भारताबरोबर द्विपक्षीय व्यापार पुन्हा सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दार यांनी केले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार लंडनमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. खरं तर गेल्या पाच वर्षांपासून म्हणजेच २०१९ पासून भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार पूर्णपणे ठप्प आहे.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही देशांतील व्यापार ठप्प होण्यामागे नेमकं कारण काय? आणि पाकिस्तानने भारताबरोबर व्यापार सुरू करण्याबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय का घेतला आहे? याविषयी जाणून घेऊया.

IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
Justin Trudeau resignation news in marathi
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा… भारत-कॅनडा संबंध आता तरी सुधारतील? खलिस्तानवाद्यांना अभय मिळणे थांबेल?
wakahan corridor afghanistan
अफगाणिस्तानच्या ‘चिकन नेक’वर पाकिस्तानचा ताबा? काय आहे वाखान कॉरिडॉर?
pakistan in unsc
भारताची चिंता वाढली? दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य; याचा अर्थ काय?

हेही वाचा – होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

द्विपक्षीय व्यापार ठप्प होण्याचे कारण काय?

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने ऑगस्ट २०१९ मध्ये भारताबरोबरच्या द्विपक्षीय व्यापाराला स्थगिती दिली होती. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय बेकायदा असून अशा निर्णयाचा प्रतिकार करण्यासाठी पाकिस्तान शक्य त्या पर्यायांचा वापर करेल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली होती.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्यापार स्थगित करण्यामागे कलम ३७० चं कारण देणे हे एक निमित्त होतं. कलम ३७० रद्द करण्यापूर्वी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला होता. तसेच पाकिस्तानमधील आयातीवर २०० टक्के शुल्क आकारले होते. त्यामुळे पाकिस्तानने भारतातबरोबर सुरू असलेला द्विपक्षीय व्यापार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

कलम ३७० रद्द करण्यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने हे पाऊल उचललं होतं. खरं तर जागतिक व्यापार संघटनेच्या गॅट (GATT) करारानुसार, सर्व सदस्य देशांकडून इतर सदस्य देशांना मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला जातो. सर्व सदस्य देशांमध्ये मुक्त व्यापार सुनिश्चित करणे आणि एकमेकांना व्यापारी भागीदार म्हणून समान वागणूक देणे हा या कराराचा उद्देश आहे.

२०१९ पूर्वीचा व्यापार नेमका कसा होता?

मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा असतानाही पाकिस्तानने १,२०९ उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली होती. वाघा-अटारी सीमेद्वारे केवळ १३८ उत्पादने भारतातून आयात करण्याची परवानगी होती. तरीही भारताने व्यापार अधिशेष कायम राखला. म्हणजेच भारताने निर्यात केलेल्या वस्तूचे मूल्य पाकिस्तानातून आयात केलेल्या वस्तूंच्या मूल्यांपेक्षा जास्त होते.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार केवळ २.२९ अब्ज डॉलर इतका होता. भारताच्या एकूण व्यापाराच्या तुलनेत पाकिस्तानबरोबरच्या व्यापाराचा हिस्सा हा केवळ ०.३५ टक्के इतका होता. २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताने पाकिस्तानला कापूस, सेंद्रिय खते, प्लास्टिक, अर्क आणि यांत्रिक उपकरणे निर्यात केली; तर पाकिस्तानमधून फळे, काजू, मीठ, गंधक, दगड, धातू आणि लेदर यांची आयात केली. विशेष म्हणजे २०१९ मध्ये व्यापारावर बंदी घातल्यानंतर एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान करोना काळात पाकिस्तानने औषधे आयात करण्याची परवानगी दिली होती.

व्यापार ठप्प झाल्यावर नेमकं काय घडलं?

भारताबरोबर व्यापार सुरू करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही. २०२१ मध्ये पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय परिषदेने भारतातून कापसाची आयात करण्याची परवानगी दिली होती. त्यामागचं कारण म्हणजे, त्यावेळी ब्राझील आणि अमेरिकेतून कापूस आयात करणे पाकिस्तानला महागात पडत होते. त्यामुळेच ही परवानगी देण्यात आली होती.

हेही वाचा – विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

पाकिस्तानकडून व्यापार सुरू करण्याबाबत पुनर्विचार का?

इशाक दार यांच्या विधानानंतरही भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापार सुरू होईल की नाही हे अस्पष्ट आहे. मात्र, हा व्यापार सुरू करण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या धोरणांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. २०२२ मधील पूर, वाढती महागाई आणि राजकीय अस्थिरता त्यामुळे पाकिस्तानसमोर आर्थिक संकट उभं राहिले आहे. परिणामत: पाकिस्तानला आयएमएफ किंवा चीनकडे हात पसरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून व्यापार सुरू करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येत असल्याचे सांगितलं जात आहे.

Story img Loader