PoK Demand Complete Merger with India पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांकडून भारतात विलिनीकरणाची मागणी होत आहे. प्रचंड महागाई, वाढता कर, वीज टंचाई या समस्यांच्या पार्श्वभूमीवर भारतात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाकव्याप्त काश्मीरमधील शेकडो आंदोलक शनिवारी रस्त्यावर उतरले होते. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये शनिवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे दैनंदिन व्यवहार आणि व्यवसाय ठप्प झाले. सामहनी, सेहंसा, मीरपूर, रावळकोट, खुइरात्ता, तत्तापानी आणि हट्टियाँ बाला यासह अनेक भागांमध्ये संप पुकारण्यात आला. पाकिस्तानी रेंजर्स आणि स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी हवेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांवर गोळीबारही करण्यात आला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर पाकिस्तानी ‘दैनिक डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलन रोखण्यासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एका उपनिरीक्षकाचा इस्लामगढ शहरात छातीत गोळी लागल्याने मृत्यू झाला त्यामुळे या भागात तणावग्रस्त परिस्थिती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा