Pakistan International Airlines investigation : पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून १० जानेवारीला एक पोस्ट शेअर केली. बघता-बघता ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली, ज्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली. सर्वस्तरावरून टीकेची झोड उठल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या पोस्टची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या पोस्टमध्ये नेमकं काय होतं, त्यावरून जगभरात खळबळ का उडाली, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एअरलाइन्सच्या जाहिरातीत नेमकं काय होतं?

तब्बल ४ वर्षांच्या कालखंडानंतर पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सने पॅरिसला जाण्यासाठी विमानसेवा सुरू केली. यासाठी एअरलाइन्सने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटरून एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवरकडे जाणाऱ्या एका विमानाचा फोटो होता. याशिवाय ‘पॅरिस आज आम्ही येत आहोत’, असा मजकूरही पोस्ट करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, जाहिरातीत इस्लामाबाद आणि पॅरिस दरम्यानची विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात उल्लेख अत्यंत लहान आकारात होता.

हेही वाचा : ‘मकोका’ कायदा काय आहे? या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा बसला आहे का?

जाहिरातीमुळे अनेकांमध्ये संभ्रम

बिझनेस टुडेच्या माहितीनुसार, जाहिरातीबरोबर इंन्स्टाग्रामवर एक ऑडिओ पोस्ट देखील शेअर करण्यात आली होती. दरम्यान, बघता-बघता ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि अवघ्या काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले. परंतु, पाकिस्तानसाठी ही बातमी चांगली नव्हती. कारण, ट्रोलिंगमुळे जाहिरातीला इतक्या मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले होते. सोशल मीडियावरील बहुतेक लोकांना असा समज झाला की पाकिस्तानने पॅरिसवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी दिली आहे.

न्यूयॉर्कमध्ये झाला होता विमान हल्ला

२००१ मध्ये, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर असाच हल्ला केला होता, ज्यामध्ये एक विमान उंच इमारतीला येऊन धडकले होते. या घटनेत जवळपास ३ हजार जणांनी आपले प्राण गमावले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या एअरलाइन्सने शेअर केलेल्या जाहिरातीने अनेकांना याच घटनेची आठवण करून दिली. ज्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राजकीय विश्लेषक आणि लेखक इयान ब्रेमर यांनी जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, “पाकिस्तानी एअरलाइन्सला एका चांगल्या ग्राफिक्स डिझायनरची गरज आहे.”

वादग्रस्त जाहिरातीवरून पाकिस्तान अडचणीत

पाकिस्तानचे नेते बिलावल भुट्टो यांचे माजी सल्लागार उमर कुरेशी यांनीही या जाहिरातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये कुरेशी म्हणाले की, “एअरलाइन्स व्यवस्थापनाने जाहिरात शेअर करण्यापूर्वी काळजी घ्यायला हवी होती. जाहिरातीत ‘पीआयए’चे विमान आयफेल टॉवरकडे जाताना दिसून येत आहे. जे युरोपमधील एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. ग्राफिक्स डिझाइन करणाऱ्या मूर्ख व्यक्तीच्या ही गोष्ट लक्षात यायला हवी होती.”

जाहिरातीवरून अनेकांनी पाकिस्तानला सुनावलं.

त्यांनी पुढे लिहिले की, “अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यासाठी विमानाचा वापर करण्यात आला होता, हे एअरलाइन्सला माहीत नाही का? पीआयए ही पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी आहे. आधीच देशावर दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे, या जाहिरातीमुळे मी नि:शब्द झालो आहे.” दरम्यान, पाकिस्तानी एअरलाइन्सच्या या जाहिरातीची तुलना नेटकऱ्यांनी १९७० च्या जाहितीबरोबर केली. ज्यामध्ये न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्सवर बोईंग ७४७ विमानाची सावली पडत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

अमेरिकेतील ९/११ चा दहशतवादी हल्ला ओसामा बिन लादेन याने घडवून आणला होता. २०११ मध्ये अमेरिकन सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला ठार केलं होतं. या हल्ल्यांचा सूत्रधार खालिद शेख मोहम्मद यालाही २००३ मध्ये पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, पीआयएने अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा : तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिले चौकशीचे आदेश

एअरलाइन्सच्या जाहिरातीवर जगभरातून टीकेची झोड उठल्यामुळे पाकिस्तान सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा हवाला देऊन या पोस्टवर टीका केली आहे. संसदेला संबोधित करताना दार म्हणाले की, “जाहिरात कोणी तयारी केली याची चौकशी करण्याचे निर्देश पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिले आहेत. हा खोडसाळपणा असून यामुळे देशाची बदनामी होत आहे”, असं दार यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान ते पॅरिस विमानसेवा सुरू

दरम्यान, पाकिस्तानमधून पॅरिसला जाण्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार, आठवड्यातून दोन दिवस शुक्रवार आणि रविवार विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. २०२० मध्ये कराची येथे झालेल्या विमान अपघातात ९७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर युरोपियन युनियनने पाकिस्तानच्या एअरलाइन्सवर बंदी घातली होती. पायलट परवाना घोटाळ्यामुळे एअरलाइन्सची प्रतिष्ठा देखील खराब झाली होती, ज्यामध्ये पाकिस्तानच्या एक तृतीयांश पायलटकडे बनावट परवाने असल्याचे उघड झाले होते. पाकिस्तानच्या एअरलाइन्सला अजूनही युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंग्डममध्ये काम करण्याची परवानगी नाही. बिझनेस स्टँडर्डच्या मते, गेल्या काही वर्षांत ‘पीआयए’ला अनेक वादांचा सामना करावा लागला आहे.