अमोल परांजपे

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये उसळलेला आगडोंब सगळ्या जगाने पाहिला आणि त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खान यांची अटक बेकायदा असून त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्याययंत्रणा आणि जनक्षोभ यांच्या कात्रीत सापडलेले शहाबाज शरीफ सरकार आता काय भूमिका घेणार ? दंगलींमुळे त्यांचे सरकार अधिक खिळखिळे झाले आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न…

Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar stake claim to form Mahayuti govt in Maharashtra
मुख्यमंत्री केवळ तांत्रिक व्यवस्था’ : तिघांनाही एकत्रित निर्णय घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली?

पंतप्रधान असताना खान यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे आरोप त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ठेवले आहेत. अशी सुमारे १०० गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल आहेत. यापैकीच बांधकाम व्यावसायिक मलिक रियाझ यांना जमीन हस्तांतरण करताना आर्थिक गैरव्यवहार करून देशाच्या तिजोरीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत ‘नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो’ (एनएबी) या भ्रष्टाचारावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेने खान यांना मंगळवारी अटक केली. मात्र ही अटक करताना काही संकेतांची पायमल्ली केल्याचे समोर आलेल्या दृश्यांवरून दिसते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटक झाली ती न्यायालयामध्ये दुसऱ्या एका प्रकरणी त्यांची ‘बायोमेट्रिक’ माहिती घेतली जात असताना… खान यांच्या पाकिस्तान तहरीर-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने अटकेनंतर जारी केलेल्या चित्रफितींमध्ये त्यांना अक्षरश: खेचत गाडीत बसविले जात असल्याचे दिसते. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयातील एका इमारतीच्या काचा फोडून ‘रेंजर्स’चे (पाकिस्तानचे निमलष्करी दल) सैनिक आत शिरले आणि त्यांनी खान यांच्या वकिलांना मारहाण केली.

पाकिस्तानात सध्या काय सुरू आहे?

या सर्व घडामोडींमुळे पेशावर, क्वेटा, इस्लामाबाद, कराची, लाहोर यासह संपूर्ण देशात खान समर्थकांनी हिंसक आंदोलने सुरू केली आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून ३००पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आहे. आंदोलकांनी सरकारी कार्यालये, पोलीसचौक्या, लष्कराच्या इमारती, सरकारी वाहने पेटवून दिली आहेत. शहरांमधील अनेक महत्त्वाचे रस्ते निदर्शकांनी अडवून धरले आहेत. पीटीआयची ताकद जास्त असलेल्या भागांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान खपवून घेणार नाही, असा इशारा दिला असून पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे २ हजार दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे.

तुर्कस्तानमधील निवडणुकीत कुणाचे पारडे जड? एर्दोगन यांची दशकभराची सत्ता संपुष्टात येणार?

खान यांच्या अटकेनंतर एवढी तीव्र प्रतिक्रिया का उमटली?

१९७७ पासून आजतागायत पाकिस्तानच्या सात पंतप्रधानांना पायउतार झाल्यानंतर अटक झाली आहे. त्या देशामध्ये अशा ‘बदल्याच्या राजकारणा’ची जुनी परंपरा आहे. शिवाय देशाची सतत ढासळत चाललेली आर्थिक स्थिती, महागाई, गरिबी, दहशतवादी कारवायांमधील वाढ, गेल्या वर्षी आलेला महापूर यामुळे तेथील जनता मेटाकुटीला आली आहे. पूर्वाश्रमीचे सर्वोत्तम क्रिकेटपटू असलेल्या खान यांची पाकिस्तानातील लोकप्रियता वादातीत आहे. त्यांना वर्षभरापूर्वी अविश्वास प्रस्तावात पराभूत झाल्याने पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले असले तरी त्यांना अद्याप मोठा जनाधार आहे. त्यांची गच्छंती ही अन्यायकारक असल्याचे चाहत्यांचे ठाम मत आहे.

नोव्हेंबर २०२२मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला आणि पायाला दुखापत झाली. त्यानंतर सरकार आणि लष्कराने आपल्या हत्येचा कट केल्याचा आरोप खान यांनी केला. परिणामी त्यांच्या पाठीराख्यांमध्ये सरकारविरोधात अधिकच संतापाची भावना निर्माण झाली आहे. शिवाय गरज पडेल, तेव्हा योग्य पद्धतीने संदेश पोहोचवून एकाच वेळी उठाव करण्याची तगडी यंत्रणा त्यांच्या पक्षाकडे आहे. अटकेची दृश्ये तातडीने ‘व्हायरल’ करून जनभावना भडकाविणे, अटकेपूर्वी तयार केलेली खुद्द खान यांची ध्वनी चित्रफीत प्रसृत करून त्याद्वारे निदर्शनांचे आव्हान करणे, सर्व पक्ष कार्यालयांमध्ये ‘निरोप’ पोहोचवून कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे हे त्यांच्या पक्षाला व्यवस्थित जमते. अटकेनंतर झालेली हिंसक निदर्शने ही खान यांची लोकप्रियता आणि त्यांच्या पक्षाची यंत्रणा यांचा एकत्रित परिणाम आहे.

इम्रान खान यांच्यावर कोर्टाबाहेर अटकेची कारवाई, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अल-कादिर ट्रस्ट प्रकरण’ नेमके काय आहे? जाणून घ्या… 

पुढे काय होईल?

पीटीआयच्या नेत्यांची देशभरात धरपकड झाली असली तरी हिंसाचार थांबण्याची चिन्हे नाहीत. खान यांची सुटका आणि त्यांना पुन्हा सत्ता बहाल करणे हे त्यांच्या पाठीराख्यांचे लक्ष्य आहे. शहाबाज सरकार मात्र इम्रान यांना गजाआडच ठेवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे एका प्रकरणात जामीन मिळाला की दुसऱ्या प्रकरणात अटक करायची, अशी रणनीती आखली जाऊ शकते. मात्र त्यामुळे पाकिस्तानात शांतता प्रस्थापित होणार नाही. महागाई, कंगाली यांवरून जनतेचे लक्ष उडविण्यासाठी इम्रान खान यांचा मुद्दा काही काळ तरी पेटवत ठेवणे शरीफ सरकारच्या राजकीय हिताचे आहे.

Story img Loader