पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून लावण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून २६ पक्षांच्या नव्या आघाडीला ‘इंडिया’ (Indian National Developmental Inclusive Alliance) असे नाव दिले. तत्कालीन यूपीए एक आणि दोन सरकारवर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसेच यूपीएचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. त्यामुळे यावेळी झालेल्या नव्या आघाडीला ‘इंडिया’ असे वेगळे नाव देण्यात आले. साहजिकच सत्ताधारी भाजपाकडून यावर प्रतिक्रिया उमटली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा आणि खासदारांच्या बैठकांमधून ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्र सोडले. आता ‘इंडिया’ या नावाचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिल्यामुळे “प्रतीके आणि नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध) कायदा, १९५०” [The Emblems and Names (Prevention of Improper Use)] या कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया मागितली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा