OCI card holders भारतातून दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक परदेशी जातात. काही लोक शिकण्यासाठी जातात; तर काही जण नोकर्यांसाठी. सर्वाधिक भारतीय कॅनडा, अमेरिका, ब्रिटनमध्ये आहेत. या विकसित देशांमध्ये भारतीय एका काळानंतर स्थायिक होतात, असे पाहायला मिळाले आहे. त्या देशात स्थायिक झाल्यामुळे आणि तेथील नागरिकत्व स्वीकारल्यामुळे ते भारतीय नागरिक राहत नाही. अशाच काही परदेशस्थ भारतीयांना ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडियाचे कार्ड दिले जाते. नुकतीच ओसीआय कार्डधारकांनी ओसीआय नियमात बदल केल्याबद्दल तक्रार केली. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (२८ सप्टेंबर) सांगितले की, ओसीआय नियमांमध्ये कोणतेही बदल केले गेलेले नाहीत. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाने स्पष्ट केले की, २०२१ पासून लागू करण्यात आलेल्याच तरतुदी पुढेही लागू राहतील. परंतु, ओसीआय कार्ड नक्की काय आहे? या कार्डधारकांना नक्की कोणते अधिकार मिळतात? ओसीआय नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत का? आपण जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा