बेकायदा असल्यामुळे याद्वारे फसवणूक झालेल्यांना दादही मागता येत नाही. अशा प्रकारच्या ॲपमधून मोठी फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. या ऑनलाइन ॲपवर नियंत्रण ठेवण्यासारखा कायदाही आपल्याकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे कारवाई करता येत नाही. जुगार प्रतिबंधक कायद्याचा वापर करून अशा ऑनलाइन बेटिंग ॲपवर कारवाई होऊ शकते. मात्र ती न्यायालयात टिकत नाही, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. अशा ॲपमुळे सट्टेबाजीची सवय लागणे, लाखो रुपयांचे नुकसान, एकाकीपणा वाढणे, मानसिक तणाव आदींना सामोरे जावे लागते.

हेही वाचा : भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं, महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्वाधिक तणावात; कारण काय?

ॲप सुरू आहेत का?

महादेव बेटिंग ॲपवर कारवाई करून तपास यंत्रणांनी तो बंद केला असला तरी वेगळ्या नावाने आजही भारतात ऑनलाइन बेटिंग ॲप सुरू आहे. संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि काही दक्षिण आशियाई देशांत असलेल्या कॉलसेंटर्स तसेच बुकींद्वारे ऑनलाइन बेटिंग ॲप सुरू आहे. भारत ही मोठी बाजारपेठ असल्याचे सांगितले जाते. गेमिंग ॲपच्या माध्यमातूनही काही प्रमाणात सट्टेबाजीला प्रोत्साहन मिळत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. परदेशात सुरू असणाऱ्या अशा प्रकारच्या बेटिंग ॲपला मदत करणाऱ्या भारतीयांचा सक्तवसुली संचालनालय शोध घेत आहे. हवालाद्वारे मोठी रक्कम या परदेशी कंपन्यांना पोहोचत असल्याचा संशय आहे.

संचालनालयाकडून काय कारवाई?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि विविध बँकांना सूचना देऊन आयातीच्या देयकाद्वारे परदेशात पाठविण्यात येणाऱ्या मोठ्या रकमेची माहिती संचालनालयाने मागितली आहे. याशिवाय क्रिप्टोकरन्सीमार्फतही मोठी रक्कम पाठविली जात असल्याचा संशय आहे. बँकांमधील संशयित खात्यांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना संचालनालयाने दिल्या आहेत. भाजीविक्रेता, रिक्षा चालक, छोटे किराणा व्यापारी, शिंपी आदींना काही रक्कम देऊन त्यांच्या ओळखपत्रांचा वापर करून बँकेत खाते उघडले जाते वा बोगस आयात चलने निर्माण करून चालू खात्याद्वारे परदेशात मोठी रक्कम पाठवणे असे प्रकार केले जातात. काही वेळा अशी बोगस आयात चलनांऐवजी मोठया प्रमाणात क्रिप्टोकरन्सी खरेदी केली जाते. त्याद्वारे मोठी रक्कम परदेशातील खात्यात वळती केली जाते. क्रिप्टोकरन्सी हाताळणाऱ्या बड्या कंपन्यांकडून हे प्रकार घडत नाहीत. परंतु छोट्या प्रमाणात उलाढाल करणाऱ्यांकडून हे सर्रास वापरले जात आहे. त्यातूनच काळा पैसा परदेशात पाठवला जात आहे. फायविन या बेकायदा ऑनलाइन बेटिंग ॲपमार्फत ४०० कोटी रुपये क्रिप्टोकरन्सीत गुंतवले गेले. तेथून ते आठ चिनी नागरिकांच्या वैयक्तिक खात्यात पाठवले गेले असे संचालनालयाच्या तपासात उघड झाले आहे. सट्टेबाजी आणि जुगार हे प्रचलित गुन्ह्याच्या प्रकारात मोडत नाहीत. त्यामुळे सक्तवसुली सचालनालयाला थेट कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरच संचालनालयाला गुन्हा दाखल करून चौकशी करता येते. सध्या अशा प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला तरच संचालनालयाला कारवाई करता येते. त्यामुळे संचालनालयालाही मर्यादा आहेत.

nishant.sarvankar@expressindia.com

Story img Loader