Tipu Sultan: Hero or Tyrant? इतिहास हे आधुनिक भारतात राजकीय शस्त्र झाले आहे; दोष कोणाला नेमका द्यावा हा प्रश्नच आहे. सध्या राष्ट्रवाद, हिंदुत्त्व या पार्श्वभूमीवर भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन विकसित झाला आहे. तर या गोष्टीला विरोध करणारे इतिहासाच्या होणाऱ्या ध्रुवीकरणावर आक्षेप घेत आहेत. त्यामुळे त्रयस्थ म्हणून भारतीय संस्कृती आणि इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणारा सामान्य माणूस मात्र गोंधळात पडतो. एखाद्या घटनेकडे विरोधक आणि समर्थक अशा दोनच दृष्टिकोनातून पाहिले जाते. भारतीय इतिहासातील टिपू सुलतान हे प्रकरणही अशाच स्वरूपाचे आहे. या प्रकरणाला समर्थक आणि विरोधक असे दोन्ही कोन आहेत. त्यामुळेच टिपू सुलतानाच्या इतिहासाकडे पाहताना किंवा त्याचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याचा धांडोळा घेताना एखाद्या प्रसंगाकडे आपण कसे पाहतो हे बऱ्याचदा आपला नेमका दृष्टिकोन कोणाच्या बाजूने आहे, त्यावर ठरते. त्या ऐतिहासिक प्रसंगाकडे निकोप दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असते.

विक्रम संपत यांचे ‘द टिपू सुलतान’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले. त्यानंतर टिपू सुलतान आणि भारतीय राजकारण हा मुद्दा चर्चेत आला. त्यांनी बरखा दत्त यांना ‘मोजो’ या चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत भारतीय इतिहासातील टिपू सुलतानाविषयी असलेले समज आणि गैरसमज यावर भाष्य केले आहे, तसेच हाच त्यांच्या पुस्तकाचा मुख्य विषयही आहे. मूलतः त्यांनी दिलेल्या मुलाखतीत टिपू सुलतानाची हिंदूप्रेमी असणारी प्रतिमा कशी दिशाभूल करणारी आहे, हे स्पष्ट केले आहे. बरखा दत्त यांनी टिपूने मंदिरांना दिलेल्या देणगी विषयी विचारले असता, त्यांनी एका प्रसंगाचा उल्लेख केला हा प्रसंग मराठा इतिहासाशी संबंधित आहे. मराठ्यांनी शृंगेरी मठावर हल्ला करून तो मठ लुटला होता आणि त्यानंतर टिपूने या मठाच्या पुनर्बांधकामासाठी देणगी दिली होती. त्यामुळेच अनेक इतिहासकार टिपूची धर्मनिरपेक्ष भूमिका ठणकावून सांगतात. परंतु विक्रम संपत यांनी ही टिपूची राजकीय खेळी असल्याचे म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक घटना नेमकं काय सांगते याचा घेतलेला हा आढावा.

pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

अधिक वाचा: टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास !

टिपू कोण होता?

टिपू सुलतान म्हणजेच सुलतान फतेह अली टिपू याचा जन्म १७५१ साली हैदर अलीच्या पोटी झाला. त्याच्या युद्धातील पराक्रमामुळे तो शेर-ए-मैसूर (मैसूरचा सिंह) म्हणूनही ओळखला जात असे. टिपू सुलतानने ब्रिटिशांविरुद्ध आपले राज्य राखण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला असे मानले जाते. चौथ्या इंग्रज-मैसूर युद्धात, ब्रिटिशांनी निझाम आणि मराठ्यांच्या मदतीने १७९९ साली श्रीरंगपट्टणम येथे झालेल्या लढाईत टिपू सुलतानाचा पराभव केला. हे युद्ध टिपूच्या आयुष्यातील शेवटचे युद्ध ठरले आणि त्यानंतर मैसूर राज्य ब्रिटिश साम्राज्याच्या अखत्यारित आले. एकूणच भारतीय इतिहासात इंग्रजांविरुद्ध लढा देणारा सुलतान म्हणून त्याचा गौरव केला जातो.

टिपू सुलतान (विकिपीडिया)

१७९० ते १७९२ या कालखंडादरम्यान शृंगेरी मठावर केलेल्या हल्ल्याचा इतिहास नेमका काय सांगितला जातो?

मैसूर हा भाग १७६१ ते १७९९ पर्यंत हैदर अली आणि नंतर टिपू सुलतान यांच्या अधिपत्याखाली होता. या भागातील १७९१ साली शृंगेरी मठावर झालेल्या हल्ल्याचे आणि लुटीचे काही संदर्भ सापडतात. शृंगेरी मठ हिंदू धर्मातील पवित्र स्थळांपैकी एक आहे. शृंगेरी मठ एक सामान्य पूजा स्थळ नव्हते, हिंदू अद्वैत तत्त्वज्ञानाचे संस्थापक आद्य शंकराचार्यांनी एक हजार वर्षांपूर्वी या मठाची स्थापना केली होती. शंकराचार्यांनी दक्षिणेत शृंगेरी, पूर्वेस पुरी, पश्चिमेस द्वारका, आणि उत्तर दिशेला जोशीमठ अशी चार दिशांना चार मठांची स्थापना केली. टिपू सुलतानाने शृंगेरी मठाच्या विटंबनेबद्दल दुःख व्यक्त करणारी पत्रे मठाला लिहिली आणि मठाच्या पुनर्बांधणीसाठी मदतही देऊ केल्याचा संदर्भ सापडतो.

टिपू धर्मसहिष्णू होता का?

५ सप्टेंबर १७८४ रोजी नाना फडणीस यांनी महादजी शिंदे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, टिपूचे वागणे चांगले नाही, तो अहंकाराने भरलेला आहे. अलीकडेच नूर मोहम्मदला टिपूकडून एक पत्र मिळाले, त्याने ५० हजार हिंदू, ज्यात महिला व लहान मुलांचा समावेश होता, त्यांचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले. टिपूने या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख केला की, ‘पूर्वी कुठल्याही पादशाहने किंवा वजिराने हे केले नव्हते, परंतु अल्लाच्या कृपेने मला ते करता आले.’ तो संपूर्ण खेडीच्या खेडी धर्मांतरित करतो.

अधिक वाचा: Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध?

शृंगेरी मठावरील हल्ला

१७९०-१७९२ च्या टिपूविरुद्धच्या मोहिमेदरम्यान मराठा सेनापती रघुनाथ राव ‘दादा’ यांच्या सैन्यातील एका टोळीने शंकराचार्यांच्या शृंगेरी मठावर हल्ला करून लुटमार व पवित्र स्थळाची विटंबना केली. या हल्ल्याचा कलंक आजपर्यंत टिकून आहे. या हल्ल्यासाठी मराठे तसेच संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व करणारे परशुराम भाऊ पटवर्धन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. हैदर अली आणि त्यानंतर टिपू बरोबर सुरु असलेल्या संघर्षात मराठ्यांचे बरेच नुकसान झाले होते. धर्मांतरण आणि बलात्कार यासारख्या पाशवी गोष्टींचा यात समावेश होता. म्हणूनच नाना फडणीस यांनी होळकरांना परशुरामभाऊ यांच्यासोबत सामील होण्याची विनंती केली होती आणि म्हणूनच १७८६ साली मराठ्यांनी टिपूविरुद्ध मोहीम सुरू केली व बदामी किल्ला जिंकला.

Vidyashankara temple at Sringeri Peetham
विद्याशंकर मंदिर, शृंगेरी पीठ

टिपूने खंडणी मान्य केली

तुकोजी होळकर आणि परशुरामभाऊ यांनी टिपूबरोबर एक करार केला, ज्यामध्ये टिपूने ४८ लाख रुपये खंडणी देण्याचे मान्य केले. शिवाय कैद्यांचीही देवाण-घेवाणही करण्यात आली. १७८६ साली नानांना इंग्रजांकडून मदतीच्या विनंतीला नकार मिळाला होता, परंतु १७९० पर्यंत इंग्रजांना टिपूविरुद्ध मराठ्यांची मदत हवी होती. १७९० मध्ये एक समन्वित योजना आखण्यात आली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने टिपूविरुद्ध मोहीम हाती घेतली आणि तत्कालीन मद्रास (आताचे चेन्नई) गाठले. हरिपंत फडके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातून मराठा सैन्य निघाले आणि त्यानंतर पटवर्धन बंधू, परशुरामभाऊ आणि रघुनाथराव ‘दादा’ यांच्या नेतृत्वाखालील दुसरे सैन्य पाठवण्यात आले. ६ एप्रिल १७९१ रोजी महिन्यांच्या वेढ्यानंतर परशुरामभाऊंनी धारवाड किल्ला जिंकला, तुंगभद्रा पार करून हरिहर येथे रघुनाथराव यांच्यासोबत सामील झाले. त्यानंतर रघुनाथराव यांनी दक्षिणेकडे मयकोंडा आणि चेंगीरी किल्ले जिंकले.

काही महत्त्वाचे संदर्भ पुढीलप्रमाणे

१. याच सुमारास मिरज येथील बाळासाहेबांना नीलकंठ अण्णा (रघुनाथराव दादांचे वडील) यांचे पत्र आले, ज्यात शृंगेरी मठावर झालेल्या हल्ल्याचा पहिला उल्लेख सापडतो. पत्रात म्हटले आहे की, “… दादासाहेबांच्या सैन्यातील लामाण आणि पिंडारी शृंगेरी मठात गेले आणि लाखो रुपये लुटले, ज्यात हत्तीचाही समावेश होता. मी दादाला त्या मालाची जप्ती करण्याचे लिहिले आहे.”

२. यानंतर एप्रिलच्या मध्यात आणखी एक पत्र आले; “लुटारू पकडले गेले आहेत आणि मठाचा जांबूरा आणि हत्ती ताब्यात घेतले गेले. मुख्य १० ते २० आरोपींना अटक केली गेली. याच वेळी दादासाहेबांनी लिहिले की ते त्यांच्या माणसांविरुद्ध कारवाई करतील. त्या माणसांना आणि हत्तीला त्यांच्याकडे पाठवण्यात आले.”

३. १४ मे रोजी रघुनाथरावांचा मुलगा त्र्यंबकरावाने मिरज येथील आपल्या काकांना लिहिले, “सैन्य तुंगानदी ओलांडण्याआधीच लामाण आणि पिंडारी शिमोग्याला पोहोचले. त्यांनी शृंगेरी येथील स्वामींच्या मठाला लुटले. स्वामींचा दंड आणि कमंडलू घेतले गेले. काहीच उरले नाही. महिलांवर अत्याचार झाले (बलात्कार). अनेक महिलांनी आत्महत्या केली. स्वामींची मूर्ती, शिवलिंग इत्यादी लुटले गेले. हत्तींचे तबेले रिकामे केले गेले आणि लामाणांनी ताब्यात घेतले. स्वामींनी उपवास करून तपस्या केली, पाच दिवस उपवास करून जीवन त्याग केला…” पत्र पुढे म्हणते, “जेव्हा पित्याला या लुटीबद्दल कळले, त्यांनी लामाणांना पकडण्यासाठी घोडदळ पाठवले. हत्ती ताब्यात घेतला गेला. बाकीच्या चोरीच्या वस्तू सापडलेल्या नाहीत.”

४. ही बाब खूप गाजली आणि पुण्यातील नाना फडणवीसांच्या कानावर पोहोचली. डिसेंबर १७९१ मध्ये त्यांचे एक पत्र लेखक रघुनाथरावांकडे पोहोचले. त्या पत्रात लिहिले होते की,“… लामाण आणि लुटारूंनी श्रींगेरि मठ लुटला; ही बातमी दरबारात पोहोचली. सर्व तपशील शोधले पाहिजेत. तुम्ही लिहिले आहे की ‘लुटारू सर्व दिशांनी आले होते. तुम्ही कारवाई केली आहे आणि इतरांनाही गुन्हेगारांविरुद्ध असेच करावे.’ नानांनी उत्तर पाठवले, ‘स्वामींच्या मठाची लूट झाली आणि त्यामुळे स्वामी उपवास करत आहेत. हे राज्यासाठी चांगले नाही; स्वामींचा असंतोष चांगला नाही….. कडक कारवाई करून स्वामींना नुकसानभरपाई दिली पाहिजे आणि त्यांची कृपा मिळवली पाहिजे…’

अधिक वाचा: Snake Species Named After Leonardo DiCaprio: टायटॅनिकच्या हिरोचं नाव भारतीय सापाला; काय आहे या दोघांमध्ये संबंध?

५. मराठा सैन्यातील पिंडारी आणि टिपूच्या सैन्यातील बेयड सैनिक हे अनियमित सैनिक होते, जे युद्धानंतर लूटमार करत असत. त्यांना पगार दिला जात नसे आणि ते लुटीमधून आपला उदरनिर्वाह चालवत. २४ एप्रिल १७९२ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या वतीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘..टिपूच्या राज्यातील बेयड घोडेस्वार आणि मराठा सैन्यातील पिंडारी घोडेस्वार यांना कोणत्याही नियंत्रणाशिवाय अनियमित आणि लुटारू म्हणून कार्यरत ठेवण्यात आले होते’

The Last Effort and Fall of Tipu Sultan by Henry Singleton, c. 1800
टिपू सुलतान शेवटच्या क्षणी (विकिपीडिया)

शृंगेरी मठावरचा हल्ला हा मराठ्यांचे धोरण किंवा युद्ध योजना नव्हती. हे त्या लुटारू सैनिकांनी आणि लामाणांनी केले होते. इतिहासकार व्ही. व्ही. खरे यांनी मोठ्या प्रमाणात पत्रे गोळा केली आहेत. ते लिहितात की, शृंगेरी मठ हा त्या प्रदेशातील श्रीमंतांसाठी एक सुरक्षित ठिकाण मानले जात होते. पेशवे-मराठे हिंदू असल्याने ते मठाचे नुकसान करणार नाहीत. जरी नियमित सैन्याने मठावर हल्ला केला नसला तरी, नियम व नियंत्रणाशिवाय वागणाऱ्या पिंडाऱ्यांनी हल्ला केला होता हेही तितकेच खरे आहे. आणि त्यामुळेच लागलेला डाग हा पुसणं कठीण आहे. मराठा प्रशासनाला या कृत्यामुळे दुःख झाले होते आणि स्वामींना नुकसानभरपाई देण्यासाठी आणि त्यांना शांत करण्याचे प्रयत्न जवळपास एक वर्ष चालू होते. त्याच सुमारास १७९१ साली, सर्व बाजूंनी हल्ल्याला सामोरे जात असताना, टिपूने मंदिर आणि ब्राह्मणांप्रती आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. यापूर्वी त्याने न केलेल्या गोष्टींचा अवलंब केला.