Dr. Babasaheb Ambedkar in Hollywood movie गेल्याच महिन्यात ‘ओरिजिन’ हा सिनेमा अमेरिकेतील अनेक चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचे कथानक जात, रंग आणि वंशभेद यांसारख्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटकांभोवती फिरते. चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित आहे. इसाबेल विल्करसन यांचे ‘कास्ट: द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स’ हे पुस्तक या चित्रपटाचे प्रेरणास्थान आहे. लेखिकेने जात, रंग, वंश यांच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेताना भारत, जर्मनी आणि अमेरिकेत प्रवास केला, आणि जगातील तीन मुख्य समस्यांची सांगड घालताना तिने कशा प्रकारे संघर्ष केला हे यात चित्रित करण्यात आले आहे. याच तिच्या प्रवासादरम्यान तिला गवसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. हे चित्रण प्रेरणादायी असले तरी जागतिक सिनेमात बाबासाहेबांची व्यक्तिरेखा प्रदर्शित व्हायला अनेक दशकांचा कालावधी लागला. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सिनेमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल कशा स्वरूपात घेतली आहे, हे जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?
भारतीय सिनेमा: १९७० नंतरचा बदलता कालखंड आणि बाबासाहेब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा वेध घेणारा सिनेमा काहीशा विलंबानेच भारतीय सिनेदृष्टीत तयार झाला. ७० च्या दशकातील काही सिनेमांमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेचे- पुतळ्याचे ओझरते दर्शन होते. त्यात १९७८ साली प्रदर्शित झालेल्या “मुकद्दर का सिकंदर” या चित्रपटाच्या शीर्षक गीताचा समावेश आहे. यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९८१ साली भारतीय फिल्म डिव्हिजनने ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा माहितीपट तयार केला. चित्रपटाचे दिग्दर्शन ए.व्ही. भाश्याम यांनी केले होते. या माहितीपटात डॉ. आंबेडकरांचे जीवन तसेच येवला परिषद, गोलमेज परिषद, धम्म दीक्षा आणि त्यांचे निर्वाण यांसारख्या घटनांचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आणि इथूनच भारतीय सिनेमांच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर चित्रपट निर्मितीची परंपरा सुरु झाली.
प्रादेशिक चित्रपट आणि बाबासाहेब
हिंदी चित्रपटांपेक्षा प्रादेशिक चित्रपटांना बाबासाहेब हे अधिक जवळचे भासले. बाबासाहेबांवरील ‘भीम गर्जना’ (१९८९) ही पहिली फीचर फिल्म मराठी भाषेत तयार झाली. याचे दिग्दर्शन विजया पवार यांनी केले होते तर निर्मिती नंदा पवार यांनी केली होती. या चित्रपटात बाबासाहेबांची मुख्य भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती. त्यानंतर १९९१ साली कन्नड भाषेत ‘बालक आंबेडकर’ या चित्रपटाची निर्मिती झाली. नावाप्रमाणे या चित्रपटाची कथा बाबासाहेबांच्या बालपणातील संघर्षाशी निगडित होती. या सिनेमाचे दिग्दर्शन बसवराज केस्तूर यांनी केले, तर चिरंजीवी विनय यांनी बाल आंबेडकरांची भूमिका साकारली होती. १९९२ साली ‘डॉ. आंबेडकर’ हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक परपल्ली भारत यांनी केले होते. तर या चित्रपटाची निर्मिती डॉक्टर पद्मावती यांची होती. अभिनेता आकाश खुराना यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली. या चित्रपटात विविध तेलुगू कलाकारांनीही काम केले आहे. यानंतर लगेचच १९९३ साली ‘युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. शशिकांत नलावडे दिग्दर्शित आणि माधव लेले निर्मित या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अभिनेते नारायण डुलके यांनी साकारली होती. याशिवाय अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पिकर यांसारख्या दर्दी कलाकारांचीही या चित्रपटात हजेरी होती. ‘युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ हा बाबासाहेबांवरील दुसरा मराठी चित्रपट होता.
अधिक वाचा: बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !
बाबासाहेबांचा पहिला द्वैभाषिक सिनेमा
२००० साली जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रुथ’ हा भारतीय इंग्रजी- हिंदी द्वैभाषिक चित्रपट प्रदर्शित झाला; अशा स्वरूपाचा बाबासाहेबांशी निगडित पहिला सिनेमा होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विख्यात अभिनेता मामूट्टी आहेत. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली, तर मृणाल कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी मामूट्टी यांना १९९८ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी जख्म या चित्रपटासाठी अजय देवगण यानांही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळेच मामूट्टी आणि अजय देवगण यांच्यात हा पुरस्कार वाटून देण्यात आला.
२००० नंतरचा सिनेमासृष्टीतील कालखंड आणि बाबासाहेब
‘बालक आंबेडकर’ हा १९९१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तयार करण्यात आलेला पहिला कन्नड चित्रपट होता. आंबेडकरांचे बालपणीचे अनुभव या चित्रपटात मांडण्यात आले होते, यानंतर कन्नड भाषेत बाबासाहेबांच्या जीवनावर आणखी एक सिनेमा आला, यात त्यांच्या आयुष्यतील संपूर्ण संघर्ष चित्रित करण्यात आला. २००५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अभिनेता विष्णुकांत बीजे यांनी केली होती. अभिनेत्री तारा हिने बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी रमाबाईची भूमिका साकारली होती, तर अभिनेत्री भव्याने दुसऱ्या पत्नीची म्हणजेच डॉ. सविता आंबेडकरांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले.
इतर सिनेमातून दिसणारे बाबासाहेब!
समाजसुधारक आणि तर्कवादी पेरियार ई.व्ही. रामासामी यांच्या जीवनावर आधारित तमिळ भाषेतील चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञान राजसेकरन यांनी केले होते. या चित्रपटात बाहुबलीतील कट्टप्पा हे पात्र साकार करणारा अभिनेता सत्यराजन यांनी पेरियार यांची भूमिका साकारली होती. बाबासाहेब आणि रामास्वामी पेरियार या दोघांचाही एकमेकांवर प्रभाव असल्याने या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका असणे साहजिकच होते. या चित्रपटात अभिनेते मोहन रमन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती. यानंतर २०१० मध्ये ‘डेबू’ हा संत गाडगेबाबांच्या आयुष्यावर चित्रपट प्रदर्शित झाला. संत गाडगेबाबा आणि बाबासाहेब यांच्यातील ऋणानुबंध सर्वश्रुत आहे. निलेश जळमकरांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. बाबासाहेबांच्या निर्वाणाने संत गाडगेबाबा यांना खूप दु:ख झाले होते. या चित्रपटात डॉ. आंबेडकरांची व्यक्तिरेखाही होती हे वेगळे सांगायला नको. चित्रपटात दोन जातीविरोधी नेत्यांमधील परस्परसंवाद दाखवणारे एक दृश्य आहे.
‘बोले इंडिया, जय भीम’ हा चित्रपट एल.एन. हरदास यांच्या जीवनावर आधारित आहे. “जय भीम” ही घोषणा देण्याचे श्रेय हरदास यांना दिले जाते. सुबोध नागदेवे दिग्दर्शित हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. अमोल चिव्हाणे यांनी एल.एन. हरदास यांची तर डॉ.आंबेडकरांची भूमिका श्याम भीमसरिया यांनी केली. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सत्यशोधक’ या चित्रपटातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका खुद्द दिग्दर्शक निलेश जलमकर यांनीच साकारली आहे.
अधिक वाचा: भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?
सिनेमातील रमाबाई आंबेडकर
बाबासाहेबांना घडवण्यात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे योगदान आणि साथ मोलाची ठरते. रमाबाईंनी संपूर्ण संघर्षात बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली आणि १९३५ साली वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित जवळपास सर्व बायोपिकमध्ये रमाई उपस्थित आहेत. २०१० साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात अभिनेत्री निशा परुळेकर यांनी माता रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती, तर गणेश जेठे यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती. कन्नड भाषेतही रामाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आला होता. याचे दिग्दर्शन एम रंगनाथ यांनी केले होते. तर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सिद्धाराम कर्णिक यांनी केली होती, तर यगना शेट्टी यांनी माता रमाबाई यांची भूमिका साकारली होती.
२०१९ साली बाळ बरगाले दिग्दर्शित रमाई नावाचा मराठी चित्रपट हा रमाबाई आंबेडकर यांच्यावरील तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रा. प्रगती खरात, मनीषा मोटे आणि चंद्रकांत खरात यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री विणा जामकर यांनी रमाबाईंची प्रमुख भूमिका साकारली, तर अभिनेता सागर तळाशीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१९ मध्ये बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त प्रदर्शित झाला होता.