बुधवारी (१३ डिसेंबर) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेतील प्रेक्षक दालनातून थेट सभागृहात उडी घेत दोन तरुणांनी गोंधळ घातला. या तरुणांनी सभागृहात पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर संसदेच्या बाहेर असलेल्या आणखी दोघांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, या सर्व प्रकाराचा सूत्रधार असलेल्या ललित झा नावाच्या व्यक्तीने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. याच पार्श्वभूमीवर ललित झा कोण आहे? पोलिसांनी त्याला कसे अटक केले? पोलिसांनी या प्रकरणातील सर्व सहा आरोपींविरोधात कोणता गुन्हा दाखल केला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

ललित झा याला अटक

संसदेत घुसखोरी करण्यासाठी नियोजन आखणाऱ्या ललित झा नावाच्या व्यक्तीला २४ तासांनंतर अटक करण्यात आली आहे. या सर्व कटाचा ललित झा हा सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे. ललित झा याने स्वत:च दिल्लीतील कर्तव्यपथ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

तपासासाठी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक

ससंदेत जाऊन घोषणाबाजी करण्याची घटना जशी नाट्यमय आहे, अगदी तशाच प्रकारे ललित झा या व्यक्तीच्या अटकेचाही प्रसंग चांगलाच नाट्यमय आहे. कर्तव्यपथ पोलिस ठाण्यातून त्याला सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. संसदेत घडलेल्या या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी पोलिसांच्या या विशेष पथकाकडे सोपवण्यात आली आहे. संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर या घटनेतील चौघांना पोलिसांनी याआधीच अटक केली होती. या चारही आरोपींना सात दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

ललित झा याला अटक कशी झाली?

ललित मोहन झा हा संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदण्याच्या कटाचा सूत्रधार मानला जात आहे. बुधवारी ही घटना घडल्यानंतर ललित झा याला गुरुवारी अटक करण्यात आली. याबाबत दिल्ली पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर सांगितले आहे. “संसदेत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून झा संसद परिसरातून पसार झाला होता. तो राजस्थानमधील नागौर येथे गेला होता. त्याला तेथे त्याचे दोन मित्र भेटले. त्याने आपल्या मित्रांसोबत नागौर येथेच रात्र काढली. पोलिस आपला शोध घेत आहेत, हे समजल्यावर तो बसने परत दिल्लीत आला, त्यानंतर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली”, असे पोलिसांनी सांगितले.

नीलम देवी आणि अमोल शिंदे यांची घोषणाबाजी

बुधवारी मनोरंजन डी तसेच सागर शर्मा यांनी लोकसभेच्या सभागृहात उडी घेत पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याच वेळी संसदेच्या बाहेर नीलम देवी आणि अमोल शिंदे या दोन तरुणांनी घोषणाबाजी केली. या सर्व घटनेचा ललित झाने व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच हा व्हिडीओ त्याने नीलाक्ष आईच या तरुणाला पाठवला. नीलाक्ष आईच हा कोलकाता येथील एका संस्थेचा संस्थापक आहे. झादेखील या संस्थेशी निगडित होता. भगतसिंग फॅन पेज’च्या माध्यमातून ओळख

या कृत्यात सहभागी असलेल्या चौघांनी झा याच्याकडे मोबाइल जमा केले होते. ही घटना घडल्यानंतर झा चौघांचे मोबाइल फोन तसेच ओळखपत्र घेऊन संसद परिसरातून पळून गेला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो दिल्लीतून थेट कुचामन शहरात बसने गेला. तेथे तो महेश नावाच्या आपल्या साथीदाराला भेटला. महेशची ललित झा तसेच अन्य तरुणांशी ‘भगतसिंग फॅन पेज’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून ओळख झाली होती.

ललित झा याला महेशची मदत

त्यानंतर महेश, महेशचा चुलत भाऊ कैलाश तसेच ललित झा असे तिघे एका ढाब्यावर जेवायला गेले. तेथे ते रात्रभर एका रूममध्ये राहिले. गुरुवारच्या सकाळी महेश आणि कैलाशच्या मदतीने ललित झा याने संसदेत घोषणाबाजी तसेच धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या चौघांच्या मोबाइल फोनची विल्हेवाट लावली. त्यानंतर ललित झा आत्मसमर्पण करण्यासाठी दिल्लीला निघाला.

कर्तव्यपथ पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण

पोलिसांना गुरुवारी दुपारी कैलाशचा मोबाइल नंबर ट्रेस करण्यात यश आले. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार “ललित झा आणि महेश हे रेल्वेने जयपूरला निघाले आहेत. जयपूरहून ते दिल्लीला परतणार आहेत, असे कैलाशने पोलिसांना सांगितले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी करायला सुरुवात केली होती. तसेच संसद परिसरात नव्याने सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारच्या संध्याकाळी महेश आणि ललित झा पोलिसांना धौला कुआ या परिसरात आढळले. काही वेळानंतर कर्तव्यपथ पोलिस ठाण्यात या दोघांनी आत्मसमर्पण केले”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ललित झा कोण आहे?

ललित झा याला अटक केल्यानंतर संसदेतील सुरक्षाव्यवस्था भेदण्याच्या कटाचा तो सूत्रधार असल्याचा दावा केला जातोय. मात्र, झा याला अटक केल्यानंतर त्याला ओळखणाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तो कोणाशीही जास्त बोलत नसे, असे त्याला ओळखणाऱ्यांचे मत आहे. झा हा तरुण कोलकात्याच्या बाराबाजार भागातील रहिवासी आहे. तो मुळचा बिहारचा आहे. बाराबाजार येथे राजेश शुक्ला नावाची व्यक्ती ललित झाच्या शेजारी राहायची. “झा लोकांशी फार बोलत नसत. तो लहान मुलांना शिकवायचा. त्याचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. ललित झा याला आणखी एक भाऊ आहे”, असे राजेश शुक्ला यांनी सांगितले.

ललित झा याचा कोलकाताशी काय संबंध?

ललित झा याचा कोलकाताशी असलेला कथित संबंध सध्या चर्चेचा विषय ठऱत आहे. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी ललित झा आणि तृणमूल काँग्रेसचे आमदार तपस रॉय हे एकमेकांना ओळखतात, असा आरोप केला आहे. मुजुमदार यांनी हा आरोप करताना एक फोटोदेखील समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर हल्ला करण्याचा कट रचणारा ललित झा याचे तृणमूल काँग्रेसचे तपस रॉय यांच्याशी जवळचे संबंध आहेत. या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे, हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा पुरेसा नाहीये का?”, असे मुजुमदार समाजमाध्यमांवर म्हणाले आहेत.

तपस रॉय यांनी आरोप फेटाळले

दुसरीकडे तपस रॉय यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मला रोजच अनेक लोक भेटतात. मी प्रत्येकाला व्यक्तीश: ओळखत नाही. भाजपाचे अपयश झाकण्यासाठी या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असे रॉय म्हणाले.

तरुण तिरंगा घेऊन आले होते

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एकूण सहा जणांवर अटकेची कारवाई केली आहे. यात मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम देवी, विशाल, ललित झा या सहा जणांचा समावेश आहे. ससंदेची सुरक्षा भेदण्यासाठी या आरोपींनी अत्यंत काळजीपूर्वक योजना आखली होती, असे दिल्ली पोलिसांचे मत आहे. शहीद भगतसिंग यांनी ब्रिटिश राजवटीत सेंट्रल असेंब्लित बॉम्बफेक करत घोषणाबाजी केली होती. याच प्रेरणेतून या तरुणांना लोकसभेच्या सभागृहात पत्रके फेकायची होती. त्याआधी यातील दोन तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. हे तरुण सोबत भारताचा राष्ट्रीय ध्वज घेऊन आले होते.

आरोपींवर दहशतवादाचे आरोप

पोलिसांनी या आरोपींवर दहशतवादाच्या आरोपांखाली यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना सध्या सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. यूएपीए कायद्यासह आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गतही या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा दहशतवादी कृत्यात समावेश आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. संसदेवर हल्ला करण्यासाठीचा हा एक सुनियोजित कट होता, असेही पोलिस म्हणाले आहेत. यूएपीए कायद्यातील दहशतवाद आणि दहशतवादी कटासंबंधीच्या कलम १६ आणि कलम १८ अंतर्गत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader