Xenotransplantation for Organ Failure माणसाने विज्ञानामुळे बरीच प्रगती केली आहे. माणसाचे आयुर्मान वाढवण्यासाठीही विज्ञानात अनेक संशोधने केली जात आहेत. त्यातीलच एक संशोधन म्हणजे झेनोट्रांसप्लांटेशन. झेनोट्रांसप्लांटेशन ही एक अशी शस्त्रक्रिया आहे, ज्यात डुकराच्या अवयवांचा वापर केला जातो. अलीकडे झेनोट्रांसप्लांटेशन हे नाव बरेच चर्चेत आहे. दोन महिन्यांपूर्वी झेनोट्रांसप्लांटेशनद्वारेच एका व्यक्तीच्या शरीरात जनुकीय सुधारित डुकराची किडनी रोपण करण्यात यश आले. परंतु, शनिवारी (११ मे) संबंधित व्यक्तीचे निधन झाले.

मार्चमध्ये ६२ वर्षीय रिचर्ड रिक स्लेमन यांच्यावर जनुकीय सुधारित डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. परंतु, मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलने त्यांचा मृत्यू किडनी प्रत्यारोपणामुळे झाला असल्याचे नाकारले. याच रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिक यांच्या कुटुंबानेही डॉक्टरांचे त्यांच्या कामाबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “झेनोट्रांसप्लांट यशस्वी करणार्‍या डॉक्टरांच्या प्रचंड प्रयत्नांमुळे आमच्या कुटुंबाला रिकबरोबर आणखी सात आठवडे घालवता आले.” झेनोट्रांसप्लांटेशन नक्की काय आहे? यात डुकरांचा वापर का केला जातो? आणि खरंच या शस्त्रक्रियेमुळे माणूस दीर्घायुषी होणार का? याबद्दल जाणून घ्या.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
painted stork death loksatta news
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
झेनोट्रांसप्लांटेशनमध्ये आतापर्यंत डुकराच्या हृदय आणि किडनीचा वापर करण्यात आला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : रशिया- युक्रेन युद्धः लष्करी पार्श्वभूमी नसलेल्या नेत्याला पुतिन यांनी केले संरक्षणमंत्री, कारण काय?

झेनोट्रांसप्लांटेशन नक्की काय आहे?

अमेरिकन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या मते, “झेनोट्रांसप्लांटेशन ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मानवेतर प्राणी स्रोतापासून पेशी, अवयव किंवा उतींचे प्रत्यारोपण केले जाते. या प्रक्रियेमध्ये जनुकीय सुधारित अवयवांचादेखील समावेश आहे. मानवी अवयवांच्या वाढत्या मागण्यांमुळे ही शस्त्रक्रिया वरदान ठरेल, असे शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.

झेनोट्रांसप्लांटेशन कसे होते?

२०२३ मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लँगोनच्या ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले की, शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपित करणे हे नियमित प्रत्यारोपणापेक्षा फारसे वेगळे नाही आणि शस्त्रक्रियेनंतर रोगप्रतिकारक शक्तीसाठी घेतली जाणारी औषधेही तीच आहेत. परंतु, यातील सर्वात महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे निवडलेल्या प्राण्यांच्या अवयवामध्ये अनुवांशिक बदल करणे. अनुवांशिक बदल केल्यानंतरच मानवी शरीर हे अवयव स्वीकारू शकते.

रिचर्ड रिक स्लेमन यांच्यावर जनुकीय सुधारित डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

रिक स्लेमन यांची शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालात म्हटले आहे की, रिक यांच्या प्रकरणात त्यांना डुकराच्या किडनीत त्यांनी ६९ जनुकं बदलली. डुकरांच्या जनुकांमध्ये साखरेचा रेणू आढळतो. मानवी शरीर याला स्वीकारू शकत नाही, त्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी डुकरांची जनुके बदलून त्यातील साखरेचा रेणू काढून टाकला जातो. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतरही शरीराच्या अवयवाची प्रतिक्रिया तपासण्यासाठी सतत निरीक्षण करणे आवश्यक असते.

झेनोट्रांसप्लांटेशनसाठी डुकरांचा वापर का केला जातो?

डुकराचे शारीरिक मापदंड माणसासारखेच असतात. शेतात डुकरांचे प्रजनन व्यापक आणि किफायतशीरदेखील आहे. जानेवारी २०२२ मध्ये, जनुकीय सुधारित डुकराच्या हृदयाचे पहिले झेनोट्रांसप्लांटेशन करण्यात आले होते. परंतु, डुकराच्या हृदयातील सुप्त विषाणूमुळे संबंधित व्यक्तीचे स्वास्थ्य बिघडले आणि दोन महिन्यांनंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

झेनोट्रांसप्लांटेशनसमोरील आव्हाने

प्रथम हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, माणसाचे शरीर डुकराचा अवयव स्वीकारू शकेल. मुळात माणसांना बरे करण्यासाठी प्राण्यांच्या पेशी आणि अवयवांचा वापर केला जातो. पहिल्यांदा १९८० साली भारतात डुकराचे हृदय मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्याचा प्रयत्न झाला होता. रुग्णांना आवश्यक असलेल्या प्रत्यारोपणाची संख्या आणि दात्याच्या अवयवांची उपलब्धता यांच्यातील महत्त्वाच्या अंतरामुळे अशा प्रक्रियेची गरज भासू लागली. ‘नेचर’मधील २०२४ च्या लेखात असे नमूद केले आहे, “एकट्या अमेरिकेमध्ये जवळजवळ ९०,००० लोक किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्यारोपणाअभावी दरवर्षी ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे.”

हेही वाचा : बुरखा परिधान केलेल्या महिलांची मतदान केंद्रांवर ओळख कशी तपासली जाते? भाजपा उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याचे कारण काय?

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या शस्त्रक्रिया विभागाच्या वेबसाइटमध्येदेखील प्राण्यांच्या पेशी आणि उतींच्या मदतीने केल्या जाणार्‍या न्यूरोडीजनरेटिव्ह डिसऑर्डर आणि मधुमेहावरील उपचाराविषयी सांगण्यात आले आहे. यातील आणखी एक चिंतेची बाब म्हणजे रेट्रोवायरसद्वारे क्रॉस-प्रजाती संसर्ग होण्याची शक्यता असते आणि संसर्गानंतर अनेक वर्षांनी गंभीर आजार होऊ शकतो.

Story img Loader