जगभरातील तरुण पिंक कोकेन म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंथेटिक ड्रगच्या आहारी जात आहेत. स्पेन, ब्रिटन आणि त्यापलीकडेही अनेक देशांमध्ये पिंक कोकेन चिंतेचा विषय ठरत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्पॅनिश अधिकाऱ्यांनी आतापर्यंतचा सर्वांत मोठा सिंथेटिक ड्रगचा साठा जप्त केला. त्यात १० लाखांहून अधिक एक्स्टसी गोळ्यांसह मोठ्या प्रमाणात पिंक कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनचा ड्रगसंबंधित मृत्यूंच्या वाढत्या संख्येशी संबंध आहे. पिंक कोकेनची तरुणांमधील वाढती लोकप्रियता चिंतेचा विषय ठरत आहे. काय आहे पिंक कोकेन? तरुणांमध्ये याची लोकप्रियता वाढण्याचे कारण काय? त्याविषयी आपण जाणून घेऊ.

पिंक कोकेन म्हणजे काय?

पिंक कोकेनमध्ये एमडीएमए, केटामाइन व २ सी-बीसह इतर विविध पदार्थांचे मिश्रण असते. एमडीएमए सामान्यतः एक्स्टसी म्हणून ओळखले जाते, ते अतिशय उत्तेजक असते. तर केटामाइन हा अमली पदार्थ घेतल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची नशा येते. हे भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधात वापरले जाते. २ सी-बी ही औषधे सायकेडेलिक्स म्हणून वर्गीकृत आहेत; परंतु तीदेखील उत्तेजक असतात. सामान्यतः कोकेनचा हा प्रकार पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात आढळतो. पिंक कोकेन त्याच्या रंगासाठी ओळखले जाते. लोक त्याकडे आकर्षित व्हावेत यासाठी त्याला एक रंग देण्यात आला आहे. हे कोकेन फूड कलर आणि कधी कधी स्ट्रॉबेरी किंवा इतर अर्क वापरून रंगीत केले जाते. लॅटिन अमेरिकेतील पार्टी सीनवर या ड्रगला लोकप्रियता मिळाली आणि आता ते युरोपमध्ये पसरले आहे. पिंक कोकेनची ‘कोकेना रोसाडा’, ‘ट्युसी’, ‘व्हीनस’ व ‘इरॉस’ अशी अनेक नावे आहेत.

Hungry Ghost festival
भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Local crime investigation team exposed chain adulterating food spices with harmful dyes and chemicals
धुळे: मसाल्यांमध्ये ही भेसळ करुन लोकांच्या आरोग्याशी खेळ
chess olympiad 2024, india women participants
बुद्धीबळ सम्राज्ञी… बुध्दीबळ ऑलिंपियाडमधल्या ‘त्या’ पाचजणी आहेत तरी कोण?
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
Marathwada is a leader in drone technology
ड्रोन तंत्रज्ञानात मराठवाडा अग्रेसर
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
Traditional Outfit Ideas to Dress for Ganesh Chaturthi 2024
नावीन्यपूर्ण परंपरा
या महिन्याच्या सुरुवातीला स्पॅनिश अधिकाऱ्यांनी आतापर्यंतचा सर्वांत मोठा सिंथेटिक ड्रगचा साठा जप्त केला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : चीनची ४४ वर्षांनंतर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र चाचणी; याचा अर्थ काय? जगासाठी ही चिंतेची बाब आहे का?

डिझायनर पार्टी ड्रग

पिंक कोकेन हे अनेक पदार्थांचे मिश्रण असल्याने आरोग्यासाठी ते अधिक धोकादायक आहे. त्यात केटामाइनचा समावेश आहे. केटामाइन गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. केटामाइन हा अमली पदार्थ घेतल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची नशा येते. आपले शरीर हे स्वत:पासून दूर असल्याचे जाणवते. पूर्वी याचा वापर भूल देण्यासाठी केला जात होता. क्लब ड्रग म्हणून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या केटामाइनच्या गैरवापरामुळे लोक बेशुद्ध पडू शकतात किंवा श्वासनाबाबतचीही समस्या निर्माण होऊ शकते.

त्याच्या विशिष्ट रंगामुळे तरुण त्याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञ पिंक कोकेनची तुलना रशियन रूलेट खेळण्याशी करतात आणि पिंक कोकेनचे अप्रत्याशित आणि धोकादायक स्वरूप अधोरेखित करतात. हे ड्रग इबीझाच्या पलीकडे ब्रिटनमध्ये पसरले आहे आणि स्कॉटलंड, वेल्स, तसेच इंग्लंडमधील काही भागांमध्ये त्याचा वापर झाल्याचे पुरावे आहेत. न्यूयॉर्क शहरातही याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

पिंक कोकेन हे अनेक पदार्थांचे मिश्रण असल्याने आरोग्यासाठी ते अधिक धोकादायक आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

या गंभीर परिस्थितीमुळे संपूर्ण युरोपमधील आरोग्य अधिकारी घाबरले आहेत. पिंक कोकेन मानक औषध चाचणीद्वारे शोधणे कठीण आहे; विशेषत: स्पेनमध्ये. कारण- स्पेनमध्ये अद्याप त्यासाठी सुसज्ज व्यवस्था नाही. हे औषध स्पेनमध्ये १०० डॉलर्स प्रति ग्रॅम दराने विकले जाते. स्पॅनिश अधिकारी त्याचे वितरण रोखण्यासाठी काम करीत आहेत. ब्रिटनमध्ये पिंक कोकेन हे औषधांचा गैरवापर कायदा १९७१ अंतर्गत येते.

ड्रग-चेकिंग किट

पिंक कोकेनच्या वाढीमुळे अधोरेखित झालेली सर्वांत तातडीची गरज म्हणजे प्रवेशयोग्य ड्रग तपासणी वाढवणे. लोक ज्या पदार्थांचे सेवन करू इच्छितात, त्यांची चाचणी करण्यासाठी आणि हानी रोखण्यासाठी ड्रग-चेकिंग किट एक महत्त्वाचे साधन आहे. या किटमुळे वापरकर्त्यांना अज्ञात घटक ओळखण्यास मदत मिळू शकते. त्यासह जनजागृती मोहीम आणि साह्य सेवा हादेखील हानी कमी करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्पेनच्या सिव्हिल पोलिस ड्रग ॲनालिसिस ग्रुपच्या कॅप्टन मारिया एलेना कोगोलो यांच्या मते, पिंक कोकेन प्रामुख्याने नाईट क्लब आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये आढळते.

हेही वाचा : तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?

स्पॅनिश ड्रग टेस्टिंग फॅसिलिटीच्या समन्वयक बर्टा दा ला वेगा यांच्या मते, हे ड्रग तयार करण्यासाठी फार खर्च येत नाही. डीलर्स एक ग्राम एमडीएमए तीन हजार रुपयांना आणि केटामाइन सुमारे दोन हजार रुपयांना खरेदी करतात. त्यानंतर त्यात गुलाबी रंग टाकला जातो आणि स्ट्रॉबेरीचा अर्कही टाकला जातो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा अमली पदार्थ इतका धोकादायक आहे की, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.