Online Shopping Safety During Diwali: दिवाळी जवळ येत आहे आणि या आनंदाच्या सणाच्या काळात अनेकजण त्यांच्या कुटुंबासोबत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या उत्साही वातावरणात घोटाळेबाजही सक्रिय होत असतात, किंबहुना झाले आहेत. सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीमध्ये झालेली वाढ ही घोटाळेबाजांसाठी सुवर्णसंधी ठरते. अनेक फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स, अविश्वसनीय ऑफर आणि अनपेक्षित ई- मेलच्या माध्यमातून ग्राहकांना फसवण्याचे काम हे स्कॅमर्स करतात. अशा परिस्थितीत, आपली आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

बनावट वेबसाइट्स आणि त्यांचे धोके

बनावट वेबसाइट्स हा ऑनलाइन घोटाळ्यांमधील सर्वात जुना आणि नेहमी वापरला जाणारा प्रकार आहे. सणासुदीच्या काळात खरेदीचा आनंद घेताना लोकांना आकर्षित करण्यासाठी घोटाळेबाज बनावट वेबसाइट तयार करतात, ज्या प्रथमदर्शनी खऱ्या वेबसाइटसारख्याच दिसतात. आकर्षक ऑफर आणि आश्चर्यकारक सवलती देऊन ग्राहकांना फसवण्याचे काम हे स्कॅमर्स करतात. या वेबसाइट्सवर पेमेंट केल्यानंतर, तुमची सर्व माहिती, बँक तपशील आणि कार्ड डिटेल्स, स्कॅमर्सकडे जातात आणि तुम्हाला उत्पादन न मिळताच तुमचे पैसे नाहीसे होतात.

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Brad Pitt Dating SCAM
Brad Pitt Dating Scam : AI वापरून ब्रॅड पिट असल्याचं भासवलं! फ्रेंच महिलेकडून लुटले ७ कोटी रुपये
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

अधिक वाचा: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

संरक्षण कसे करावे?

बनावट वेबसाइट्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही खरेदी करत असलेल्या वेबसाइटची सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेबसाइटच्या URL मधील सामान्य शुद्धलेखनाचा किंवा लांबलचक वाक्यरचनेचा शोध घ्या. याशिवाय, URL मध्ये ‘HTTPS’ प्रोटोकॉल असणे आवश्यक आहे, कारण ते वेबसाइट सुरक्षित असल्याचे दर्शवते. पॅडलॉक चिन्ह शोधणे देखील एक सुरक्षिततेचे लक्षण आहे. तसेच, अधिकृत वेबसाइट्सवरूनच खरेदी करा, जिथे आधीच्या ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया असतात किंवा ती वेबसाईट विश्वासार्ह असेल.

फिशिंग ई-मेल्स आणि त्यांचे धोके

फिशिंग ई- मेल्स हे ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरले जाणारे आणखी एक प्रभावी साधन आहे. कंपन्या अनेकदा त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी ई- मेल पाठवतात, आणि स्कॅमर्स याच पद्धती आपल्या फायद्यासाठी वापरतात. अशा ई- मेल्समध्ये आकर्षक ऑफर असतात आणि ती ई- मेल्स तुम्हाला कोणत्यातरी लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करतात. या लिंकद्वारे तुम्हाला बनावट वेबसाइटवर नेले जाते, जिथे वैयक्तिक माहिती भरावी लागते, आणि ती माहिती स्कॅमर्सकडे जाते.

फिशिंग ई- मेल्सपासून बचाव कसा करावा?

फिशिंग ई- मेल्सच्या जाळ्यात अडकणे टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई- मेलमधील अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळणे. लिंकची URLव्यवस्थित तपासा आणि पुसटशी जरी शंका असल्यास क्लिक करू नका. फिशिंग ई- मेलचे बळी ठरल्यास, वैयक्तिक माहिती, विशेषत: पेमेंट माहिती, इतर ठिकाणी शेअर होण्याचा धोका वाढतो.

बनावट शिपिंग- पार्सल घोटाळे

स्कॅमर्स शिपिंग पार्सल कंपन्यांप्रमाणेच बनावट ई-मेल्स पाठवतात, ज्या संदेशांमध्ये वस्तूच्या वितरणासाठी काही देयकांची मागणी केली जाते. ही ई- मेल्स ग्राहकांना शिपिंग तपशीलांची माहिती मिळवण्यासाठी आणि देयके भरण्यासाठी एक लिंक पाठवतात. वास्तविकता अशी असते की, हा सर्व घोटाळा असतो आणि देयकाची माहिती मिळाल्यावर स्कॅमर्स ती चोरून फसवणूक करतात.

शिपिंग घोटाळ्यांपासून संरक्षण कसे करावे?

शिपिंग घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी शिपिंग कंपनीकडून सर्व तपशीलांची माहिती करणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइटवरून शिपमेंट ट्रॅक करा किंवा वैध ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून शिपमेंटची स्थिती तपासा. यामुळे कोणत्याही शंका निर्माण करणारी ई- मेल्स त्वरित ओळखणे सोपे होते.

अधिक वाचा: Indian Air Force Day 2024: ती काळरात्र, १२१ नागरिक ..हातात फक्त दीड तास आणि भारतीय हवाईदलाचे शौर्य; काय घडलं होतं नेमकं?

फसव्या ऑफर्स आणि अतिशय कमी किमतींवर खरेदी करण्याचे आमिष

दिवाळीच्या काळात स्कॅमर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अविश्वसनीय सवलती देतात. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त सूट असलेल्या ऑफर्स पाहून ग्राहक आकर्षित होतात आणि या ऑफर्समध्ये फसवले जातात. अनेकदा, हे घोटाळे फसव्या वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे होतात. अशा प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये ग्राहक उत्पादनांसाठी ऑर्डर देतात, परंतु उत्पादन कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

फसव्या ऑफर्सपासून कसे सावध राहावे?

अतिशय कमी किंमतींवर खरेदी करण्याच्या आमिषांपासून दूर राहण्याची पहिली पायरी म्हणजे कोणत्याही ऑफरवर विश्वास ठेवण्याआधी ती ऑफर खरी आहे का हे तपासावे. अधिकृत ब्रँडच्या वेबसाइट्स किंवा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ऑफरची खात्री करा. अनोळखी वेबसाइट्सवर खरेदी करण्याआधी इतर ग्राहकांनी दिलेला फिडबॆकही पाहा.

सणासुदीचा हंगाम म्हणजे खरेदीचा हंगाम, परंतु याच काळात ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये वाढ होते. घोटाळेबाज त्यांच्या योजनांद्वारे ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. दिवाळीच्या खरेदीच्या वेळेस आपण फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. बनावट वेबसाइट्सपासून ते फिशिंग ई- मेल्सपर्यंत, घोटाळ्यांच्या अनेक प्रकारांपासून स्वत:चे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. कोणत्याही अनोळखी वेबसाइटवर खरेदी करण्यापूर्वी, ऑफर्सची सत्यता तपासणे, वैध वेबसाइट्सवरूनच खरेदी करणे आणि अनोळखी दुव्यांवर क्लिक न करणे हे उपाय आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात.

Story img Loader