सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) अधिवेशन सुरू असताना खळबळ उडवून देणारी घटना घडली. मूळचा लखनौचा सागर शर्मा आणि म्हैसूरचा डी. मनोरंजन अशा दोघांनी संसदेच्या व्हिजिटर्स गॅलरीतून थेट सभागृहात उडी घेतली. त्यानंतर या दोघांनी सभागृहात पिवळा धूर पसरवला. या घटनेनंतर संसद भवन, तसेच खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. दरम्यान, सभागृह सुरू असताना घुसखोरी होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी ३० वर्षांपूर्वी साधारण चार महिन्यांच्या अंतराने अशा दोन घटना घडल्या होत्या. आताच्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता, ३० वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते? या प्रकरणात पडकडण्यात आलेल्यांना नेमकी काय शिक्षा झाली होती? हे जाणून घेऊ.

पहिली घटना- ५ मे १९९४

याआधी संसदेत ५ मे १९९४ रोजी अशीच घटना घडली होती. सभागृहाचे कामकाज सुरू असताना प्रेमपाल सिंह सम्राट नावाच्या एका व्यक्तीने व्हिजिटर्स गॅलरीतून थेट सभागृहाच्या दालनात उडी घेतली होती. त्यानंतर सभागृहात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची नोंद पार्लमेंट प्रिव्हिलेजेस : डायजेस्ट ऑफ केसेस (१९५०-२०००), खंड दुसरा यामध्ये करण्यात आलेली आहे. सभागृहाचे तत्कालीन उपसभापती मल्लिकार्जुनैया यांनी तेव्हा याबाबत माहिती दिली होती. लोकसभा सचिवालयाने २००१ साली ही माहिती संकलित केलेली आहे.

maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?

समज देऊन सोडण्यात यावे, असा ठराव

तत्कालीन उपसभापती मल्लिकार्जुनैया यांच्या म्हणण्यानुसार ही घटना ५ मे १९९४ रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी घडली होती. प्रेमपाल सिंह सम्राट या व्यक्तीने सभागृहात उडी घेतल्यानंतर त्याला तत्काळ सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीची चौकशी केली होती. सम्राट या व्यक्तीने त्याने केलेल्या कृत्याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे, असे तेव्हा मल्लिकार्जुनैया यांनी सभागृहाला सांगितले होते. तसेच तत्कालीन संसदीय कार्यमंत्री मुकुल वासनिक यांनी सभागृहात एक ठराव सादर केला होता. “प्रेमलाल सिंह या व्यक्तीने गंभीर गुन्हा केला आहे. त्याने सदनाचा अवमान केला आहे,” असे या ठरावात नमूद करण्यात आले होते. तसेच त्याला हा गुन्हा केल्यामुळे कठोर शब्दांत समज देऊन सोडण्यात यावे, असेही या ठरावात म्हटले होते.

दुसरी घटना- २४ ऑगस्ट १९९४

या पहिल्या घटनेनंतर साधारण चार महिन्यांनी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजून ६ मिनिटांनी अशीच आणखी एक घटना घडली होती. या घटनेत मोहन पाठक नावाच्या व्यक्तीने व्हिजिटर्स गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. विशेष म्हणजे सभागृहात उडी घेऊन या व्यक्तीने घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर लगेच मनमोहन सिंह तिवारी नावाच्या आणखी एका व्यक्तीने व्हिजिटर्स गॅलरीतून उडी घेतली होती. या व्यक्तीनेदेखील मोहन पाठकला साथ देत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना तत्काळ अटक केली होती. या घटनेविषयी तत्कालीन उपसभापती मल्लिकार्जुनैया यांनी सभागृहाला माहिती दिली होती.

दिलगिरी व्यक्त करण्यास नकार

सभागृहात उडी घेणाऱ्यांनी आपल्या कृत्याबद्दल भाष्य केले आहे; पण त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली नाही, असे त्यांनी सभागृहाला सांगितले होते. त्यानंतर तत्कालीन संसदीय कार्यमंत्री वासनिक यांनी सभागृहासमोर एक ठराव ठेवला होता. त्यात “पाठक आणि तिवारी या दोन व्यक्तींनी गंभीर गुन्हा केला असून, सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांना २६ ऑगस्ट १९९४ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात यावी,” असा प्रस्ताव या ठरावात मांडण्यात आला होता. या ठरावानंतर अध्यक्षांनी तिहार येथील तुरुंगाच्या अधीक्षकांना तसे निर्देश दिले होते.