PM Modi begins meditation at Vivekananda Rock Memorial : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. सातव्या टप्प्यासाठीचे मतदान शनिवारी (१ जून) पार पडणार आहे. या टप्प्यासाठीचा प्रचारही संपुष्टात आला आहे. संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यांसाठीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (३० मे) ध्यानधारणा करण्यासाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या किनार्यावरील स्वामी विवेकानंद स्मारकामध्ये तीन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. २०१९ सालीदेखील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वी पंतप्रधान मोदी केदारनाथ दर्शनाला गेले होते. त्याआधी २०१४ च्या निवडणुकीत ते प्रतापगडावर गेले होते. अद्याप निवडणूक पूर्णपणे पार पडलेली नसताना ‘मेडिटेशन’च्या नावाखाली अशाप्रकारे ‘मीडिया अटेन्शन’ मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांनी हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हणत निवडणूक आयोगामध्येही धाव घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा