इंडोनेशिया, मलेशियातून  पामतेलाची निर्यात घटल्यामुळे जागतिक खाद्यतेल बाजारात पामतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पामतेलाच्या तुटवड्याचा भारतावर नेमका काय परिणाम होईल. त्याविषयी…

जागतिक बाजारात पामतेलाचा तुटवडा?

जागतिक पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आघाडीवरील देश आहे. एकूण पामतेल उत्पादनात इंडोनेशियाचा वाटा ६० टक्क्यांपर्यंत आहे. मलेशिया दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. इंडोनेशिया आणि मलेशियात गत दोन – तीन महिन्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. देशाच्या बहुतेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाम बियांची काढणी रखडली. पामतेल शुद्धीकरण प्रकल्पांना पाम बियांचा तुटवडा जाणवू लागला आहे. इंडोनेशियाने बायो- ४० धोरण जाहीर केले आहे. ज्यानुसार देशात उत्पादित होणाऱ्या एकूण पामतेलापैकी ४० पामतेलाचा वापर बायो डिझेल तयार केला जाणार आहे. त्यासह इंडोनेशिया आणि मलेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर कर लागू केला आहे. जागतिक बाजारातील पामतेलाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जागतिक खाद्यतेल बाजारात पामतेलाचा काहिसा तुटवडा निर्माण झाला आहे.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

कच्चे पामतेल महाग, शुद्ध पामतेल स्वस्त

इंडोनेशियाच्या अर्थकारणात पामतेलाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पामतेल उद्योगाला इंडोनेशियात विशेष महत्त्व आहे. देशाअंतर्गत पामतेल उद्योगाला बळ देण्यासाठी, रोजगार वृद्धी करण्यासाठी पामतेल शुद्धीकरण प्रकल्पांना बळ देत आहे, जेणेकरून रोजगारात वाढ होईल. त्यामुळे इंडोनेशिया कच्च्या पामतेलाच्या निर्यातवर कर लादत आहे, तर शुद्ध पामतेलाच्या निर्यातीला सवलत देत आहे. मलेशियाचीही हीच भूमिका आहे. भारत सरकारची नेमकी उलटी भूमिका आहे. देशातील खाद्यतेल शुद्धीकरण प्रकल्पांना मदत व्हावी म्हणून कच्च्या पामतेल आयातीवर कर कमी आहे आणि शुद्ध पामतेलाच्या आयातीवर कर जास्त आहे. त्यामुळे देशात होणारी पामतेल आयात महाग झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या बंदरांवर शुद्ध पामतेलाचे दर १२३३ डॉलर प्रति टन,  कच्च्या पाामतेलाचे दर  १२६९ डॉलर प्रतिटन, कच्चे सोयाबीन १२१९ डॉलर प्रतिटन, कच्चे सूर्यफूल तेल १२६५ डॉलर प्रतिटन होते. म्हणजे कच्च्या पामतेलाचे दर सर्वांधिक आहेत.

हेही वाचा >>>Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?

भारत पामतेलाची किती आयात करतो?

द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोशिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४, या खाद्यतेल वर्षांत देशात १५९.६ लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली. त्यासाठी तब्बल १.३१ लाख कोटी रुपये (१५.९ अब्ज डॉलर) मोजावे लागले आहेत. गेल्या खाद्यतेल वर्षांत विक्रमी १६४.७ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती, त्यापोटी १.३८ कोटी रुपये मोजावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर २०२४ रोजी कच्चे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलावर २७.५ टक्के आणि शुद्ध पामतेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावर ३५.७५ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले. त्यामुळे खाद्यतेलाच्या आयातीवर नियंत्रण आले आहे. तरीही गत खाद्यतेल वर्षांत १९.३ लाख टन शुद्ध पामतेल, ६९ लाख टन कच्चे पामतेल, ३४ लाख टन सोयाबीन, ३५ लाख टन आणि सूर्यफूल तेलाची आयात झाली आहे. देशनिहाय आयातीचा विचार करता, इंडोनेशियातून सर्वांधिक ४८ लाख टन, मलेशियातून ३२ लाख टन, थायलंडमधून ०.७७ लाख टन, अर्जेंटिनामधून २५ लाख टन, ब्राझीलमधून ०.९५ लाख टन, युक्रेनमधून ०.५७ लाख टन, रोमानियातून ०.६३ लाख टन आणि रशियातून २० लाख टन खाद्यतेलाची आयात झाली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये भारताच्या सोयाबीन तेलाच्या आयातीत १७२  टक्के वाढ झाली आहे. शुद्ध पाम तेलाच्या आयातीत ६६ टक्के वाढ झाली आहे. मात्र, कच्च्या पामतेलाच्या आयातीत २१ टक्क्यांनी घट झाली आहे.  

पामतेल तुटवड्यामुळे सोयाबीनला भाव

पामतेलाचा पुरवठा कमी झाल्याने पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीन आणि सूर्यफूल तेल स्वस्त आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची साखळी विस्कळीत झाली आहे. त्याचा फायदा अर्जेंटिना घेत असून, अर्जेंटिनात वेगाने सोयाबीनचे गाळप सुरू आहे. अर्जेंटिनामधून जगभरात  सोयाबीन तेलाची निर्यात होत आहे. पण, गाळपाचा वेग वाढल्यामुळे सोयापेंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीन पेंडीच्या दरात घट झाली आहे. सोयाबीनपासून तेल तयार करताना ८० टक्के पेंड उत्पादन आणि २० टक्के तेल उत्पादन होते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी सोयाबीन तेलापेक्षा सोयाबीनच्या पेंडीला चांगला दर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोयापेंडीच्या दरात वाढ झाल्याशिवाय सोयाबीन उत्पादकांना चांगला दर मिळणार नाही.

हेही वाचा >>>पाकिस्तानमध्ये ब्रँडेड कार नव्हे तर पिकअप ट्रक चर्चेत; राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत वाढली मागणी, कारण काय?

ग्राहकांवर काय परिणाम?

एका खाद्यतेल वर्षात देशात सुमारे ८० ते ९० लाख टन कच्च्या आणि शुद्ध पामतेलाची आयात होते. ही आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून होते. तर सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटिना आणि सूर्यफूल तेलाची आयात रशिया, युक्रेनमधून होते. पामतेल सर्वात हलक्या दर्जाचे आणि स्वस्त तेल म्हणून ओळखले जाते. आता पामतेल महाग झाले आहे. पामतेलापेक्षा सोयाबीन, सूर्यफूल तेल स्वस्त असल्यामुळे पुढील काही महिन्यात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढेल. जागतिक बाजारात सोयाबीन तेलाची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे पामतेल महाग झाले तरीही खाद्यतेलांच्या दरात फारसा फरक पडणार नाही. पामतेलाऐवजी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात आणि आहारातील वापर वाढेल. ग्राहकांना सध्याच्या दरातच पामतेलाऐवजी सोयाबीन आणि सूर्यफूल तेल मिळाले तर ते आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. पामतेलात तयार केलेले पदार्थ जास्त काळ टिकतात. त्यामुळे प्रक्रिया उद्योगात पामतेलाचा उपयोग जास्त होतो. त्यामुळे खााद्यप्रक्रिया उद्योगाला मात्र पामतेलाच्या तुटवड्याचा फटका बसू शकतो.

dattatray.jadhav@indianexpress.com

Story img Loader