– सुहास सरदेशमुख

डिजिटल व्यवहारामुळे नाण्यांचे विश्व आक्रसले. टाकसाळीमधील माणसांच्या हाताला पुरेसे काम उरले नाही. एका बाजूला देशातील रुपया जगातील १८ देशांत भाव खाऊन जात असताना टाकसाळी संकटात सापडतील अशीही भीती आहे. नव्या ‘यूपीआय’ व्यवहारामुळे हे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम

कसा आहे रुपया आणि कुठे वापरला जातो?

२० कवड्यांचा एक पै, तीन पैचा एक पैसा. २५ पैशांचे चार आणे, पन्नास पैशांचे आठ आणे म्हणजे ६.२५ पैशाचा एक आणा आणि सोळा आण्याचा एक रुपया. आता हा रुपया विविध १८ देशांत भाव खाऊन जातो आहे. खरे तर किती तरी शब्द आहेत भाषेत चलनासाठी. छदाम हाही त्यातील एक शब्द. पण छदाम म्हणजे खोटे नाणे. ‘दाम करी काम’ ही म्हण व्यवहारातील. दाम म्हणजे नाणीच. तो सांभाळणारा माणूस दामाजी. दामाजीपंत हे नाव आठवत असेल, तर ते नाव नाणे सांभाळणाऱ्यांच्या परंपरेतील. टाकसाळ आडनावही महाराष्ट्रात तसे सुपरिचित आहे. ही मंडळी टाकसाळीत काम करणारी. धातूचा रुपया पाडल्यानंतर त्याची व्यवहारातील किंमत वाढत असल्याने जगातील १८ देशांत रुपयांचा व्यवहार सुरू झाला आहे. बोस्टवाना, फिजी, जर्मनी, गुहाना, इस्रायल, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, न्युझीलंड, ओमान, रशिया, सिंगापूर, श्रीलंका, टांझानिया, युगांडा आणि युनायटेड किंगडम आदी देशांत आता रुपयांमधून व्यवहार सुरू झाले आहेत. ‘डॉलर’च्या तुलनेतील रुपयाची ही भरारी असल्याचा दावा केला जात आहे. एका बाजूला देशोदेशी रुपया पोहचत असताना टाकसाळीतील काम मात्र घटले आहे. डिजिटल व्यवहाराचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. नऊ हजार दशलक्ष क्षमतेत पूर्वी देशात नाण्यांचा व्यवहार चाले, आता तो केवळ एक हजार दशलक्ष नाण्यांपर्यंत घटला आहे.

देशात नाणी पाडणारी यंत्रणा केवढी?

नाणी पाडणाऱ्या टाकसाळींचा देशातील इतिहास तसा १५० वर्षांचा. देशातील चारही भागांत नाणी सहजपणे वितरित करता यावीत म्हणून भारताच्या चार दिशांना टाकसाळी सुरू करण्यात आल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ज्या भागात बसतात ती जागा मुंबईतील फोर्ट भागातील टाकसाळीची. सन १८२९मध्ये ही टाकसाळ उभी करण्यात आली. वार्षिक दोन हजार २०० दशलक्ष नाणी तयार करण्याची क्षमता. या टाकसाळीत नाणी तर पाडली जातात पण सोने व चांदीची शुद्धता तपासण्यासाठीची मोठी यंत्रणा येथे आहे. शिवाय देशातील विविध प्रकारची पदके तयार करण्याचेही काम मुंबई टाकसाळीमध्ये होते. या शिवाय देशात कोलकता येथे १७५७ मध्ये टाकसाळ उभी करण्यात आली. त्याची नाणी पाडण्याची वार्षिक क्षमता दोन हजार दशलक्ष एवढी. नाणी पाडण्याबरोबरच चांदीच्या शुद्धीकरणाची यंत्रणा आहे. हैदराबादमधील टाकसाळीची सुविधा १८०३ मधील. येथेही पदके बनविली जातात. शिवाय १९८८ मध्ये दिल्लीजवळ नोएडामध्ये टाकसाळ आहे. त्याची वार्षिक नाणे पाडण्याची क्षमता १३०० दशलक्ष एवढी. नाणी, सोने-चांदी व मौल्यवान जडजवाहीर यांची किंमत ठरविण्याबरोबरच मुंबईच्या टाकसाळीत वजन व मापे यंत्रसामग्री बनविली जाते.

भारतात कोणती नाणी बनतात व ती कोणत्या धातूपासून?

सध्या एक, दोन, पाच, दहा आणि २० रुपयांची नाणी चलनात आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण झाल्यामुळे १०० रुपयांचे नाणेही काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या मात्र या नाण्यांमध्ये वेगवेगळे धातू वापरले जातात. भारत सरकारने नाण्यांच्या बाबतीत काढलेल्या ६ मार्च २०१९ च्या अधिसूचनेनुसार एक रुपयांचे नाणे २० मिलीमीटरचे फेरिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनविले असून, त्यात ८३ टक्के लोह व १७ टक्के ब्राेमिअम असते. दोन रुपयांचे नाणे २३ मिलीमीटरचे असते. एक रुपया व दोन रुपयांच्या नाण्यातील धातूचे प्रमाण सारखे आहे. पाच रुपयांच्या नाण्याचा आकार २५ मिलीमीटर एवढा आहे. यात तांबे ७५ टक्के, जस्त २० आणि निकेल पाच टक्के असते. दहाच्या नाण्याचा आकार २७ मिलीमीटर असून, त्याच्या वरच्या बाजूला पितळी वर्तुळाकार रिंग असून, यामध्ये तांबे, जस्त आणि निकेल हे धातू आहेत. २० रुपयांच्या नाण्याचा आकारही दहा रुपयांएवढाच असून, यात कडेच्या बाजूचे धातू आणि मधला धातू यात फरक करण्यात आला आहे. धातू आणि नाण्याची किंमत याची तुलना केली, तर धातूची किंमत अधिक असते. त्यामुळे नाणी परत घेण्याचे धोरण असावे, अशी टाकसाळीमध्ये काम करणाऱ्यांची मागणी आहे. नोट खराब झाली किंवा काहीशी फाटली, तर ती परत घेण्याचे धोरण आहे. पण एकदा तयार केलेले नाणे चलनातून बाद करण्याचे धोरण सध्या अस्तित्वात नाही. पहिले नाणे तुर्कस्तानामध्ये तयार झाले असावे असे इतिहासकार सांगतात. ग्रीक इतिहासकार इरोडोटस यांनी नाण्याचा लिहिलेला इतिहास मोठा विलक्षण असल्याचे इतिहास तज्ज्ञ रा. श्री. मोरवंचिकर सांगतात.

हेही वाचा : UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे पाठवले? ‘या’ स्टेप्सच्या मदतीने ४८ तासांच्या आत मिळणार Refund

नाण्यांची गरज संपेल का?

तशी नाण्याची गरज आणि आंतरजालाची उपलब्धतता असा नवा सहबंध विकसित झाला आहे. आंतरजालाची उलपब्धता नसलेले देशात अनेक भाग आहेत. दुर्गम भागातील व्यवहारात नाणी आणि छोटे चलन आवश्यकच आहे. त्यामुळे लगेच नाण्याची गरज संपणार नाही. दुसरे असे, की राज्यकर्त्यांची आठवण म्हणूनही नाणी इतिहास लिहिला जातो. त्यामुळे आपापल्या कारकिर्दीमध्ये नाणी पाडून घेण्याकडे राज्यकर्त्यांचा कल असतो. त्यामुळे नाणी ही व्यवहारातील गरज आहेच. जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात नाण्यांची व्यवहारातील गरज संपणार नाही. त्यामुळे टाकसाळी लागतील. पण टाकसाळीतून लागणाऱ्या नाण्यांची गरज आणि त्या विषयी केलेली भाकिते याची गणिते बिघडू लागली आहेत. व्यवहारांची गणिते बदलली आणि ग्रामीण भागातील दुर्गम भागात नाणी पोहचविण्याची यंत्रणाही पुरेशी ठरत नसल्याने पडून असणारी नाणी हा बँकासमोरचा प्रश्न आहे. पण नाण्याची गरज पूर्णत: संपणार नाही.

suhas.sardeshmukh@expressindia.com