मागच्या काही काळापासून भारतीय सैन्य दलात महिलांचा सहभाग कसा वाढेल, महिलांना नव्या संधी कशा उपलब्ध होतील, यावर धोरणात्मक कार्य करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर केवळ महिला सैनिकांचा सहभाग असलेले पथसंचलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मार्च महिन्यात तीनही सैन्य दले, विविध मंत्रालये, सरकारी विभाग आणि संचलनात सहभागी होणाऱ्या संस्थांना एक अंतर्गत सूचना पाठवून पुढील वर्षी २६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या संचलनात केवळ महिला सैनिकांचे पथक सामील करावे, अशी सूचना केली आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या विविध संचलने, बँड, देखावे यांमध्ये केवळ महिलांचा समावेश असावा, अशी ती सूचना आहे. तथापि, सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे महिलांना संचलनात सहभागी होण्याची अधिकाधिक संधी मिळेल. तसेच सशस्त्र दलांमध्ये महिलांचा अद्याप सहभाग झालेला नाही, तो वाढविण्यासाठीदेखील सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आजवर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महिलांचा सहभाग कसा वाढत गेला, याबाबत घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा