2,500-Year-Old ‘Yagya Kund’ Found During Excavationराजस्थानच्या भरतपूर मधील बहज या गावात सुरू असलेल्या उत्खननात भारतीय पुरातत्त्व विभागाला तब्बल २५०० वर्षांपेक्षा जुनी १५ यज्ञकुंडं सापडली आहेत. केवळ यज्ञकुंडंच नाही तर काही तांब्याची नाणी, मृदभांडी आणि काही मूर्तींचे अवशेषही सापडलेले आहेत. पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते हे स्थान प्राचीन व्यापारी शहर आणि धार्मिक तीर्थक्षेत्र असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी होणारे उत्खनन भारतीय पुरातत्त्व खात्याच्या जयपूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. जयपूर विभागातील पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक विनय गुप्ता यांनी सांगितले की, ५० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ब्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खननाचे काम सुरू करण्यात आले आहे. उत्खननादरम्यान सापडलेले पुरावे अतिशय अद्भुत आहेत. असा पुरावा पूर्वीच्या उत्खननात सापडलेला नाही. हे उत्खनन आणखी काही काळ सुरू राहणार असून काही अवशेषांसह इतर महत्त्वाचे पुरावे सापडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. बहज गावातील एका ढिगाऱ्यावर चार महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. उत्खननापूर्वीच पुरातत्त्व विभागाच्या पथकाने या ढिगाऱ्याची तपासणी करून येथे प्राचीन काळातील अवशेष असल्याची शहानिशा केली आणि मानवी संस्कृतीचा शोध घेण्यासाठी उत्खनन करण्याची विनंती भारत सरकारकडे केली होती. त्यानंतर भारत सरकारने आर्थिक तरतूद मंजूर करून येथील उत्खननास परवानगी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा