ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील अमेरिकन टीव्ही सीरिज ‘एमिली इन पॅरिस’वरून रोम व पॅरिसमध्ये वाद सुरू आहे. लवकरच टीव्ही सीरिजचा पाचवा सीझन येणार आहे. या सीरिजमध्ये एमिली नावाचे मुख्य पात्र रोमला निघून जाणार असल्याची चर्चा आहे. या अमेरिकन टीव्ही मालिकेने फ्रेंच पर्यटनाला खूप मदत केली आहे. आता हे पात्र रोममध्ये जाणार असल्याचे वृत्त येताच वादाला सुरुवात झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या सीरिजला इटलीच्या राजधानी रोममध्ये स्थलांतरीत करण्यापासून रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांचे सांगणे आहे. पण, युरोपियन राष्ट्रे एका टीव्ही सीरिजवरून का एवढी भांडत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ही सीरिज कशावर आधारित आहे?
पॅरिसमधील एमिली लिली कॉलिन्स हे सीरिजमधील मुख्य पात्र आहे, जी एक अमेरिकन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असते आणि शिकागोहून पॅरिसला कामासाठी स्थलांतरित होते. त्याबरोबर संपूर्ण पॅरिस फिरून त्याचा आनंद घेते. २०२० मध्ये कोरोना काळात ही सीरिज नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सीरिजेसमध्ये आली. नेटफ्लिक्सने पाचव्या सीझनसाठी टीव्ही सीरिजला एक नवे स्वरूप द्यायचे ठरवले आहे. त्याचे निर्माता आणि शो रनर डॅरेन स्टार यांच्यानुसार एमिली आता रोममध्ये स्थलांतरीत होणार आहे. या सीरिजने पॅरिसमधील जीवनाचा आदर्श आणि पॅरिसची एक रोमँटिक प्रतिमा तयार करून चाहत्यांची मने जिंकली. परंतु, अनेकदा पॅरिसमधील सीरिजमध्ये दाखविण्यात आलेल्या जीवनाचे वास्तवाशी फारसे साम्य नसल्यामुळे आणि पॅरिसमधील गरीब क्षेत्र टाळल्यामुळे या सीरिजवर टीकाही केली गेली आहे.
हेही वाचा : Workout Pill: आता जिमला जाण्याची चिंता मिटणार? व्यायामाची गोळी हा काय प्रकार आहे?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे बुधवारी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, “आम्ही त्यांना पॅरिसमध्येच राहण्यास सांगू. पॅरिसमधील एमिलीला रोममध्ये काही अर्थ नाही.” उल्लेखनीय बाब म्हणजे मॅक्रॉन या सीरिजबरोबर दीर्घकाळापासून संबंधित आहेत. त्यांच्या पत्नीचीही या सीरिजमध्ये एक छोटेखानी भूमिका राहिली आहे. एमिली त्यांना एका कॅफेमध्ये भेटते आणि सेल्फी मागते, असे काहीसे त्या भागात दाखविण्यात आले आहे. “मला खूप अभिमान वाटला आणि तिला हे करण्यात खूप आनंद झाला,” असेही मॅक्रॉन यांनी आपल्या पत्नीच्या कॅमिओबद्दल सांगितले. “केवळ १० मिनिटांचा तो सीन आहे; परंतु मला वाटते की, हा तिच्यासाठी खूप चांगला क्षण होता. मला वाटते की फ्रान्सच्या प्रतिमेसाठी हे चांगले आहे. एमिली सीरिजमुळे पॅरिसविषयी लोकांमध्ये एक वेगळे आकर्षण निर्माण झाले आहे.
रोमने यावर काय प्रतिसाद दिला?
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या टीकेनंतर रोमचे महापौर रॉबर्टो ग्वाल्टिएरी यांनी ‘एक्स’वर लिहिले, “प्रिय इमॅन्युएल मॅक्रॉन काळजी करू नका. एमिली रोममध्ये मजेत आहे. कोणी तिच्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तिचा निर्णय तिला घेऊ द्या.” राष्ट्रपती मॅक्रॉन यांना चिंता करण्यासारख्या अधिक महत्त्वाच्या बाबी नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी केला. “मला आशा आहे की, मॅक्रॉन विनोद करीत असावेत. कारण- त्यांना हे माहीत असले पाहिजे की, नेटफ्लिक्ससारखी कंपनी त्यांच्या राज्य प्रमुखांकडून आदेश घेत नाही किंवा राजकीय दबावावर आधारित निर्णय घेत नाही,” असेही ते म्हणाले. “एमिलीची सीरिज रोममध्ये शूट होणार आहे आणि त्यामुळे आमचे शहर अधिकाधिक महत्त्वाचे होत आहे, हे दिसून येते. आम्ही नेटफ्लिक्सच्या उत्पादन निर्णयांबद्दल अगदी निश्चिंत आहोत. ते काय करीत आहेत हे त्यांना माहीत आहे. खरे सांगायचे तर, आम्हाला वाटते की, मॅक्रॉन यांनी आता केवळ आराम करायला हवा,” अशीही टीका त्यांनी केली.
हेही वाचा : अणुबॉम्बचा स्फोट होतो तेव्हा नक्की काय होते? आण्विक स्फोटाचे परिणाम किती भीषण असतात?
टीव्ही शोवरून देश का भांडत आहेत?
फ्रान्सच्या नॅशनल सेंटर ऑफ सिनेमॅटोग्राफीने जानेवारीत केलेल्या संशोधनानुसार, काही फ्रेंच दर्शकांनी पॅरिसमधील बेघरपणासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सीरिजवर टीका केली होती. मात्र, तरीही या सीरिजमुळे देशाच्या राजधानीतील पर्यटन वाढले. बेल्जियन, स्पॅनिश, अमेरिकन, ब्रिटन, जर्मन व चिनी अशा सहा राष्ट्रीयत्वांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात असे आढळून आले की, जवळपास १० टक्के पर्यटकांनी विशिष्ट चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो पाहिल्यामुळे फ्रान्सला जाणे पसंत केले आणि त्यातील ३८ टक्के लोकांनी ‘एमिली इन पॅरिस’ ही सीरिज पाहिल्यामुळे पॅरिसला येण्याचा निर्णय घेतल्याचीही बाब समोर आली. मुख्य म्हणजे पॅरिस टुरिस्ट ऑफिसनेही ही सीरिज शूट करण्यात आलेली १० ठिकाणे जरूर पाहावीत, अशी शिफारस केली आहे. या मालिकेमुळे शहरात स्थलांतरीत होणार्यांची संख्या वाढल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच जेव्हा नेटफ्लिक्सने एमिलीच्या पॅरिसमधून निघण्याची घोषणा केली, तेव्हा मॅक्रॉन यांना ते पटले नाही.