PM Modi at Sindhudurg on Indian Navy Day 2023: गार्डन रीच शिपबिल्डर्स अॅण्ड इंजिनीअर्स (GRSE) या कंपनी मार्फत भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेल्या आठ पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील वेगवान कारवाई नौका (ASW-SWC) प्रकल्पांच्या मालिकेतील चौथी ‘अमिनी’ वेगवान नौका अलीकडेच तामिळनाडूमधील कट्टुपल्ली येथे भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानिमित्ताने समजून घेऊया की, भारतीय नौदलातील युद्धनौका आणि पाणबुड्यांचे नामकरण कसे केले जाते.
भारतीय नौदलासाठी देशांतर्गत शिपयार्ड्सद्वारे भारतातच निर्मिती करण्यात येणाऱ्या आठ पाणबुडीविरोधी वेगवान गस्तीनौकांच्या मालिकेतील ही चौथी नौका आहे. या जहाजाचे नाव भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील लक्षद्वीप द्वीपसमूहातील सामरिककदृष्ट्या महत्त्वाच्या बेटाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, हे बेट कोची, केरळपासून सुमारे ४०० किमी अंतरावर आहे.
इंफाळ- ईशान्येकडचे पहिलेच नामकरण
आयएनएस विक्रांत, आयएनएस इंफाळ अशी युद्धनौकांची नावे आपण वारंवार ऐकतो. ही नावे नौदलाच्या युद्धनौका अथवा पाणबुड्या किंवा नौदल तळाशी संबंधित असतात. महत्त्वाचे म्हणजे या नावांची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडलेली असते. अमिनी प्रमाणे २०१९ मध्ये भारतीय नौदलाची आयएनएस इंफाळ ही स्टेल्थ गाईडेड- क्षेपणास्त्र विनाशिका दाखल झाली. ईशान्येकडील शहराच्या नावावर आधारित अशी ही भारतीय नौदलाची पहिलीत युद्धनौका आहे. आयएनएस इंफाळ ही विशाखापट्टणम वर्गातील तिसरी विनाशिका आहे आणि २० ऑक्टोबर २०२३ रोजी ती भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच २०२३ च्या अखेरीस ती भारतीय नौदलात रितसर दाखलही होईल. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडी अथवा नौदल तळाला देशाच्या ईशान्येकडील शहराचे नाव देण्याची ही पहिलीच घटना होती. या संदर्भात व्यक्त होताना मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोम्बम बिरेन सिंग यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान मणिपूरची राजधानी इंफाळ ही प्रमुख युद्धभूमी कार्यरत होती या आठवण करून देत हा परिचय या निमित्ताने नामकरण करत जगासमोर आणल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. म्हणूनच भारतीय नौदलाच्या जहाजांची नावे वर्षानुवर्षे कशी विकसित झाली आहेत, हे जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.
आणखी वाचा: नेपोलियनला भारत का जिंकायचा होता?
भारतीय नौदल आपल्या युद्धनौकांची नावे कसे ठरवते?
संरक्षण मंत्रालयातील अंतर्गत नामांकन समितीवर (INC) ‘जहाजे आणि पाणबुड्यांच्या नामकरणाची जबाबदारी असते. सहाय्यक नौदल प्रमुख आयएनसीचे प्रमुख आहेत आणि इतर सदस्यांमध्ये मंत्रालयाचा ऐतिहासिक विभाग आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी यांचाही या समितीमध्ये समावेश असतो. माजी नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत यांनी ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “भारतीय प्रजासत्ताकातील विविध पैलूंनुसार आपल्या युद्धनौकांना आणि पाणबुड्यांना नावे देण्याची ही एक चांगली परंपरा आहे. “युद्धनौकांना या पद्धतीने नामकरण केल्याने आपल्याला भारतातील विविधतेकडे लक्ष देणे शक्य होते. ‘आयएनएस इंफाळ’चे नामकरण मला आनंदित करते. भारताच्या ईशान्येतील एका शहराच्या नावावर आम्ही दीर्घप्रतिक्षेनंतर का होईना पण नाव दिले हे खूप छान आहे. मी सेवेत असताना मला एका युद्धनौकेला काश्मीरचे नाव द्यायचे होते, परंतु सरकारने मला तसे करण्यास परवानगी दिली नाही.”
भागवत सांगतात, युद्धनौकांची नावे अनेकदा पूर्वी सेवेतून निवृत्त झालेल्या युद्धनौकांनुसारही ठेवली जातात. विशिष्ट प्रकारच्या युद्धनौकांमध्ये एकसमानता राखण्यासाठी, INC काही धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. उदाहरणार्थ, विमानवाहू युद्धनौकांना अमूर्त नावे दिली जातात, उदाहरणार्थ- विक्रांत, विराट किंवा विक्रमादित्य. फ्रिगेट्सना पर्वतराजी उदाहरणार्थ – सह्याद्री, सातपुडा आदी नावे देण्यात आली आहेत. याशिवाय गोदावरी, गोमती, गंगा अशी नद्या किंवा शस्त्रे उदाहरणार्थ कार्मुक, त्रिशूल अशी नावे देण्यात आली आहेत. तर कॉर्वेट्सची नावे वैयक्तिक शस्त्रांनुसार दिली जातात.
खाली सूचीबद्ध केलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाने वापरलेल्या जहाजांचा समावेश आहे. त्यापैकी काही ब्रिटिशकालीन रॉयल इंडियन नेव्हीची होती आणि त्यांना स्वतंत्र भारताचा वारसा लाभला होता.
विमानवाहू युद्धनौका (Aircraft carriers)
आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका मॅजेस्टिक वर्गातील तर त्यानंतर दाखल झालेली आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका सेंटॉर वर्गातील होती. सध्या भारतीय नौदलाकडे असलेली आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका किव्ह वर्गातील आहे.
आणखी वाचा: बारसूचा वाद: राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले मायनाक भंडारी कोण …
विनाशिका (Destroyers)
भारतीय नौदलाच्या सर्व विनाशकांना महत्त्वाच्या शहरांची किंवा ऐतिहासिक भारतीय योद्ध्यांची किंवा नद्यांची नावे देण्यात आली आहेत. ऐतिहासिक विनाशिकांमध्ये आर वर्गातील आयएनएस राजपूत, आयएनएस रणजीत आणि आयएनएस राणा यांचा समावेश होता. आर वर्गानंतर, एक Hunt class सुरू करण्यात आला, ज्यामध्ये INS गोदावरी, INS गोमती आणि INS गंगा यांचा समावेश होता. भारतीय नौदलाकडे सध्या विनाशकांचे तीन सक्रिय वर्ग आहेत. कोलकाता क्लासच्या स्टेल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र विनाशिकांमध्ये INS कोलकाता, INS कोची आणि INS चेन्नई यांचा समावेश आहे. तर मार्गदर्शित-क्षेपणास्त्र विनाशिकांचे दोन वर्ग आहेत. यामध्ये दिल्ली वर्गात INS दिल्ली, INS म्हैसूर आणि INS मुंबई आणि राजपूत वर्गातील INS राजपूत, INS राणा, INS रणजीत, INS रणवीर आणि INS रणविजय यांचा समावेश आहे.
फ्रिगेट्स आणि क्रूझर (Frigates and cruisers)
दोन्ही फ्रिगेट्स आणि क्रूझरची नावे पर्वतराजी, नद्या किंवा वैयक्तिक शस्त्रे यांच्या नावावर आहेत. सुरुवातीला भारतीय नौदलाने नद्यांचे नाव एका वर्गाच्या फ्रिगेट्सना दिले. या फ्रिगेट्समध्ये HMIS कुकरी, HMIS बंगाल, HMIS हुगळी आणि HMIS Tir यांचा समावेश होता. हा युद्धनौकांचा वारसा ब्रिटिशांकडून आला होता. त्यामुळे त्यात HM म्हणजे ‘हर मॅजेस्टीज’ असा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख आढळतो. १९५९ ते १९८५ सालच्या दरम्यान नौदलाने पाच वेगवेगळ्या वर्गातील फ्रिगेट्स सेवेत दाखल केल्या. आयएनएस खुकरी, आयएनएस किरपाण आणि आयएनएस कुठार या ब्लॅकवूड वर्गातील होत्या. त्यानंतर व्हिटबी क्लासमधील आयएनएस तलवार आणि आयएनएस त्रिशूल यांना सेवेत आणले. कार्यान्वित होणार्या फ्रिगेट्सचा पुढील लेपर्ड वर्ग होता, ज्यामध्ये INS ब्रह्मपुत्रा, INS बियास आणि INS बेतवा यांचा समावेश होता. निलगिरी वर्गात INS निलगिरी, INS हिमगिरी, INS उदयगिरी, INS दुनागिरी, INS विंध्यगिरी आणि INS तारागिरी यांचा समावेश होता.
वर्गातील पहिल्या युद्धनौकेस किंवा पहिल्या पाणबुडीस त्या वर्गाचे भारतीय नाव मिळते. किंवा पहिल्या युद्धनौका वा पाणबुडीच्या नावाने तो वर्ग ओळखला जातो, असेही म्हणता येते.
INS कृष्णा लिएंडर वर्गाशी संबंधित आहे, त्याच्या मागे INS गोदावरी आणि INS गंगा वर्गातील होत्या.
विद्यमान भारतीय नौदलात सक्रिय फ्रिगेट्समध्ये चार वर्ग आहेत:
शिवालिक वर्ग: (INS शिवालिक, INS सातपुडा आणि INS सह्याद्री), तलवार वर्ग : (INS तलवार, INS त्रिशूल, INS तबर, INS तेग, INS तरकश आणि INS त्रिकंड), ब्रह्मपुत्रा वर्ग : ( INS ब्रह्मपुत्रा, INS बेतवा आणि INS बियास), गोदावरी वर्ग: (INS गोमती).
यापैकी शिवालिक आणि तलवार वर्ग हे स्टेल्थ गाईडेड मिसाईल फ्रिगेट्सचे आहेत, तर ब्रह्मपुत्रा आणि गोदावरी या गाइडेड मिसाईल फ्रिगेट्स आहेत.
कॉर्वेट्स (Corvettes)
कॉर्वेट्सला वैयक्तिक शस्त्रांचे (personal arms) नाव दिले जाते. स्वातंत्र्यानंतर लगेचच, भारतीय नौदलाने रॉयल नेव्हीमधून बाथर्स्ट क्लासचा समावेश केला. या कार्वेट्समध्ये एचएमआयएस पंजाब, एचएमआयएस बॉम्बे, एचएमआयएस बंगाल आणि एचएमआयएस मद्रास यांचा समावेश होता. त्यानंतर फ्लॉवर क्लास आला आणि त्यानंतर अर्नाळा क्लास, हा स्वतंत्र भारताने सुरू केलेला कार्वेट्सचा पहिला संच होता. या वर्गात INS अर्नाळा, INS अंदोर्थ (Andorth), INS अन्दीप (Andadip), INS अंदमान, INS अमिनी (Amini), INS कामोर्ता, INS कदममत (Kadmatt), INS किल्तान (Kiltan), INS कचाल (Katchall), INS अमिनदिवी (Amindivi) यांचा समावेश होता. दुर्ग आणि वीर वर्ग हा ताफ्यात अर्नाळा वर्गाच्या नंतर सेवेत आला. दुर्ग वर्गात INS दोसदुर्ग, INS विजयदुर्ग, INS सिंधुदुर्ग, तर वीर वर्गात INS प्रहार, INS वीर आणि INS निपत यांचा समावेश होता.
सुरुंगशोधक ट्रॉलर्स
भारतीय नौदलाला रॉयल नेव्हीकडून पाणबुडीविरोधी सुरुंगशोधक ट्रॉलरचा वारसा मिळाला आहे. बॅसेट वर्गाशी संबंधित, या ट्रॉलर्सना नंतर भारतीय शहरांच्या आधारे नावे देण्यात आली. बॅसेट वर्गातील काही ट्रॉलर्स एचएमआयएस आग्रा, एचएमआयएस अहमदाबाद, एचएमआयएस अमृतसर, एचएमआयएस कटक, एचएमआयएस लखनऊ इत्यादी नावांनी प्रसिद्ध आहेत.
सुरूंगशोधक आणि नाशक युद्धनौका (Minesweepers)
भारतीय नौदलाच्या माइनस्वीपर्सची नावे भारतीय प्रदेश किंवा राज्यांच्या नावावर आहेत. भारतीय नौदलाला रॉयल इंडियन नेव्हीकडून माइनस्वीपर्सच्या बांगोर वर्गाचा वारसा मिळाला. बांगोर वर्गात एचएमआयएस ओरिसा, एचएमआयएस खैबर, एचएमआयएस कर्नाटक, एचएमआयएस कुमाऊँ इत्यादींचा समावेश होत होता. स्वातंत्र्यानंतरच्या माइनस्वीपर्सचा पहिला संच पॉंडिचेरी वर्गाती होता, ज्यात INS पोरबंदर, INS बेदी, INS भावनगर, INS रत्नागिरी, INS कुड्डालोर आणि INS कोकण इत्यादींचा समावेश झाला. किनारी भागातील माईन स्वीपर मध्ये टन आणि माहे वर्ग समाविष्ट होते. टन वर्गात आयएनएस कुड्डालोर, आयएनएस कॅन्नोर, आयएनएस कारवार आणि आयएनएस काकीनाडा यांचा समावेश होता, तर माहेमध्ये आयएनएस मुल्की, आयएनएस मगडाला, आयएनएस मालवण, आयएनएस माहे इत्यादींचा समावेश होता. इनशोअर माइनस्वीपर हॅम वर्गातून आले होते आणि त्यात आयएनएस बेसिन आणि आयएनएस बिमलीपाटन यांचा समावेश होता.
आणखी वाचा: Jain Pilgrimage Centre: दक्षिण कोकणातील प्राचीन जैन तीर्थ !
सक्रिय कार्वेट्स
भारतीय नौदलातील सक्रिय कार्वेट्स पाच वेगवेगळ्या वर्गातील आहेत. कामोर्ता वर्ग हा स्टेल्थ अँटी-सबमरीन वॉरफेअर कॉर्व्हेटचा आहे आणि त्यात INS कामोर्ता, INS कदममत आणि INS किल्तान यांचा समावेश आहे. इतर चार वर्ग म्हणजे कोरा वर्ग (INS कोरा, INS किर्च, INS कुलिश, आणि INS करमुक), खुकरी वर्ग (INS खुकरी, INS कुठार, INS किरपण आणि INS खंजर), अभय वर्ग (INS अभय, INS अजय , आणि INS अक्षय), आणि वीर वर्ग (INS निशंक, INS विभूती, INS विपुल, INS विनाश, INS विद्युत, INS नाशिक, INS प्रबल, आणि INS प्रलय).
अतिवेगवान प्रहारी नौका (Fast attack ships)
जलद हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिवेगवान प्रहारी नौकांना शौर्य, विजय दर्शविणार्या शब्दांवर नाव देण्यात आले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, जलद हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्र नौकांचे विद्युत आणि चमक असे दोन वर्ग होते. विद्युत वर्गात आयएनएस वीर, आयएनएस निर्भिक, आयएनएस निपत, आयएनएस निर्घट, आयएनएस विनाश इत्यादींचा समावेश होता. चमक वर्गात आयएनएस प्रताप, आयएनएस चराग, आयएनएस प्रचंड, आयएनएस प्रबल, आयएनएस चातक इत्यादींचा समावेश होता.
उभयचर युद्धनौका (Amphibious warfare ships)
पाण्यात आणि थेट किनाऱ्यावरही येऊनही कारवाईसाठी उभयचर युद्धनौका अॅम्फिबिअस वॉरशिप्सचा वापर केला जातो. या वर्गातील युद्धनौकांना उभयचर वर्गातील प्राण्यांची नावे देण्यात आली आहेत. जुन्या उभयचर लँडिंग युद्धनौकांना पोलनोकनी वर्गातील INS घडियाल आणि INS गुलदार आणि कुंभीर वर्गातील INS घोरपड, INS केसरी, INS शार्दुल, INS शरब आणि INS महिश अशी नावे होती.
लँडिंग शिप इन्फंट्रीमध्ये शार्दुल क्लास मधील INS शार्दुल, INS केसरी आणि INS ऐरावत यांचा समावेश होता. भारताकडे सध्या ऑस्टिन श्रेणीचे INS जलाश्व ही अॅम्फिबिअस वॉरशिप आहे. शिवाय, १६ लँडिंग युद्धनौका आणि वेगवान कारवाईसाठीच्या नौकाही आहेत.
आज, भारताच्या लँडिंग नौकांमध्ये INS शार्दुल, INS केसरी आणि INS ऐरावतबरोबर नवीन शार्दुल वर्ग, INS मगर आणि INS घरियालसह मगर वर्ग आणि INS चित्ता, INS गुलदार आणि INS कुंभीरबरोबर नवीन कुंभीर वर्ग समाविष्ट आहे. INS LCU 38 आणि INS LCU 51 सारख्या नावांसह लँडिंग क्राफ्ट Mk III LCU आणि Mk IV LCU वर्गातील आहेत.
गस्तीनौका (Patrol vessels)
भारताच्या बहुउद्देशीय गस्तीनौकांना बेटांची नावे देण्यात आली आहेत, तर किनारपट्टीवरील गस्तीनौकांना भारतीय पौराणिक कथांमधून नावे देण्यात आलेली आहेत. सुरुवातीला, भारतीय नौदलाची गस्ती जहाजे त्रिंकट वर्गातून आली होती. आजच्या सक्रिय गस्तीनौका कार निकोबार वर्ग (INS कार निकोबार, INS चेतलाट, INS कोरा डोव्ह, INS Koswari इ.), बंगाराम वर्ग (INS बंगाराम, INS Bitra, INS बत्ती मालव), आणि नवीन त्रिंकट वर्ग (INS ट्रिंकट), या तीन वर्गातील आहेत.
भारताच्या खोल समुद्रातील गस्तीसाठीच्या युद्धनौकांची पहिली तुकडी रॉयल इंडियन नेव्हीकडून वारशाने मिळाली होती. या युद्धनौकांना HMIS रामदास, HMIS जामनगर, HMIS हिरावताई, HMIS प्रभावती इत्यादी नावे होती. आता, सक्रिय ऑफशोअर गस्ती युद्धनौका सरयू आणि सुकन्या वर्गातील आहेत, ज्यात INS सरयू , INS सुनयना, INS सुमेधा, INS सुमित्रा या सरयू वर्गातील, तर INS सुकन्या, INS सुभद्रा, INS सुवर्णा, INS सावित्री, INS शारदा आणि INS सुजाता या सुकन्या वर्गातील आहेत.
पाणबुड्यांचा ताफा (Submarine fleet)
भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांना भक्षक मासे किंवा महासागराशी संबंधित अमूर्त नावांवरून नावे देण्यात आली आहेत. अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीला INS अरिहंत असे नाव देण्यात आले आहे. ती अरिहंत वर्गातील आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीला आयएनएस चक्र असे नाव देण्यात आले असून आणि ती चक्र वर्गातील आहे.
पारंपारिकपणे चालणाऱ्या पाणबुड्या तीन वर्गांतून येतात: कलवरी वर्गात INS कलवरी, सिंधुघोष वर्गात INS सिंधुघोष, INS सिंधुध्वज, INS सिंधुराज इत्यादींचा समावेश होतो आणि शिशुमार वर्गात INS शिशुमार, INS शंकुश, INS शाल्की आणि INS शंकुल यांचा समावेश होतो.