PM Modi to inaugurate Hazratbal shrine development project पंतप्रधान मोदी यांनी ७ मार्च रोजी श्रीनगर दौऱ्यादरम्यान ४५ कोटींच्या हजरतबल दर्गा एकात्मिक विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्याला दिलेली ही त्यांची पहिलीच भेट होती. या प्रकल्पाचे उद्घाटन हा स्वदेश दर्शन आणि प्रशाद (पिलिग्रीमेज रीजूव्हिनेशन अॅण्ड स्प्रिरिचुअल, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह) योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पांचा एक भाग आहे. हा प्रकल्प स्थानिक जनतेला समर्पित करण्याची पंतप्रधानांची ही खेळी महत्त्वाची असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. या विकास प्रकल्पात मुख्यत्त्वे हजरतबल धार्मिक स्थळाचे नवीन प्रवेशद्वार, सभोवतालची भिंत आणि परिसराचा विकास, परिसराची रोषणाई यासह इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. हजरतबल दर्गा श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवराच्या काठावर वसलेला असून काश्मीरमधील सर्वात महत्त्वाचे इस्लामिक धार्मिक स्थळ आहे. हे स्थळ अस्सार-ए-शरीफ, दरगाह शरीफ आणि मदीनत-उस-सानी अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. या ठिकाणी प्रेषित मुहम्मद यांचे मू- ए-मुकद्दस हे पवित्र धातू आहेत. (धातू हा शब्द अध्यात्मिक उन्नत व्यक्तीच्या शारीरिक अवशेषांसाठी वापरला जातो. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, मू-ए-मुकद्दस हा प्रेषितांच्या दाढीचा केस आहे.)

अधिक वाचा: मुस्लीम समाजातील जात व्यवस्था? मुस्लिमांमधील कनिष्ठ वर्गाची स्थिती अद्याप का सुधारलेली नाही?

Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
marathi sahitya sammelan loksatta news
अन्वयार्थ : हा रमणा थांबवा!

हजरतबल दर्ग्याचा संक्षिप्त इतिहास

मुस्लीम औकाफ ट्रस्टच्या शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या देखरेखीखाली १९६८ साली दर्ग्याचे बांधकाम सुरू झाले होते, जम्मू आणि काश्मीर टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार आताची घुमट रचना असलेली पांढरी संगमरवरी इमारत १९७९ साली पूर्ण झाली. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व १७ व्या शतकापासूनचे आहे, या ठिकाणी पूर्वी इशरत महल यांचे घर आणि एक बाग होती, या वास्तूचे बांधकाम आणि बाग यांची निर्मिती १६२३ साली झाली आणि दोन्हींचे श्रेय शाहजहानचा सुभेदार सादिक खान याच्याकडे जाते. १६३४ साली शाहजहानने इशरत महलचे रूपांतर नमाज पठणाच्या जागेत करण्याचा आदेश दिला. १६९९ साली प्रेषितांचा पवित्र धातू काश्मीरमध्ये आल्यानंतर हजरतबल येथे ठेवण्यापूर्वी काही काळ तो नक्शबंद साहिबमध्ये ठेवण्यात आला होता.

खेदकारी भूतकाळ

प्रोफेसर उपेंद्र कौल यांनी ‘द प्रिन्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या पवित्र धातूंच्या संरक्षणाची जबाबदारी ख्वाजा नूर-उद-दीन ईसाई यांच्याकडे होती. त्यांची मुलगी इनायत बेगम यांनी प्रथम या मू-ए-मुकद्दसच्या संरक्षणासाठी धार्मिक वास्तूची निर्मिती केली. प्रचलित आख्यायिकेनुसार हजरतबल येथे ठेवलेला पवित्र धातू सय्यद अब्दुल्ला मदनी यांनी प्रथम काश्मीरमध्ये आणला. सय्यद अब्दुल्ला मदनी हे मदिनेहून विजापूरला (विजयपुरा) येण्यासाठी निघाले होते. सय्यद अब्दुल्ला मदनी हे पैगंबरांचे वंशज असल्याचे मानले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सय्यद हमीद याला मू-ए-मुकद्दसचा वारसा मिळाला.

यासंदर्भात प्रोफेसर कौल हे आपल्या ‘ग्रेटर काश्मीर’ या पुस्तकात लिहितात, ‘मुघलांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यावर हमीदचे सर्व कौटुंबिक वारसा हक्क तसेच संपत्ती काढून घेण्यात आली’. यामुळे हमीदला या धातूंची काळजी घेणे कठीण गेले. पवित्र धातूंची काळजी घेता न आल्याने त्यांनी तो धातू श्रीमंत काश्मिरी व्यापारी ख्वाजा नूर-उद-दीन ईसाई यांना दिला. या संदर्भात औरंगजेबाला माहिती मिळाल्यावर त्याने हा पवित्र धातू ताब्यात घेतला आणि सूफी द्रष्टा मुइन अल दीन चिश्ती यांच्या अजमेर दर्ग्यावर पाठवला. ईसाई यांच्याकडून या धातूंवर कोणत्याही प्रकारचा दावा सांगण्यात येऊ नये म्हणून मुघलांकडून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. इतकेच नाही तर आख्यायिकेनुसार औरंगजेबाला एक स्वप्न पडले, ‘ज्यात प्रेषित मुहम्मद यांनी त्याला ताबडतोब पवित्र ‘मू-ए-मुकद्दस’ काश्मीरला पाठवण्याचा आदेश दिला. यामुळे औरंगजेबाने ताबडतोब ईसाई यांची सुटका करण्याचा आणि पवित्र मू-ए-मुकद्दस त्यांच्याकडे परत देण्याचा आदेश दिला. मात्र तोपर्यंत ईसाई यांचा तुरुंगात मृत्यू झाला होता. १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात पवित्र मू-ए-मुकद्दस काश्मीरला नेण्यात आला. आणि वारसाहक्काने त्याची जवाबदारी ईसाई यांची मुलगी इनायत बेगम हिच्याकडे देण्यात आली. ती या पवित्र धातूची संरक्षक झाली. तेव्हापासून, तिचे पुरुष वंशज या पवित्र मू-ए-मुकद्दसचे काळजीवाहू झाले.

अधिक वाचा: Hikayat Seri Ram मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय?

१९६३ मू-ए-मुकद्दस चोरीला गेला

२७ डिसेंबर १९६३ रोजी पहाटे हजरतबल दर्ग्यातुन मू-ए-मुकद्दस चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर काश्मीरमध्ये एकच हाहाःकार उडाला. हजारोंच्या संख्येने लोक निषेध आणि घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले. परिस्थिती बिकट झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्य सरकारला मदत करण्यासाठी केंद्रीय नेते आणि अधिकारी नियुक्त केले. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दंगलीत अनेकांना जीव गमवावा लागला. १० दिवसांनंतर मू-ए-मुकद्दस परत आल्याची बातमी मिळताच परिस्थिती शांत झाली. १९६४ साली फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी पवित्र मू-ए-मुकद्दसच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन काश्मिरींची नावे जाहीर केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे अब्दुल रहीम बांडे, अब्दुल रशीद, कादिर बट्ट अशी होती. अब्दुल रहीम बांडे, हा याच धार्मिक स्थळाचा रखवालदार होता; अब्दुल रशीद या गावकऱ्याला मू-ए-मुकद्दस परत ठेवताना पकडण्यात आले होते; आणि कादिर बट्ट याचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा आरोप होता.

१९९३ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

१९९३ साली ऑक्टोबरमध्ये हे ठिकाण पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकले. त्या वर्षाच्या सुरुवातीला, दहशतवाद्यांच्या एका गटाने हजरतबलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे एप्रिल महिन्यात लष्कराने या जागेला वेढा घातला. याच दरम्यान लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाली. त्यांनतर लेफ्टनंट जनरल डी.डी. सकलानी (निवृत्त), तत्कालीन राज्यपालांचे सुरक्षा सल्लागार यांनी सैनिकांना अचानक मागे घेतले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या पार्श्वभूमीवर तशाच एका प्रकरणाची पुनरावृत्ती सरकारला नको होती.

अधिक वाचा: Skyquakes: स्कायक्वेक्स म्हणजे काय? भूकंप खरोखरच अवकाशात होतात का?

यांनतर १५ ऑक्टोबर रोजी काश्मीरचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक ए.के. सूरी यांना मुस्लीम औकाफ ट्रस्टच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी पवित्र धातू ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुरी यांनी राज्यपालांचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एम. ए. झाकी (निवृत्त) यांना फोन करून बीएसएफच्या दोन कंपन्यांना मशिदीला वेढा घालण्याचे आदेश दिले आणि राज्यपालांना माहिती देण्यापूर्वीच बाहेर पडण्याचे आणि प्रवेशाचे सर्व मार्ग बंद करण्याचेही आदेश देण्यात आले. मार्गच रोखले गेल्याने दहशतवाद्यांनी या मशिदीत असलेल्या नागरिकांना ओलिस ठेवले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार या दर्ग्याच्या परिसरात लष्कर दाखल झाले आणि अन्न, पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. परंतु दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या वाटाघाटींमधील अटींनुसार अन्न, पाणी आणि दूरध्वनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्याचा वापर दहशताद्यांनी परदेशी माध्यमांना द्यावयाच्या मुलाखतींसाठी करत भारताविरुद्ध अपप्रचार केला. किंबहुना स्थानिक लोकांकडूनही या ठिकाणी असलेल्या भारतीय लष्करी कारवाईचा निषेध करण्यात आला होता.

१९९६ मध्ये झालेली चकमक

१९९६ साली मार्च महिन्यात जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (JKLF) दहशतवादी हजरतबलमध्ये घुसण्यात यशस्वी झाले. वाटाघाटीनंतर, लपलेले दहशतवादी या ठिकाणाहून केवळ ५० यार्ड अंतरावर असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले. यानंतर चार दिवसांनी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी तब्बल २२ दहशतवाद्यांना ठार केले. गोळीबारात हजरतबलच्या परिसरातील दोन इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. दहशतवाद्यांना पुन्हा हजरतबला वेढा घालण्यापासून रोखण्यासाठी चकमकीचे कारण अधिकृतपणे नमूद केले गेले. दहशतवाद्यांना शस्त्रे टाकून शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले होते.

आता भारत सरकारनेच त्याच्या सुरक्षा आणि या धार्मिक स्थळाच्या पर्यटन सुविधांसाठी पुढाकार घेतल्याने हा चांगला संकेत आहे, असे मानले जाते.

Story img Loader