मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधील राष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. काही दिवासांपूर्वीच इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रयत्न फसला. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी (१५ मार्च) पुन्हा एकदा इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांना अटक का केली जात आहे? त्यांच्यावर कोणते आरोप आहेत? पाकिस्तानमधील सध्या राजकीय स्थिती कशी आहे? हे जाणून घेऊ या.

माझा मृत्यू झाला तरी लढा, कार्यकर्त्यांना इम्रान खान यांचे आवाहन

इम्रान खान पुन्हा एकदा अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी पोलीस त्यांच्या लाहोरमधील निवासस्थानी धडकले होते. मात्र इम्रान खान घरी नसल्यामुळे अटकेची कारवाई टळली. त्यानंतर इम्रान खान यांनी एक व्हिडीओ जारी करत पीटीआयच्या कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत लढण्याचा आवाहन केले. मला तुरुंगात डांबण्यात आले किंवा माझा मृत्यू झाला तरी, तुम्ही सरकारविरोधात लढावे, असे आवाहन इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे पाकिस्तानमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
deputy chief minister validity loksatta
विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?

हेही वाचा >>> विश्लेषण : डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत दुसऱ्यांदा भारत… न्यूझीलंडची कशी झाली मदत? अंतिम सामन्यात आव्हाने कोणती?

पोलिसांवर दगडफेक, तणावाची स्थिती

पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पोलीस इम्रान खान यांना अटक करण्यासाठी गेले होते. शस्त्रांनी सज्ज असेलेल्या वाहनांमधून पोलीस पोहोचले होते. मात्र इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झालेल्या पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या माऱ्याचा वापर करावा लागला.

इम्रान खान यांना पुन्हा एकदा अटक करण्याचा प्रयत्न का झाला?

इम्रान खान यांच्यावर ‘तोशखाना प्रकरणी’ अटकेची टांगती तलवार आहे. पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तू त्यांनी तोशखाना विभागात जमा केल्या नाहीत. तसेच जुजबी रक्कम देऊन त्यांनी या भेटवस्तू खरेदी करून विकल्या, असा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. याच प्रकरणात इस्लामाबाद येथील सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरु आहे. मात्र इम्रान खान या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सातत्याने अनुपस्थित राहत आहेत. याच कारणामळे इस्लामाबाद न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी पहिले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. नवे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी इम्रान खान यांना पुन्हा एकदा अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीटीआय कार्यकर्त्यांचा रोष आणि इम्रान खान त्यांच्या निवासस्थानी नसल्यामुळे पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत.

हेही वाचा >>> विश्लेषण: भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांची अधिक नुकसान भरपाईची मागणी सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?

महिला न्यायाधीशाला धमकाल्याप्रकरणी अटक वॉरंट

एकीकडे तोशखाना प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे आणखी एका खटल्यात अन्य न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यांच्यावर एका महिला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांना धमकावल्याच्या आरोप आहे. याच प्रकरणात त्यांच्याविरोधात दुसरे वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र कोर्टाने हे वॉरंट १६ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

तोशखाना प्रकरण काय आहे?

ऑगस्ट २०२२ मध्ये पाकिस्तानमधील मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तोशखाना प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तोशखाना प्रकरण चर्चेत आले. पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाकडे उघड केली नाही. तसेच त्यांनी या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या, असा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला.

हेही वाचा >>> विश्लेषण : पंजाबमध्ये शेकडो शस्त्र परवाने रद्द, कारण काय? भारतीय शस्त्र अधिनियम काय सांगतो? वाचा सविस्तर

४ भेटवस्तूंची विक्री केल्याचे केले कबूल

पाकिस्तानमध्ये तोशखाना विभागाची १९७४ साली स्थापना झालेली आहे. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या भेटवस्तू नियमाप्रमाणे या विभागात जमा केल्या जातात. निमयाप्रमाणे लोकप्रतिनिधींना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची या विभागाला माहिती देणे बंधनकारक असते. २०१८ साली इम्रान खान सत्तेवर आले. यावेळी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाला देण्यास नकार दिला. तसे केले तर अन्य देशांशी असलेल्या संबंधावर परिणाम पडेल, असा दावा इम्रान खान यांनी केला. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला पत्र लिहून मिळालेल्या भेटवस्तूंपैकी साधारण ४ भेटवस्तूंची विक्री केल्याचे कबूल केले. विक्री केलेल्या भेटवस्तूंची तोशखाना विभागाला उचित किंमत दिल्याचाही दावा त्यांनी केला होता.

तोशखाना विभागाला फक्त २० दसलक्ष पाकिस्तानी रुपयेच दिले

दरम्यान पाकिस्तान सरकारने रविवारी तोशखाना विभागात २००२ सालापासून असलेल्या सर्व भेटवस्तूंची यादी जाहीर केली. या यादीप्रमाणे इम्रान खान यांना एकूण १०१ भेटवस्तू मिळाल्या होत्या. मात्र यातील साधारण १०० दसलक्ष पाकिस्तानी रुपये किमतीच्या भेटवस्तू त्यांनी स्वत:कडे ठेवून घेतल्या. मात्र इम्रान खान यांनी तोशखाना विभागाला फक्त २० दसलक्ष पाकिस्तानी रुपयेच दिले, असा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : गे, ट्रान्सजेंडर्सना रक्तदान करण्यास मनाई का? केंद्र सरकारची भूमिका काय? वाचा सविस्तर

इम्रान खान यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाची भूमिका काय?

इम्रान खान यांच्यावरील आरोपांची दखल पुढे पाकिस्तानी निवडणूक आयोगानेही घेतली होती. इम्रान खान यांनी भेटवस्तूंनी केलेली विक्री ही बेकायदेशीर नाही. कारण या भेटवस्तू स्वत:कडे ठेवण्याचा बदल्यात त्यांनी पैसे दिलेले आहेत. मात्र इम्रान खान यांचे वर्तन अनैतिक आहे. त्यांनी खोटे दावे केले असे निरीक्षण नोंदवत निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना सार्वजनिक पदावर राहण्यास बंदी घातली. तसेच निवडणूक कायदा २०१७ मधील कलम १३७, १६७ आणि १७३ अंतर्गत त्यांचे पाकिस्तानी संसदेचे सदस्यत्व रद्द करण्याचाही निर्णय घेतला.

इम्रान खान यांच्याविरोधात दहशतवादी कृत्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर पाकिस्तानमधील पाटीआयचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. पीटीआयच्या कार्यकर्त्यांकडून देशभरातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनादरम्यान तोडफोडीच्याही घटना घडल्या. तसेच काही ठिकाणी कार्यकर्त्यांची पोलिसांशीही बाचाबाची झाली. या घटनांनंतर इम्रान खान यांच्याविरोधात दहशतवादी कृत्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत त्यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या खेळाडूंवर भारताची भिस्त?

इम्रान खान यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप

तोशखाना प्रकरण, दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देण्याचा आरोपांव्यतिरिक्त इम्रान खान यांच्याविरोधात न्यायाधीशांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणीही त्यांच्याविरोधात अजामीपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यावर खून केल्याचाही आरोप आहे. याबाबतची तक्रार पाकिस्तान मुस्लीम लीग- एम पक्षाचे नेते मोहसीन शाहनवाझ रांझा यांनी दाखल केलेली आहे. ऑक्टोरबर महिन्यात निवडणूक आयोगासमोर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी माझ्यावर हल्ला करत मला मारण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्या सांगण्यावरून मला मारण्याचा कट होता, असा आरोप रांझा यांनी केलेला आहे.

प्रतिबंधित संस्थांकडून निधी जमवल्याचाही आरोप

दरम्यान, प्रतिबंधित संस्थांकडून निधी घेतल्याप्रकरणी इम्रान खान यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाने शेखन बिन मुबारक ए नाहिल नाह्यान (यूएईच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रमुख), तसेच परदेशात असलेले पाकिस्तानी नागरिक, परदेशातील पाकिस्तानी नागरिकांच्या कंपन्यांकडून नधी घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले असून आगामी काळात या खटल्यांचे काय होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader