Origin of the Indus Script भारताच्या इतिहासात प्राचीन सिंधू संस्कृतीचे पर्व अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या संस्कृतीच्या शोधाने भारतीय इतिहासाला एक नवी कलाटणी दिली. मौखिक परंपरेत नेहमीच भारताच्या समृद्ध इतिहासाची चर्चा करण्यात आली. परंतु या समृद्ध इतिहासाला साक्ष देण्याचे काम सिंधू संस्कृतीच्या शोधाने केले. जगातील चार मुख्य प्राचीन संस्कृतींमध्ये सिंधू संस्कृतीचा समावेश होतो. भारताच्या इतिहासातील आद्य नागरीकरणाचे पुरावे या संस्कृतीने दिले. ही संस्कृती उघडकीस आल्याने भारतात तब्बल ५००० वर्षांपूर्वीही लेखनकला अवगत असल्याचे पुरावे सिंधू लिपीच्या स्वरूपात उघड झाले. असे असले तरी एका संशोधनाने मात्र सिंधू संस्कृतीतील लोकांना खरंच लेखनकला अवगत होती का, हा प्रश्न उपस्थित केला. त्याच संदर्भात घेतलेला हा आढावा.

हे संशोधन नेमके कोणी केले?

२० व्या शतकाच्या प्रारंभीपासून काही संशोधकांनी सिंधू लिपी नक्की भाषा आहे का असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामागील मुख्य कारण म्हणजे उत्खननात ज्या काही सिंधूकालीन मुद्रा सापडल्या आहेत त्यावर अगदी कमी प्रमाणात सिंधू लिपीची चिन्हे आहेत, त्या वर्णांची संख्या ५ ते २६ अशी आहे. त्यामुळे इतिहासकार स्टीव्ह फार्मर, संगणक भाषाशास्त्रज्ञ रिचर्ड स्प्रॉट आणि इंडॉलॉजिस्ट मायकेल विट्झेल यांचा समावेश असलेल्या एका संशोधकांच्या गटाने २००४ मध्ये ‘द कोलॅप्स ऑफ इंडस स्क्रिप्ट थिसीस: द मीथ ऑफ अ लिटरेट हरप्पन सिव्हिलायझेशन’ या शीर्षकाचा एक शोधनिबंध लिहिल्यानंतर या विषयावरील वादाला तोंड फुटले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अधिक वाचा:  सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

हे संशोधन काय नमूद करते?

सिंधू लिपीत भाषा-आधारित लेखन प्रणाली नाही तसेच या लिपीत आढळणारी चिन्हे राजकीय आणि धार्मिक महत्त्वाची अभाषिक प्रतिके आहेत असा दावा संशोधनकर्त्यांनी या शोधनिबंधात केला. या शोधनिबंधाने सिंधू संस्कृती ही साक्षर सभ्यता होती या सार्वत्रिक स्वीकारल्या गेलेल्या सिद्धांताचे खंडन केले. इतकेच नाही तर या संस्कृतीचा संबंध द्रविड किंवा संस्कृत लिपीशी जोडला जातो, त्या गृहितकांवरही पूर्वग्रह वैचारिक प्रेरणेचा आरोप करण्यात आलेला आहे. संस्कृत आणि द्रविड या भाषांचे मूळ सिंधू संस्कृतीत शोधण्याच्या मानसिकतेमागे राजकीय हेतू दडल्याचेही नमूद करण्यात आले आहे. किंबहुना शास्त्रीय भाषेच्या पोषाखाखाली हे हेतू झाकले गेले असून गेल्या दोन दशकांमध्ये सिंधू लिपी संशोधनात या हेतूंनी वाढती भूमिका बजावली आहे,” असे नमूद करण्यात आले आहे.

या संशोधनावर इतर अभ्यासकांची मते काय आहेत?

फार्मर आणि त्यांच्या संशोधक चमूने केलेल्या संशोधनानुसार सिंधू लिपीत भाषा समाविष्ट नाही, त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सिंधू लिपीतील चिन्हे ही राजकीय किंवा धार्मिक हेतूंसाठी वापरली गेली असून त्यासाठी तत्कालीन संस्कृतीने त्यासाठी लिखाण नाकारले असेही नमूद करण्यात आले आहे. या संशोधनात मांडलेल्या सिद्धांतावर अनेक विद्वानांनी कठोर टीका केली आहे. आस्को पारपोला हे सिंधू लिपीच्या संशोधनातील मोठे संशोधक आहेत. पारपोला यांनी फार्मर आणि त्यांच्या चमूने केलेल्या संशोधनातील गृहितकांचे खंडन केलेले आहे. पारपोला यांनी सिंधूकालीन लिपी लहान असल्यामुळे ती लिपी/भाषा असू शकत नाही या फार्मर आणि त्यांच्या चमूने मांडलेल्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. इजिप्शियन हायरोग्लिफिक लिखाणही अशाच स्वरूपाचे होते, त्यामुळे सिंधूलिपीतील लेखन प्रणाली नाकारण्यासाठी हा निकष ठरू शकत नाही. असे पारपोला नमूद करतात.

अधिक वाचा: सिंधू लिपीचा द्रविडीयन लिपीशी संबंध आहे का? काय सांगते नवीन संशोधन?

निरक्षरता नाही तर व्यावसायिक सुज्ञता

बहता अनसुमाली मुखोपाध्याय (सिंधू लिपी अभ्यासक) यांनीही सिंधू संस्कृतीतील लोकांना निरक्षर ठरविण्याच्या या संशोधनातील दाव्याला विरोध दर्शविला आहे. भाषेपेक्षा सिम्बॉल किंवा प्रतिकात्म चिन्ह म्हणून सिंधूकालीन मुद्रांवर ही चिन्हे अस्तित्त्वात आली, असे प्रतिपादन त्या करतात. मुखोपाध्याय यांच्या मताचे समर्थन भाषातज्ज्ञ पेगी मोहनही करतात. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे सिंधू लिपीला लिपी म्हणणे बंद केले पाहिजे आणि हॉलमार्किंग सिस्टमसारखे काहीतरी मानले पाहिजे. याचेच स्पष्टीकरण देताना मुखोपाध्याय म्हणतात “आजही भारतातील धोब्यांची स्वतःची चिन्हे आहेत जी त्यांच्या कामात उपयुक्त ठरतात, परंतु त्याला भाषा किंवा लिपी म्हणता येणार नाही”. बहुतांश प्रागैतिहासिक संस्कृतींनी आज आपण ज्या प्रकारे एखादी कथा लिहितो, त्या प्रमाणे लिखाण केलेले नाही. परंतु व्यावसायिक माहिती मात्र त्यांच्याकडून नोंदविण्यात आली. भारताला मौखिक परंपराचा वारसा असल्याने कथा, पौराणिक गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली. त्यामुळे त्या लिहिण्याची गरज भासली नाही. त्यामुळे फक्त व्यावहारिक गोष्टींची नोंद राहिली. सिंधू लिपीतील चिन्हांमध्येही व्यापाराशी सलंग्न गोष्टींचीच नोंद मागे शिल्लक राहिली आहे. त्यामुळे इतर लिखाण सापडत नाही. किंबहुना या लिपीतील चिन्ह व्यापारी देवघेव, कर वसुली स्टॅम्प सारख्या बाबींसाठी वापरली गेल्याचा निष्कर्ष मुखोपाध्याय यांनी मांडला आहे. पेगी मोहन सुचवितात की, सिंधू संस्कृती विस्तीर्ण प्रदेशात पसरलेली होती. त्यामुळे लोक एकसमान भाषा बोलत असण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सिंधू कालीन लिपीतील चिन्हे ही व्यावसायिक कामासाठी वापरली गेली असावी.

इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञ पाओलो बियागी यांनी नमूद केल्याप्रमाणे सिंधू लिपी कोणत्याही भाषेशी काटेकोरपणे संबंधित नाही. १९९० च्या दशकात ओमानमधील पुरातत्त्व मोहिमेत त्यांना एका ठिकाणी सिंधू लिपीतील शिलालेख सापडला होता.ते म्हणतात, “ओमान हे सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यामध्ये असल्यामुळे द्विभाषिक काहीतरी सापडेल या आशेने आम्ही उत्खनन सुरू केले. “परंतु आम्हाला सिंधू आणि मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापाराच्या इतर खुणा सापडल्या तरीही भाषेच्या बाबतीत आम्हाला काहीही सापडले नाही.” परंतु आस्को पारपोला यांच्या मतानुसार सिंधू लिपी भाषेचे प्रतिनिधित्व करत नाही याबद्दल त्यांना शंका आहे. ते म्हणतात “माझा विश्वास आहे की भाषा लिहिण्यासाठी लिपी नेहमीच असते”. मुखोपाध्याय नमूद करतात की, जेव्हा कोणतीही प्राचीन लिपी सापडते तेव्हा लोकांना ती खूप रोमँटिक वाटते. “त्यांना जुने शास्त्र किंवा कविता यासारख्या गोष्टी सापडतील अशी आशा असते. ‘लिनियर बी’चा उलगडा होत असतानाही, काही विद्वानांना होमरच्या इलियड आणि ओडिसीचे स्निपेट्स सापडतील अशी आशा होती. परंतु प्रत्यक्ष संशोधनात तिथल्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती मिळाली. हाच नियम सिंधू संस्कृतीलाही लागू होऊ शकतो, सिंधू लिपीतील चिन्हे तत्कालीन अर्थव्यवस्था कशी चालली होती याबद्दल बरेच काही सांगू शकतात,” असे मुखोपाध्याय नमूद करतात.

अधिक वाचा: Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?

पुढे बियागी असेही नमूद करतात की, सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांचे उत्खनन होऊन बराच काळ लोटला आहे. त्यामुळे अजून सखोल संशोधनाची गरज आहे. आपल्याला सिंधू संस्कृती कशी नष्ट झाली हे माहीत आहे. परंतु त्यांच्या उत्पत्तीविषयी काहीच माहीत नाही. त्यामुळे सिंधू लिपीच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल संशोधनाची गरज आहे.

Story img Loader