Operation Trident: १९७१ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध अपरिहार्य असताना लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक कागद दिला, ज्यावर त्यांनी भारत पाकिस्तानशी युद्ध सुरू करेल ती तारीख लिहिली होती. ४ डिसेंबर. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतातील नऊ हवाई तळांवर बॉम्बफेक केली आणि युद्ध सुरू झाले. भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानच्या मुक्तीसाठी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही युद्धक्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. तत्कालीन पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान यांच्यातील दुवा तोडण्यासाठी नौदलाने नाकेबंदी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑपरेशन ट्रायडंट
सशस्त्र दल महिन्यांपासून युद्धासाठी तयारी करत होते. पाकिस्तानने हवाई हल्ले केल्यानंतर पश्चिम नौदल कमांडला (WNC) ‘ऑपरेशन ट्रायडंट’साठी आदेश देण्यात आले. व्हाइस अॅडमिरल एस. एन. कोहली पश्चिम नौदल मुख्यालयाचे (WNC) प्रमुख ध्वजाधिकारी कमांडर-इन-चीफ होते. त्यांनी मुंबई आणि ओखा येथील नौदल ताफ्याला रवाना करण्याचे आदेश दिले. कराची बंदरावर हल्ला चढविण्याची योजना आखण्यात आली होती. त्यासाठीची जबाबदारी २५ व्या मिसाईल बोट स्क्वाड्रन अर्थात किलर्स स्क्वाड्रनवर सोपविण्यात आली होती. त्यात पेट्या वर्गातील कात्चल आणि किल्तान तर आणि आयएनएस निर्घट, नि:पात व वीर या तीन युद्धनौका यांचा समावेश होता. एक क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका द्वारका येथे तयार ठेवण्यात आली होती, या किलर्स स्क्वाड्रनला मोहिमेत मदत करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी रशियन क्षेपणास्त्रे या युद्धनौकांवर तैनात होती. किलर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर बबुरू भान यादव यांना कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी आदेश देण्यात आला. कराची बंदरावर ३ डिसेंबरला हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु पाकिस्तानने संध्याकाळी हवाई हल्ले केल्यामुळे त्याच दिवशी ऑपरेशन सुरू करणे कठीण झाले. त्यामुळे हल्ल्याची तारीख ४ डिसेंबर करण्यात आली.
अधिक वाचा: Cold War Secret City: हिमयुद्धाचं रहस्य; ग्रीनलॅण्डच्या बर्फाखाली दडलाय अमेरिकेचा लष्करी तळ!
युद्धापूर्वी पाकिस्तानी नौदलाने कराचीकडे जाणाऱ्या सर्व व्यापारी जहाजांसाठी ७५ मैल (१२० किमी) ची सीमा रेषा तयार केली होती आणि त्या क्षेत्रात सूर्यास्त ते सूर्योदयादरम्यान कोणत्याही हालचाली न करण्याचा आदेश दिला होता. रडारवर आढळलेली कोणतीही नौका गस्त घालणारी पाकिस्तानी नौका असेल, असे गृहीत धरले जात होते. जेव्हा ‘किलर स्क्वॉड्रन’ स्ट्राइक ग्रुप कराचीच्या ११२ किमी दक्षिणेस पोहोचला, तेव्हा रडारवर ७० किमी अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेला एक लक्ष्य दिसले आणि ६८ किमी उत्तर-पूर्वेस दुसरे लक्ष्य आढळले. स्ट्राइक ग्रुपने त्यांची ओळख युद्धनौकांप्रमाणे केली आणि ७५ किमीच्या श्रेणीतील स्टायक्स क्षेपणास्त्रांची तयारी केली. आयएनएस निर्घातने उत्तर-पश्चिमेकडील लक्ष्यावर दोन स्टायक्स क्षेपणास्त्रे डागली ज्यामुळे पीएनएस खैबरला जलसमाधी मिळाली . आयएनएस नि:पातने दोन क्षेपणास्त्रे डागून व्यापारी जहाज एमव्ही व्हीनस चॅलेंजर बुडवले. हे जहाज शस्त्रांनी भरलेले असल्याचे सांगितले जाते. आयएनएस वीरने ‘पीएनएस मुहाफिज एक तटीय खाणी शोधणारे जहाज नष्ट केले. व्हाइस अॅडमिरल जी.एम. हिरानंदानी यांनी त्यांच्या पुस्तकात ‘ट्रान्झिशन टू ट्रायम्फ’ मध्ये या ऑपरेशनचे विश्लेषणात्मक विवरण दिले आहे. जेव्हा स्ट्राइक ग्रुप कराचीकडे सरकत होता तेव्हा आयएनएस निर्घातच्या रडारने विमानविरोधी ट्रेसर शेल्सना चुकून विमान समजले, ज्यामुळे पाकिस्तानी हवाई हल्ल्याच्या भीतीचा माहोल आणि गोंधळ निर्माण झाला.
कराची बंदर आगीत होरपळले
आयएनएस नि:पातवर असलेल्या कमांडर बी.बी. यादव यांनी केमारी तेलशुद्धीकरण केंद्रावर उर्वरित स्टायक्स क्षेपणास्त्रे डागून त्याला आगीत लोटले. हल्ला यशस्वी झाला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा क्षण भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वांत गौरवशाली मानला जातो. चार दिवसांनी ऑपरेशन पायथॉनने पाकिस्तानी नौदलाच्या पराभवावर शेवटचा प्रहार केला. आयएनएस विनाश, तलवार आणि त्रिशूल यांनी पीएनएस ढाका बुडवले एमव्ही हार्माटन आणि एमव्ही गल्फ यांना हानी पोहोचवली आणि केमारी तेलशुद्धीकरण केंद्र अनेक दिवस जळत राहिले.
अधिक वाचा: Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
पाकिस्तान नौदलाचे पश्चिम आघाडी वरील अस्तित्व पूर्णतः नष्ट झाले आणि भारताने सागरी प्रभुत्व मिळवले. या क्षेत्रात प्रथमच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. कमांडर बबुरू भान यादव यांना त्यांच्या शौर्यपूर्ण कृतीसाठी महावीर चक्र प्रदान करण्यात आले. भारतीय नौदल या लढाईच्या सन्मानार्थ दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करते. कराची बंदर आणि तेलशुद्धीकरण केंद्राच्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तानला सुमारे ३ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आणि पाकिस्तानी विमानांसाठी तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यामुळे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील सागरी संपर्क (Sea Lines of Communication – SLOC) तुटला आणि कराचीमार्गे पाकिस्तानला अमेरिकन शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबला.