इंदिरा गांधींच्या हत्येनंतर साडेसहा वर्षांनी म्हणजेच २१ मे १९९१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचीही हत्या झाली. तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे LTTE संघटनेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींचा मृत्यू झाला. भारतात तेव्हा लोकसभेची निवडणूक सुरू होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठीच राजीव गांधी तमिळनाडूमध्ये गेले होते. त्यांची हत्या हा भारतासाठी मोठा धक्का होता. २० मे, १२ जून व १५ जून अशा तीन टप्प्यांमध्ये लोकसभेची ही निवडणूक पार पडली. पंजाबमध्ये फेब्रुवारी १९९२ मध्ये मतदान झाले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसबद्दल सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली होती आणि काँग्रेसला विक्रमी बहुमत मिळाले होते. मात्र, राजीव गांधींच्या हत्येनंतर तसे काही घडले नाही. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला आणि पी. व्ही. नरसिंह राव भारताचे पंतप्रधान झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा