‘जी सेव्हन’ देशांची बैठक संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि. २२ मे) प्रशांत महासागरातील देशांना भेटी दिल्या. या वेळी भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य परिषदेत (FIPIC) प्रशांत महासागरातील १४ बेटांच्या देशांना उद्देशून बोलत असताना मोदी म्हणाले की, ज्यांना आपण विश्वासार्ह मानले ते गरजेच्या वेळी आपल्या बाजूंनी उभे नव्हते, पण भारत अत्यंत विश्वासू असा विकासामधील भागीदार राहील. पापुआ न्यू गिनी देशाची राजधानी पोर्ट मोर्सबी येथे फिपिक (FIPIC) परिषद आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत बेटांच्या समूहाला संबोधित करताना मोदींनी सांगितले, “ज्यांना आपण विश्वासार्ह समजत होतो, ते गरजेच्या वेळी आपल्या बाजूने उभे राहिले नाहीत. आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत असताना एक जुनी म्हण लागू होते, “अडचणीत जो धावून येतो तोच खरा मित्र.” मला आनंद आहे की, करोना महामारी आणि इतर आव्हानात्मक परिस्थितीत भारत आपल्या प्रशांत महासागरातील द्वीपमित्रांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. मग तो लसींचा पुरवठा असो किंवा जीवनाश्यक औषधे, गहू किंवा साखर असो, भारताला जे जे शक्य होईल, त्या पद्धतीने मित्र राष्ट्रांना मदत करण्याचा प्रयत्न केला.”

methanol liquor poison
विश्लेषण : लाओसमध्ये ‘मिथेनॉल’मिश्रित मद्याचे ७ परदेशी पर्यटक बळी… मिथेनॉल मद्यामध्ये सर्रास का मिसळले जाते? ते घातक कसे?
Russia Ukraine war
विश्लेषण : रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्र का डागले?…
Air pollution air quality delhi burning of agricultural waste Uttar Pradesh, Punjab Haryana states
विश्लेषण : दिल्लीतील भीषण प्रदूषणास बाजूच्या राज्यांतील शेती कशी कारणीभूत? कृषी कचरा जाळण्याची गरज तेथील शेतकऱ्यांना भासते?
Hitler Volkswagen Porsche
Volkswagen: अ‍ॅडॉल्फ हिटलरने स्वप्नपूर्तीसाठी ‘फोक्सवॅगन’ गाडीला आकार का दिला?
Kim Yong Bok, the secretive North Korean general leading troops in the Russia-Ukraine war
किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?
am cynaide serial killer killed 14 friends
१४ मित्रांना विष देऊन हत्या केल्याप्रकरणी महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे ॲम सायनाइड?
Sukhbir Singh Badal resignation
विश्लेषण: अकाली दलावर संकटाचे ‘बादल’; देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष अडचणीत का आला?
sugarcane harvester
महाराष्ट्रात ऊसतोडणीचे वेगाने यांत्रिकीकरण… मजुरांऐवजी यंत्रांना प्राधान्य का? मजुरांचा तुटवडा का जाणवतो?

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले होते. या वेळी पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर मोदींच्या पाया पडून त्यांना अभिवादन केले. या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. पापुआ न्यू गिनी या बेटाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्त झाल्यानंतर शक्यतो परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले जात नाही, अशी प्रथा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याला अपवाद ठरले. सायंकाळ होऊनही स्वतः पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर उपस्थित राहून मोदींचे जंगी स्वागत केले.

हे वाचा >> पापुआ न्यू गिनी आणि फिजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा सन्मान, दोन्ही देशांनी सर्वोच्च पुरस्काराने केला गौरव

पापुआ न्यू गिनी हा देश भारतासाठी महत्त्वाचा का आहे?

बेटाचे मोक्याचे ठिकाण

पापुआ न्यू गिनी हा देश ऑस्ट्रेलियाच्या उत्तर दिशेला आहे. या भागात चीनने आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला असून ऑस्ट्रेलिया आणि यूएस त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीनने पापुआ न्यू गिनी देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. पायाभूत सोयीसुविधा आणि शाळा उभारण्यासाठी चीनने निधी दिला आहे. यातून या बेटाचा वापर सैन्यस्थळ आणि मुत्सद्दी लाभ मिळवण्यासाठी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. मागच्या वर्षी चीनने सोलोमन बेटाशी सुरक्षा करार केला. सोलोमन बेट याच भागात आहे. सोमवारी यूएस आणि पापुआ न्यू गिनी यांनी प्रशांत महासागरातील बेटांचे सैनिकीकरण करण्याला विरोध दर्शविणाऱ्या सुरक्षा करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

भारतदेखील प्रशांत महासागरातील द्वीपसमूहांशी सहकार्याच्या माध्यमातून संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशांत महासागरातील द्वीपसमूहामध्ये पापुआ न्यू गिनी व्यतिरिक्त सोलोमन बेट, कुक बेट, फिजी, किरिबात, रिपब्लिक ऑफ मार्शल बेट, मायक्रोनेशिया, नाऊरु, निऊ, पलाउ, समोआ, टोंगा, तुवालु आणि वानूआतू या बेटांचा समावेश होतो. फिपिक (FIPIC) याच सहकार्याचा एक भाग असून त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजी आणि पापुआ न्यू गिनी बेटांचा दौरा केला. मोदी यांनी २०१४ साली फिजी येथे दौरा केल्यानंतर फिपिक परिषदेची सुरुवात करण्यात आली होती. फिपिकची दुसरी बैठक जयपूर येथे संपन्न झाली होती. त्यानंतर आता याची तिसरी परिषत संपन्न झाली.

लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था!

पापुआ न्यू गिनी हे जगातील तिसरे मोठे बेट आहे. कमी मध्यम उत्पन्न असणाऱ्या या देशाचा बराचसा भाग ग्रामीण लोकसंख्येचा आहे. भाषेच्या बाबतीत जगातील सर्वात वैविध्यपूर्ण म्हणून पापुआ न्यू गिनीकडे पाहिले जाते. इथे ८०० हून अधिक भाषा बोलणारे लोक राहतात. ‘वर्ल्ड फॅक्टबुक’च्या माहितीनुसार या बेटावरील लोकसंख्या ९८ लाख १९ हजार ३५० एवढी आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये अनेक स्थानिक जमाती आहेत. शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. बाहेरील जगाशी त्यांचा क्वचितच संबंध येतो.

आणखी वाचा >> अग्रलेख : बहुराष्ट्रवाद की बहुलिप्ततावाद?

१६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनी एक स्वतंत्र देश अस्तित्वात येईपर्यंत १८८० पासून इथे जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने राज्य केले होते. ‘वर्ल्ड फॅक्टबुक’च्या माहितीनुसार पापुआ हा शब्द मलय (मलेशियाची भाषा) भाषेतील पापुहा (papuah) या शब्दापासून तयार झाला. पापुहा म्हणजे मलेशियन नागरिकांचे कुरळे केस. स्पॅनिश एक्सप्लोरर वायनिगो ओर्टिझ याला आफ्रिकेतील गिनी बेटावरील साधर्म्य या ठिकाणी आढळून आल्यानंतर त्याने या बेटाला न्यू गिनी असे नाव १५४५ साली दिले होते. त्यामुळे या बेटाचे नाव पापुआ न्यू गिनी असे पडलेले आहे.

सरकार

पापुआ न्यू गिनी देश राष्ट्रकुल देशांचा भाग आहे आणि इंग्लंडचे राजे चार्ल्स तृतीय हे त्यांचे अधिकृत राजे आहेत. संसदेने नामनिर्देशित केलेले गव्हर्नर जनरल राजाचे प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान मात्र लोकशाही पद्धतीने निवडून येतात. जेम्स मारापे हे विद्यमान पंतप्रधान आहेत, तर गव्हर्नर जनरल बॉब डाडे आहेत.