सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. त्यातच पार्सल घोटाळ्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. या घोटाळ्यांमुळे अनेकांची बँक खातीदेखील रिकामी झाली आहेत. काय आहे पार्सल घोटाळा? या प्रकारात घोटाळेबाज लोकांना कसे लक्ष्य करतात? स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

पार्सल घोटाळा नक्की आहे तरी काय?

घोटाळेबाज बळींना अडकवण्यासाठी मानसशास्त्रीय तंत्र वापरतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ते पीडितांच्या मनात भीती निर्माण करतात. लोकांच्या मनात तुरुंगात जाण्याची किंवा मोठी दंडाची रक्कम भरण्याची भीती निर्माण केली जाते. पार्सल घोटाळ्यात लक्ष्य करण्यात आलेल्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत अवैध पार्सल असल्याचे सांगितले जाते आणि हा कॉल अधिकृत कुरिअर कंपनीचा असल्याचे भासवले जाते. पॅकेजमध्ये अवैध वस्तू असल्याचे सांगितले जाते. येथूनच फसवणुकीची प्रक्रिया सुरू होते.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
Appeal will be filed in the Supreme Court regarding the cancellation of the independent candidature application form Mumbai
चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : कर्करोगापासून मानसिक आजारावर प्रभावी ठरणारी जळू उपचार पद्धती आहे तरी काय? याचे महत्त्व काय?

घोटाळेबाज काही वैयक्तिक तपशील उघड करतात, जसे की लक्ष्य करण्यात आलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर इ. त्यामुळे लोकांचाही सहज विश्वास बसतो. पीडित डिजिटल अटकेत असल्याचे सांगत बँकिंग तपशील, पासवर्ड इत्यादी संवेदनशील माहिती मिळवली जाते. तसेच पीडितांना बनावट आरबीआय खात्यात पेमेंट करण्यासदेखील सांगतात. एकदा पेमेंट केले की, ते थेट स्कॅमर्सकडे जाते. यामध्ये कधी कधी पीडिताच्या एखाद्या नातेवाईकाला अटक केल्याचे बनावट कॉलही केले जातात.

स्वतःचा बचाव कसा कराल?

  • कुरिअर कंपनीकडून नेहमी पडताळणी करा : वेबसाइट, ॲप्स किंवा अधिकृत ग्राहक सेवा क्रमांक स्वतः वापरा आणि सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी नमूद केलेले तपशील भरा.
  • माहितीची गोपनीयता : परिस्थिती कितीही भीतीदायक वाटत असली तरी कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करा.
  • वैयक्तिक माहिती : फोन करणाऱ्याची ओळख तपासल्याशिवाय वैयक्तिक माहिती देऊ नका.
घोटाळेबाज बळींना अडकवण्यासाठी मानसशास्त्रीय तंत्र वापरतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ते पीडितांच्या मनात भीती निर्माण करतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
  • पैशांची देवाण-घेवाण : परिस्थिती काहीही असो, पैशांची देवाण-घेवाण करू नका.
  • घटनेची तक्रार : भारत सरकारकडे सायबर सुरक्षा अहवालाचे बरेच पर्याय आहेत. अशा घटनांची तक्रार करण्यासाठी तुम्ही cybercrime.gov.in किंवा १९३० वर आपली तक्रार नोंदवू शकता. त्याबरोबरच तुम्ही कुरिअर कंपनीलादेखील कॉल करू शकता आणि सर्व आवश्यक तपशिलांसह या घटनेची तक्रार करू शकता.

बनावट कॉल कसा ओळखायचा?

  • जेव्हा असे फसवे कॉल येतात तेव्हा वापरकर्त्यांना ग्राहक समर्थनाशी बोलण्यासाठी दोन दाबण्यास सांगितले जाते आणि दोन दाबल्यास घोटाळेबाज त्वरित कॉल उचलतात आणि ग्राहक समर्थनाकडून असल्याचे भासवू लागतात. ग्राहक सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो हे सर्वांना माहीत आहे. तसे झाल्यास कॉल खोटा असू शकतो आणि तुमची फसवणूक होऊ शकते.
  • या कॉलवर कधीकधी पोलिस आयुक्तांशी बोला असा पर्याय दिला जातो. मात्र, हे अगदी स्पष्ट आहे की, एखाद्याच्या अवैध पार्सलची चर्चा करण्याव्यतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे इतर बरीच महत्त्वाची कामे असतात.

हेही वाचा : सोनू सूदने रस्ते अपघात रोखण्यासाठी सुचवला ‘क्रॅश बॅरिअर्स’चा पर्याय; ही प्रणाली कसे कार्य करते?

  • छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, अशा घोटाळ्यांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
  • त्यासह सरकारकडून जारी केलेल्या सूचना आणि उपायांची माहिती घेत रहा, या सतर्कतेमुळे ऑनलाइन फसवणूक रोखणे शक्य आहे.