नववर्षाच्या पहिल्याच १० दिवसांमध्ये मुंबईतून ८१ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. गेल्या तीन वर्षांमध्ये मुंबईतून सुमारे ९०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या चार आरोपींनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. हे चारही बांगलादेशी घुसखोर भारतीय पारपत्रावर परदेशात नोकरीसाठीही गेले होते. सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटप पत्रिका मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात अनेकदा खेटे घालावे लागतात. दाखले बनवण्यासाठी महिनोंमहिने फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्यांना एवढ्या सहज शासकीय कागदपत्रे कशी मिळवली, यासंदर्भात घेतलेला आढावा…

मुंबई आणि परिसरात बांगलादेशी घुसखोर किती?

मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे. त्याचबरोबर मुंबईलगत असलेल्या ठाणे, पालघर व नवी मुंबईतही मोठ्या बांगलादेशी घुसखोर राहात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) राज्यातील सर्वच पोलीस यंत्रणांनी घुसखोरांविरोधात विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय पोलीस ठाण्यांच्या पातळीवरही दहशतवाद विरोधी कक्षाला (एटीसी) बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Dhananjay Deshmukh On Beed Case
Dhananjay Deshmukh : वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही वारंवार सांगतोय…”
industries minister uday samant proposed bhaskar jadhav to join shinde shiv sena
भास्कर जाधव यांना शिंदे गटाचा थेट प्रस्ताव; रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा >>> तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?

किती बांगलादेशी घुसखोरांना अटक?

गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून ३०४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२३ मध्ये ३७६ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. या कारवायांदरम्यान, बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळले. गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी सुमारे ९०३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे केवळ २२२ बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवता आले. यावर्षी पहिल्या १० दिवसांतच मुंबई पोलिसांनी ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून याप्रकरणी ५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या नागरिकांमध्ये ६२ पुरुष आणि १९ महिलांचा समावेश आहे.

कागदपत्रे कशी बनवली?

सर्वसामान्य भारतीय नागरिकांकडे जेवढी शासकीय प्रमाणपत्रे नाहीत, त्याहून अधिक कागदपत्रे आरोपींनी तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी पारपत्रासह लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केल्याचेही उघड झाले आहे. बांगलादेशी नागरिकांनी आपण भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी, तसेच परदेशात नोकऱ्या मिळवण्यासाठी भारतीय पारपत्र मिळविल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?

पनवेलमधून काही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी सहा ते सात हजार रुपयांमध्ये शिधावाटप पत्रिका मिळवण्याचे कबूल केले. त्याच्या आधारे पुढे चालकपरवाना, ग्रामपंचायतीकडून स्थानिक वास्तव्याचा दाखला, तहसीलकडून जन्माचा दाखला, अधिवासाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळवला होता. त्यांनी ही सर्व कामे दलालांमार्फत केली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी सरकारी दाखले मिळवले होते. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बांगलादेशी नागरिक अक्रम नूर नवी शेख (२६) याला अटक केली होती. तो मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी होता. अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात राहत होता. तो स्वतःही बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. इथे आल्यानंतर अक्रमने त्याचा साथीदार शफीक याच्या मदतीने बांगलादेशातील नागरिकांना बेकायदेशीररित्या भारतात आणण्यास सुरुवात केली. भारतात प्रवेश देऊन मुंबई परिसरात कामधंदा मिळवून देण्याचे काम अक्रम करीत होता. त्यासाठी तो प्रति व्यक्ती २० हजार रुपये घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तसेच अक्रम कमिशन घेऊन बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात पाठवण्याचेही कामही करीत होता. तो शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीमार्फत अक्रमशी संपर्क साधण्यात आला. तो शिवडी येथे आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

आर्थिक कोंडी करण्यासाठी कोणती कारवाई?

बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या बँक खात्यातून बेकायदा व्यवहारही झाल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय अनेक बांगलादेशी भारतात स्थिरस्थावर झाल्यानंतर इतर बांगलादेशी घुसखोरांना येथे स्थायिक करण्यासाठी बेकायदेशीर कामे करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत करणाऱ्या संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएसने सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत संशयित बांगलादेशी नागरिकांची बँक खाती बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय शिधावाटप पत्रिका, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परिवहन विभागाशी संपर्क साधून अशा संशयितांचे चालक परवानेही रद्द करण्यात येत आहेत.

Story img Loader