Narendra Modi Inaugrating Z Morh पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ जानेवारी) जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. २०१४ मध्ये पहिल्यांदाच सत्तेत आल्यापासून पंतप्रधानांची केंद्रशासित प्रदेशाची ही १२वी भेट असणार आहे. पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित झेड-मोढ बोगद्याचे उद्घाटन करतील. हा बोगदा सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीत खुला राहणार असल्याने याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनमर्गच्या सर्व प्रसिद्ध पर्यटन रिसॉर्टशी कनेक्टिव्हिटीसह हा बोगदा वर्षभर काश्मीर आणि लडाखला जोडण्यास मदत करील.

आज पार पडणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध आणि गस्त घालून परिसराची सुरक्षा सुनिश्चित केली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये तयारीचा आढावा घेताना लिहिले, “सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज सोनमर्गला भेट दिली. झेड-मोढ बोगद्याच्या उद्घाटनामुळे सोनमर्ग वर्षभर पर्यटनासाठी खुले होईल.” काय आहे या बोगद्याचे महत्त्व? बोगद्याच्या बांधकामासाठी किती खर्च आला? या बोगद्याचे फायदे किती? त्याविषयी जाणून घेऊ.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा, काय होऊ शकतात याचे परिणाम?

झेड-मोढ बोगद्याचे महत्त्व

झेड-मोढ बोगदा हा ६.४ किलोमीटर लांब द्वि-दिशात्मक बोगदा आहे, जो लोकप्रिय सोनमर्ग हेल्थ रिसॉर्टला काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील कंगन शहराशी जोडतो. त्याला झेड-मोढ हे नाव झेड आकाराच्या रस्त्याच्या पट्ट्यावरून देण्यात आले आहे. हा रस्ता बोगद्यापूर्वीपासून याच ठिकाणी होता. बोगद्यापूर्वी हा भाग ८,५०० फूट उंचीवर वसलेला होता. हिवाळ्यात बहुतेक भागासाठी सोनमर्ग रस्ता बंद ठेवण्यात यायचा. कारण- या रस्त्यावर हिमस्खलनाचा धोका होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने झेड-मोढ बोगद्याचे काम २०१२ मध्ये सुरू केले. त्यानंतर ‘बीआरओ’ने पायाभूत सुविधा प्रकल्पाचे बांधकाम टनलवे लिमिटेडकडे सुपूर्द केले आणि नंतर ते राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL)ने ताब्यात घेतले.

आज पार पडणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध आणि गस्त घालून परिसराची सुरक्षा सुनिश्चित केली. (छायाचित्र-पीटीआय)

१० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला हा प्रकल्प अखेरीस २,४०० कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला आहे. दोन लेन, द्वि-दिशात्मक संरचना असण्याव्यतिरिक्त, बोगद्यामध्ये एक समांतर एस्केप बोगदादेखील आहे, ज्याचा वापर आणीबाणी, तसेच रेल्वे बोगद्यासाठी केला जाऊ शकतो. बोगदा तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोगदा ताशी १,००० वाहने जास्तीत जास्त ८० किलोमीटर प्रतितास वेगाने हाताळू शकतो. तसेच, हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (NATM) वापरून तयार केला गेला आहे.

पर्यटनाला देणार चालना

झेड-मोढ बोगद्यामुळे या प्रदेशातील पर्यटन बदलण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे जम्मू– काश्मीरला महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होईल. सोनमर्ग हे पर्यटनस्थळ आहे, ज्याला ‘सोन्याचे कुरण’ म्हणूनही ओळखले जाते. या बोगद्यामुळे सोनमर्ग वर्षभर प्रवेशयोग्य असेल आणि बर्फवृष्टीदरम्यान जे व्यवसाय सामान्यपणे बंद करण्यास भाग पाडले जातात, तेही खुले राहून, व्यवसायाद्वारे महसूल मिळवू शकतील. नवीन बोगद्यामुळे गगनगीर आणि सोनमर्ग यादरम्यानचा प्रवासाचा वेळ केवळ २० ते २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. पंतप्रधान मोदींनी आधी म्हटल्याप्रमाणे, “झेड-मोढ बोगदा सोनमर्गला वर्षभराच्या पर्यटनस्थळात बदलेल. हिवाळी पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करील.”

हॉटेल व्यावसायिक, व्यापारी आणि इतर लोक बोगद्याच्या संभाव्यतेबद्दल आशावादी आहेत की, ते प्रदेशात अधिक पर्यटनाला चालना देतील. त्यामुळे साहसी खेळ आणि हिवाळी पर्यटनासाठी नवीन मार्ग खुले होतील, अशी आशाही त्यांना आहे. झेड-मोढ बोगद्यामुळे काश्मीर आणि लडाखमधील व्यापार व वाहतूक सुधारेल. बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि रस्ता सुरक्षा सुधारेल. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होईल. त्याशिवाय वर्षभर या प्रदेशात अधिक गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना मिळेल आणि रहिवाशांचे जीवनमान सुधारेल.

झेड-मोढ बोगद्याचे धोरणात्मक महत्त्व

वर्षभर कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आणि व्यापार व पर्यटनाला चालना देण्याव्यतिरिक्त झेड-मोढ बोगदा भारताला एक धोरणात्मक महत्त्व प्रदान करेल. झोजिला बोगदा प्रकल्पाचा एक भाग असणारा झेड-मोढ बोगदा सोनमर्गला उर्वरित काश्मीरशी जोडेल. झोजिला बोगदा २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा बोगदा सोनमर्ग ते लडाखमधील द्रासला जोडेल. याचा अर्थ असा आहे की, दोन्ही बोगदे कारगिल आणि लेहसह लडाखच्या मोक्याच्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवेश प्रदान करतील.

लडाख पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर असल्याने हे महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशांचे भारताशी तणावपूर्ण संबंध सामायिक करतात. बोगद्यामुळे भारताचे कर्मचारी, तसेच उपकरणे पुढे जाण्यासाठी हवाई वाहतुकीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. आतापर्यंत भारतीय सैन्याला आपला पुरवठा फॉरवर्ड पोस्टवर नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवाई वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत असे. परंतु, या बोगद्यामुळे हे अवलंबित्व कमी होईल. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालानुसार, यामुळे लष्करी विमानांचा भार कमी होईल. लष्करी विमाने सध्या लडाखच्या दुर्गम ठिकाणी वर्षभर पुरवठा मोहिमेचा भार सहन करतात.

हेही वाचा : वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?

जम्मू-काश्मीरमध्ये बोगद्याचे जाळे

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारा झेड-मोढ बोगदा हा प्रदेशात बांधल्या जाणाऱ्या ३१ बोगद्यांच्या नेटवर्कचा एक भाग आहे. २,६८० कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीवर जम्मू-काश्मीरमध्ये २० आणि लडाखमध्ये ११ बोगदे बांधले जात आहेत.

Story img Loader