PM Modi to inaugurate Hazratbal shrine development project पंतप्रधान मोदी यांनी ७ मार्च रोजी श्रीनगर दौऱ्यादरम्यान ४५ कोटींच्या हजरतबल दर्गा एकात्मिक विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्याला दिलेली ही त्यांची पहिलीच भेट होती. या प्रकल्पाचे उद्घाटन हा स्वदेश दर्शन आणि प्रशाद (पिलिग्रीमेज रीजूव्हिनेशन अॅण्ड स्प्रिरिचुअल, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह) योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पांचा एक भाग आहे. हा प्रकल्प स्थानिक जनतेला समर्पित करण्याची पंतप्रधानांची ही खेळी महत्त्वाची असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. या विकास प्रकल्पात मुख्यत्त्वे हजरतबल धार्मिक स्थळाचे नवीन प्रवेशद्वार, सभोवतालची भिंत आणि परिसराचा विकास, परिसराची रोषणाई यासह इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. हजरतबल दर्गा श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवराच्या काठावर वसलेला असून काश्मीरमधील सर्वात महत्त्वाचे इस्लामिक धार्मिक स्थळ आहे. हे स्थळ अस्सार-ए-शरीफ, दरगाह शरीफ आणि मदीनत-उस-सानी अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. या ठिकाणी प्रेषित मुहम्मद यांचे मू- ए-मुकद्दस हे पवित्र धातू आहेत. (धातू हा शब्द अध्यात्मिक उन्नत व्यक्तीच्या शारीरिक अवशेषांसाठी वापरला जातो. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, मू-ए-मुकद्दस हा प्रेषितांच्या दाढीचा केस आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा