पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत. यासाठी १५ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कारणावरून हिंसाचार उसळला आहे. मंगळवारी (दि. १३ जून) इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यादरम्यान पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला, दगडफेकही झाली. हिंसाचारावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. ९ जून रोजी पंचायत निवडणुकांची घोषणा झाली. तेव्हापासून पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये हिंसाचाराचे प्रकार घडलेले आहेत. या हिंसाचारानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलाला तैनात राहण्याचे निर्देश दिले आहेत. ८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी तारखांवर आक्षेप घेतला आहे. ६० हजार उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी दिल्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरताना ठिकठिकाणी गोंधळाची परिस्थिती दिसली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा