पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत. यासाठी १५ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कारणावरून हिंसाचार उसळला आहे. मंगळवारी (दि. १३ जून) इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यादरम्यान पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला, दगडफेकही झाली. हिंसाचारावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. ९ जून रोजी पंचायत निवडणुकांची घोषणा झाली. तेव्हापासून पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये हिंसाचाराचे प्रकार घडलेले आहेत. या हिंसाचारानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलाला तैनात राहण्याचे निर्देश दिले आहेत. ८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी तारखांवर आक्षेप घेतला आहे. ६० हजार उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी दिल्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरताना ठिकठिकाणी गोंधळाची परिस्थिती दिसली.

पंचायत निवडणुकीमध्ये हिंसाचार का उसळला?

पंचायती राज व्यवस्था त्रिस्तरीय रचना आहे. ग्रामपंचायत (गाव), मंडळ परिषद किंवा ब्लॉक समिती, पंचायत समिती (तालुका) आणि जिल्हा परिषद (जिल्हा) अशी ही रचना आहे. पश्चिम बंगालमध्ये ३,३१७ ग्रामपंचायतींमधील ६३,२८३ पंचायत सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून आमच्या पक्षातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत, असा आरोप भाजपा, डावे पक्ष आणि काँग्रेसने सत्ताधारी तृणमूलवर केला. या कारणावरून पश्चिम बंगालमधील भांगर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा या भागांमध्ये हिंसाचार पाहायला मिळाला.

Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
Walmik Karad Arrest
Vijay Wadettiwar : “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे..”; काँग्रेसची मागणी
youth abused minor pune, gymnasium, Pune,
पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी
Chinmoy Das bail rejected
हिंदू नेते चिन्मय दास यांना जामीन देण्यास नकार, बांगलादेशातील चितगाव न्यायालयाचा निर्णय
cbi itself files case against own officer in corruption charges
भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा;सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त
DigiLocker documents are considered valid
डिजिटल कागदपत्रे गाह्य धरण्याबाबत वाहतूक पोलिसांना लेखी आदेश; डिजिटल कागदपत्रे दाखवल्यानंतरही दंडात्मक कारवाई

हे वाचा >> The Kerala Story वरून सर्वोच्च न्यायालयाने प. बंगाल सरकारला सुनावलं; राज्यातील बंदी उठवली!

मुर्शिदाबाद, बिरभूम, पूर्व मिदनापूर, पूर्व बर्डवान, कोछेभर, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहावयास मिळाला. काही दिवसांपूर्वी दक्षिण २४ परगणामधील भांगर या ठिकाणी ब्लॉक डेव्हलपमेंट कार्यालयात काही राजकीय कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी तेथील कर्मचारी बिद्युत घोष यांना धमकाविले. घोष विरोधी पक्षातील उमेदवारांना उमेदवारी अर्जाचे वाटप करत होते. मुर्शिदाबाद जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस पक्षाचा एक स्थानिक कार्यकर्ता हातात बंदूक घेऊन कर्मचाऱ्यांना धमकाविताना दिसत होते.

तृणमूल काँग्रेसने मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले असून हिंसाचार न करता निवडणुका पार पाडाव्यात असे आवाहन केले.

मागच्या पंचायत निवडणुकीमध्ये काय परिस्थिती होती?

२०१८ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ९५ टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला होता. त्यापैकी ३४ टक्के जागा बिनविरोध झाल्या होत्या. बंगाल पंचायत निवडणुकीच्या इतिहासातील हा विक्रमी असा आकडा होता. त्यावेळीदेखील तृणमूल काँग्रेसने इतरांना उमेदवारी अर्जच भरू न दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्या वेळीही मतदानात फेरफार आणि हिंसाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

पुढच्याच वर्षी, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला झटका मिळाला. भाजपाने पहिल्यांदाच या राज्यात लोकसभेच्या १८ जागांवर विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या जागा भाजपाला मिळवता आल्या होत्या. त्यानंतर मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात हिंसाचाराच्या घटनांची नोंद करण्यात आली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सदर प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्यात आले.

तृणमूलच्या नेत्यांनी यावर काय उत्तर दिले?

तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, हिंसाचारमुक्त वातावरणात पंचायत निवडणुका घेण्यासाठी तृणमूल काँग्रेस कटिबद्ध आहे. एवढेच नाही तर पश्चिम बर्धमान येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांना गुलाब आणि पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांचे स्वागत केले होते. तसेच पूर्व बर्धमान येथे विरोधकांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना चहापानाचे निमंत्रण देण्यात आले.

हे वाचा >> कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर ममता बॅनर्जींचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत केले मोठे भाष्य

पंचायत निवडणुका का महत्त्वाच्या आहेत?

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांसाठी या पंचायत निवडणुका लिटमस टेस्टप्रमाणे आहेत. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस, भाजपा, डावे पक्ष – काँग्रेस आघाडी या निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बहुमत घेऊन विजय मिळवला होता. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रचार करूनही तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. तेव्हापासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत.

एसएससी घोटाळा प्रकरण, कोळसा आणि गुरांच्या तस्करीप्रकरणी तृणमूलच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. महानगरपालिका भरती घोटाळ्यातही सीबीआयने तपास सुरू केला आहे. कोळसा चोरी आणि एसएससी घोटाळ्याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या विरोधात राज्यातील राजबंशी समुदायाने मोर्चा काढला होता. राजबंशी समाजाच्या १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, त्यावरून राजबंशी समाज आक्रमक झाला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पंचायत निवडणुकांना राज्यात महत्त्व लाभले आहे, सर्वच पक्ष आपापला विस्तार करण्यासाठी या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहेत.

Story img Loader