ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे काही खायचं काम नाही. मात्र, पदक मिळवण्यासाठी काही चांगलं खाणं नक्कीच गरजेचं ठरतं. सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची धामधूम सुरू आहे. जगभरातील खेळप्रेमी ऑलिम्पिकमधील खेळांची मजा घेत आहेत. भारतानेही मनू भाकरच्या रुपाने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये दाखल झालेले खेळाडू इतकी तुफान कामगिरी करण्यासाठी काय खातात? ऑलिम्पिकमधील त्यांचं खाणं कसं असतं? याविषयीची माहिती जाणून घेणे रंजक ठरेल.

खेळाप्रमाणे आहार

खेळादरम्यान खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त रहावे लागते. त्यासाठी व्यायामाइतकेच महत्त्व डाएटला म्हणजेच खाण्यालाही द्यावे लागते. सामान्यत: आपण जे खातो, त्याहून ऑलिम्पिक खेळाडूंचा आहार निश्चितच वेगळा असतो. खेळाडूंनी काय खावे आणि काय खाऊ नये, याचे सविस्तर असे नियोजन आधीच केलेले असते. इतकेच नव्हे तर खेळाडूंनी कधी कोणत्या वेळेला काय खावे, याचेही सखोल नियोजन आधीच केलेले असते. खेळाडू हे नियोजन कसोशीने पाळत असतात. आहारतज्ज्ञ आणि ओहायो स्टेट स्पोर्ट्स मेडिसिन इन्स्टिट्यूटच्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनच्या संचालक सारा विक यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, “खेळाडूंचे पोषण हादेखील त्यांच्या प्रशिक्षणाचाच भाग असतो. त्यांना फक्त कोणत्या पोषणाची गरज आहे, तसेच कधी काय खाणे गरजेचे आहे, हे त्यांना माहीत असणे आवश्यक असते.”

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
Loksatta viva Winter Foods Food Culture by Region Maharashtra
सफरनामा: थंडीतली खाद्यामैफील!
Dough kept in the refrigerator for a long time dangerous
रेफ्रिजरेटरमध्ये जास्त दिवस ठेवलेली कणीक आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ काय सांगतात…
How often should you bathe your pets in winter Experts weigh in
हिवाळ्यात आपण आपल्या पाळीव प्राण्यांना किती वेळा अंघोळ घालावी? तज्ज्ञ काय सांगतात….

हेही वाचा : विश्लेषण : ऑलिम्पिकमध्ये आजवर सर्वांत यशस्वी देश कोणता?

खेळाडू कोणता खेळ खेळतो यावर त्याचा आहार अवलंबून असतो. ‘कॅलरी इनटेक’ म्हणजेच खेळाडूने किती कॅलरीचे सेवन करावे, याचे प्रमाणही वेगवेगळे असू शकते. म्हणजेच ‘स्प्रिंटींग’सारख्या कमी कालावधीच्या खेळासाठी दोन हजार कॅलरी प्रति दिवस इतक्या कॅलरी पुरेशा ठरतात; तर ‘स्वीमिंग’सारख्या खेळासाठी अधिक मेहनत लागत असल्यामुळे दिवसाला १० हजार कॅलरींची गरज भासत असते. थोडक्यात, खेळप्रकारानुसार कॅलरी इनटेकचे प्रमाण निश्चित केले जाते. कॅनेडियन स्पोर्टस इन्स्टिट्यूट पॅसिफिकमधील आहारतज्ज्ञ जोआना इर्विन हे कॅनडाच्या खेळाडूंना आहाराबाबत सल्ले देतात. त्यांनी ‘वोक्स’ला सांगितले की, खेळाडूंच्या आहाराची योजना तयार करताना त्यांच्या खेळाचा प्रकार कोणता आहे, याचा विचार प्रकर्षाने केला जातो. ज्या खेळांमध्ये सहनशक्तीचा अधिक कस लागतो, अशा खेळांची तयारी करणाऱ्या खेळाडूने कर्बोदकांचे सेवन अधिक प्रमाणात करणे गरजेचे असते. त्यामुळे, शरीरातील ग्लायकोजेनचे प्रमाण वाढते आणि जास्तीत जास्त ऊर्जा साठवली जाते. मात्र, १०० मीटर स्प्रिंटसारख्या ज्या खेळांची सुरुवात एकूण कामगिरीसाठी महत्त्वाची असते, त्या खेळांमध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन अधिक करावे लागते. चार मुख्य घटकांभोवती ऑलिम्पिकच्या खेळाडूंचा आहार निश्चित केला जातो. एक – विविध प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, जे ऊर्जेसाठी निर्णायक ठरतात; दोन – प्रथिने, जे लीन बॉडी मास तयार करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असतात; तीन – ओमेगा-३ ने समृद्ध अन्न (जसे की मासे), ज्यामध्ये निरोगी चरबी मोठ्या प्रमाणावर असते आणि ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात; आणि चार – भरपूर फळे आणि भाज्या फार महत्त्वाच्या ठरतात; कारण त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. थोडक्यात, ऑलिम्पिक खेळाडूंच्या न्याहरीमध्ये एवोकॅडो टोस्ट, स्मोक्ड सॅल्मन, अंडी आणि एखादं केळं तुम्हाला नक्की दिसेल.

वैयक्तिक आवड-निवडही महत्त्वाची

खेळासाठी काय आवश्यक आहे, याचा विचार तर केला जातोच; त्याबरोबरच आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ खेळाडूंच्या वैयक्तिक आवडी-निवडी आणि दुखापतींचाही विचार करतात. त्यानुसारच खेळाडूंचा आहार निश्चित केला जातो. यूएस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समिती (USOPC) मधील वरिष्ठ क्रीडा आहारतज्ज्ञ, रिक्की कीन यांनी CNET ला सांगितले की, सर्वात आधी खेळाडूच्या पसंतीकडे लक्ष दिले जाते. त्या म्हणाल्या की, “खेळ कोणताही असो, आहार निश्चित करताना सर्वांत आधी वैयक्तिक प्राधान्ये, आवडी-निवडी लक्षात घेतल्या जातात. समजा खेळाडू शाकाहारी असेल तर डेअरी-फ्री, ग्लूटेन-फ्री आहाराचा विचार केला जातो.” उदाहरणार्थ, सनी ली ही एक अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. ती २०२० ऑलिम्पिकमधील विजेती आहे. मात्र, तिला मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान झाले आहे. या कारणास्तव ती कमी-सोडियमयुक्त आहार घेते. सीबीएस न्यूजशी बोलताना ती म्हणाली की, “मला आरोग्यदायी खाद्यपदार्थ खायला आवडतात. कारण, मला चांगलं वाटत असेल तरच मी चांगली कामगिरी करू शकते. मला फळे आणि भाज्या प्रचंड आवडतात. मी जितकं आरोग्यदायी खाता येईल, तितकं खाते. विशेषत: स्पर्धेच्या आधी माझा आहार आरोग्यदायीच असतो. अधिकाधिक ऊर्जा मिळवण्यासाठी प्रथिने आणि कर्बोदके खाण्यावर भर देते.” दुसरे एक उदाहरण आहे उसेन बोल्ट या खेळाडूचे! २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट दररोज १०० मॅकडोनाल्ड चिकन नगेट्स खायचा. कारण त्याला तेच आवडायचे. त्याने तीन सुवर्णपदके जिंकली होती.

हेही वाचा : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला… मनू भाकरचे कांस्यपदक वैशिष्ट्यपूर्ण कसे?

स्पर्धा असताना आणि स्पर्धा नसताना…

ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान एखादा खेळाडू काय खातो हे जितके महत्त्वाचे ठरते, तितकेच तो खेळाडू ऑफ सीझनमध्ये काय खातो हेही महत्त्वाचे ठरते. स्पर्धा नसताना खेळाडूचे कॅलरीचे सेवन तुलनेने कमी असते. स्पर्धा असताना आणि नसताना, आहार बदलत असला तरीही आरोग्यदायी खाण्यावरच भर दिला जातो.

जंक फूडला लांबूनच नमस्कार

खेळप्रकार अधिक कालावधीचा असो वा कमी, सहनशक्तीची अधिक परीक्षा घेणारा असो वा नसो; मात्र एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे खेळाडू प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ फारच कमी खातात. बर्गर आणि चिकन नगेट्ससारखे फास्ट-फूड्स अजिबात खाल्ले जात नाहीत. याबरोबरच मद्यसेवनालाही सक्तपणे नकार दिला जातो. ही सगळी पथ्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्येही दिसून येतील. तिथेही एक बार असला तरीही मद्यांश नसलेली पेयेच दिली जातात. काही देशांचे संघ विजयाचा उत्साह साजरा करण्यासाठी स्वतःहून मद्य आणू शकतात; मात्र पॅरिस ऑलिम्पिककडून त्याचा प्रचार केला जात नाही. मद्य शरीरातील निर्जलीकरणास प्रोत्साहन देते आणि शरीराची रिकव्हरी लांबणीवर टाकते. तसेच त्यामुळे स्नायूंची झीज भरून निघण्यासही विलंब होतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी झोप महत्त्वाची असते आणि मद्यामुळे झोपेवर परिणाम होतो, त्यामुळे मद्याला नकार दिला जातो.

Story img Loader