२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोचीन शिपयार्ड लिमिटेड निर्मित भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतचं उद्घाटन होणार आहे. यादिवशी पंतप्रधान मोदी कोची येथे भारतीय नौदलाच्या नवीन नौदल चिन्हाचं (ध्वज) अनावरणही करणार आहेत. नौदलाचा नवीन झेंडा नेमका कसा आहे? यामध्ये आतापर्यंत कोणते बदल होत गेले? जुन्या ध्वजात सेंट जॉर्ज क्रॉस का होता? याचं विश्लेषण करणारा हा लेख. चला तर मग जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय नौदलाचा सध्याच्या झेंडा पांढऱ्या रंगाचा असून त्यावर उभ्या आणि आडव्या दोन लाल रंगाच्या रेषा आहेत, ज्याला आपण सेंट जॉर्ज क्रॉस चिन्ह म्हणतो. या झेंड्याच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात तिरंगा आहे. नौदलाचा हा झेंडा आता बदलला जाणार आहे. २ सप्टेंबर रोजी कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन झेंड्याचं अनावरण केलं जाणार आहे.
ब्रिटीश काळात भारतीय नौदलाचा झेंडा पांढऱ्या बॅकग्राउंडवर लाल जॉर्ज क्रॉस आणि झेंड्याच्या वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात युनायटेड किंगडमचा युनियन जॅक होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ब्रिटीश वसाहतीचा हा झेंडा कायम ठेवला. त्यामध्ये कोणताही बदल केला नाही. पण २६ जानेवारी १९५० रोजी संबंधित झेंड्याचं पहिल्यांदा भारतीयीकरण करण्यात आलं. या ध्वजात युनियन जॅकऐवजी तिरंगा लावण्यात आला. तर सेंट जॉर्ज क्रॉस चिन्ह कायम ठेवण्यात आलं. भारतीय नौदलाचा नवीन झेंडा कसा असणार आहे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
नौदलाचा झेंडा बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे का?
२००१ मध्ये नौदलाच्या ध्वजात बदल करण्यात आला होता. संबंधित झेंड्यातून जॉर्ज क्रॉस काढून टाकण्यात आलं होतं. त्याऐवजी झेंड्याच्या खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात नेव्हल क्रेस्ट चिन्ह बदलण्यात आलं होतं. तर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात तिरंगा कायम ठेवण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून झेंड्यात बदल करण्याची मागणी केली जात होती. व्हाईस अॅडमिरल व्हीईसी बारबोझा यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती. त्यानंतर हा बदल करण्यात आला होता.
२००४ मध्ये हा ध्वज पुन्हा रेड जॉर्ज क्रॉसमध्ये बदलण्यात आला. कारण नेव्ही क्रेस्टचा निळा रंग आकाश आणि समुद्रातील पाण्यात विलीन होतो, अशा तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे या ध्वजात बदल करण्यात आला. पण हा ध्वज पूर्वीप्रमाणे नव्हता. या झेंड्यात लाल जॉर्ज क्रॉसमध्ये मध्यभागी अशोक स्तंभातील चार सिंहाची राजमुद्रा घेण्यात आली. २०१४ साली पुन्हा यामध्ये बदल करण्यात आला आणि राजमुद्रेखाली देवनागरी लिपीत ‘सत्यमेव जयते’ हा शब्द लिहिण्यात आला. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन झेंड्याचं अनावरण केलं जाणार आहे.
सेंट जॉर्ज क्रॉस काय आहे?
पांढऱ्या बॅकग्राउंडवर लाल रंगाच्या क्रॉस चिन्हाला सेंट जॉर्ज क्रॉस म्हणून ओळखलं जातं. एका ख्रिश्चन योद्धा संताच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे. हा संत तिसऱ्या धर्मयुद्धादरम्यान पराक्रमी योद्धा होता, असं मानलं जातं. हा क्रॉस इंग्लंडचा ध्वज म्हणूनही ओळखला जातो. भूमध्य समुद्रात प्रवेश करणारी इंग्रजी जहाजे ओळखण्यासाठी हा ध्वज इंग्लंड आणि लंडन शहराने ११९० साली स्वीकारला होता. रॉयल नेव्हीदेखील त्यांच्या जहाजांवर जॉर्ज क्रॉस लावले. त्यानंतर १७०७ साली ब्रिटीशांनी हाच झेंडा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला.
‘या’ देशांनी जॉर्ज क्रॉस बदलला…
खरं तर, बहुतेक कॉमनवेल्थ देशांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेळी रेड जॉर्ज क्रॉस झेंडा कायम ठेवला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी नौदलाच्या झेंड्यातून जॉर्ज क्रॉस काढलं. त्याऐवजी आपल्या नौदलाच्या चिन्हांवरून नवीन ध्वज स्वीकारला. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा हे प्रमुख देश आहेत. रॉयल कॅनेडियन नौदलाने २०१३ मध्ये एक नवीन झेंड्याचा स्वीकार केला. त्यांच्या झेंड्यात वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात कॅनडाचा ध्वज आणि पांढर्या बँकग्राऊंडवर कॅनेडियन नेव्हल क्रेस्ट आहे.
ऑस्ट्रेलियन नौदलाने १९६७ साली आपल्या नौदलाचं चिन्ह बदललं. त्यांनी नौदलाच्या झेंड्यात युनियन जॅक आणि सहा निळ्या रंगाचे तारे (स्टार) समाविष्ट केले. न्यूझीलंडच्या नौदलानेही १९६८ मध्ये जॉर्ज क्रॉस काढून टाकला. त्याऐवजी पांढऱ्या बॅकग्राउंडवर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक आणि चार लाल तारे असलेला ध्वज स्वीकारला. दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाच्या झेंड्यावर रेड जॉर्ज क्रॉसऐवजी हिरवा क्रॉस आहे. तर पाकिस्तानच्या नौदलाच्या चिन्हावर केवळ नौदल क्रेस्ट आहे. बांगलादेश नौदलाचा झेंडा पांढऱ्या रंगाचा असून त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात बांगलादेशच्या राष्ट्रध्वज ध्वज आहे.