पाकिस्तानमध्ये पोलिओचा प्रसार पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या महिन्यात एक दशलक्षाहून अधिक मुलांनी पोलिओचे लसीकरण करणे टाळले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य केंद्रांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या हिंसाचारामुळे देश पोलिओमुक्त करण्याच्या अनेक वर्षांचे प्रयत्न विफल होत असल्याचे चित्र सध्या पाकिस्तानात आहे. नॅशनल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर फॉर पोलिओ निर्मूलन केंद्रातील अन्वारुल हक यांच्या मते, जानेवारीपासून पाकिस्तानमध्ये पोलिओच्या ३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या सहा प्रकरणांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये वाइल्ड पोलिओव्हायरस टाइप १ (WPV1) ची तीन प्रकरणे आढळून आली आहेत, तर त्यात सिंधमधील दोन आणि खैबर पख्तूनख्वामधील एकाचा समावेश आहे.

पोलिओ हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, ज्यामुळे लहान मुलांमध्ये अर्धांगवायू होतो. अनेक दशकांच्या लसीकरण मोहिमेनंतर जगभरातून पोलिओचे निर्मूलन झाले आहे. परंतु, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे शेवटचे देश आहेत जेथे पोलिओचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. पोलिओवर कोणताही इलाज नाही. पोलिओ निर्मूलनासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या फोकल पर्सन आयशा रझा फारूक म्हणाल्या, “सध्याची स्थिती सर्व पालक आणि समुदायांसाठी एक वेक अप कॉल आहे.” परंतु, पाकिस्तानमध्ये पोलिओची रुग्णसंख्या वाढण्याची कारणं काय? आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले का केले जात आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

Four people from Dombivli arrested, Kalyan girl selling,
कल्याणमध्ये दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करणाऱ्या डोंबिवलीतील चार जणांना अटक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
shahbaz sharif government approves bill to extend army chief service tenure in pakistan
विश्लेषण : पाकिस्तानात शरीफ सरकारचा आत्मघातकी निर्णय… लष्करप्रमुखांचा कार्यकाळ दहा वर्षे… भारताची डोकेदुखी वाढणार?
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
पोलिओ हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, ज्यामुळे लहान मुलांमध्ये अर्धांगवायू होतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : मुंबईत तैवानचं आर्थिक केंद्र; चीनने दर्शवला विरोध, काय आहेत कारणं?

पाकिस्तानमध्ये लसीकरण मोहीम

२८ ऑक्टोबरपासून पाकिस्तानातील किमान ३२ दशलक्ष बालकांचे लसीकरण करण्यासाठी नवीन देशव्यापी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. “या मोहिमांचा संपूर्ण उद्देश पाकिस्तानला पोलिओमुक्त करण्याचे लक्ष्य साध्य करणे आहे,” असे अन्वारुल हक म्हणाले. मात्र, आता प्रभावित क्षेत्राबाहेरदेखील पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने पाकिस्तानी अधिकारी चिंतेत आहेत. यापूर्वी, बहुतेक प्रकरणे अफगाणिस्तान सीमेजवळील भागात आढळून येत होती. त्या भागात सप्टेंबरमध्ये तालिबान सरकारने अचानक लसीकरण मोहीम थांबवली होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोनच देश आहेत, जिथे पोलिओचा प्रसार अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. तालिबानच्या या निर्णयाचे परिणाम अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या प्रवासामुळे वाढण्याची भीती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना वाटत आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने या वर्षी अफगाणिस्तानमध्ये १८ पोलिओ प्रकरणांची नोंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये जूनमध्ये प्रथमच घरोघरी लसीकरण धोरण पुन्हा सुरू करण्यात आले होते. डब्ल्यूएचओने सांगितले की, या धोरणामुळे पाच वर्षांत सर्वाधिक लक्ष्यित मुलांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आता पाकिस्तानी आरोग्य अधिकारी सीमेच्या दोन्ही बाजूंना समन्वित पोलिओ लसीकरण मोहिमेची मागणी करत आहेत.

२८ ऑक्टोबरपासून पाकिस्तानातील किमान ३२ दशलक्ष बालकांचे लसीकरण करण्यासाठी नवीन देशव्यापी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

लसीकरण शिबिरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

पाकिस्तानमध्ये वारंवार पोलिओ लसीकरण मोहिमा राबवल्या जातात, परंतु वारंवार होणार्‍या अतिरेकी हल्ल्यांमुळे या मोहिमांमध्ये फार पूर्वीपासून अडथळे येत आहेत. लसी मुस्लीम मुलांची नसबंदी करण्याच्या पाश्चात्य कटाचा भाग असल्याचा खोटा दावा करत, अनेक दशकांपासून, अतिरेक्यांनी या मोहिमांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी २०११ च्या ऑपरेशनदरम्यान अबोटाबादमध्ये बनावट लसीकरण कार्यक्रमाचा वापर केल्याच्या आरोपांमुळे लसीकरण मोहिमेबद्दल भीती निर्माण झाली आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.

धार्मिक श्रद्धा आणि पोलिओमुळे होणाऱ्या जोखमींबद्दल जागरूकता नसल्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या प्रयत्नांत आणखी अडथळे निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पसरणे थांबवण्यासाठी, मुलांचे लसीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही अफवा आणि खोट्या दाव्यांमुळे पाकिस्तानात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात या वर्षात पोलिओ कर्मचाऱ्यांवर २७ हल्ले झाले आहेत, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. कट्टर धर्मगुरू आणि अतिरेक्यांनी या प्रतिकाराला खतपाणी घातले आहे; ज्यामुळे अनेक समुदाय लसीकरण टाळत आहेत.

सप्टेंबरमध्ये सशस्त्र अतिरेक्यांनी बन्नूमध्ये पोलिओ लसीकरण शिबिराचे रक्षण करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली, ज्यामुळे अनेक निदर्शने झाली. त्याच महिन्यात बाजौरमध्ये एक पोलिस अधिकारी आणि एका पोलिओ कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बलुचिस्तानमधील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रतिनिधी आफताब काकर यांनी सांगितले की निषेध, सुरक्षा समस्या आणि समुदायांच्या बहिष्कारामुळे लसीकरण मोहिमेमध्ये व्यत्यय येत आहे.

हेही वाचा : मिठी मारा; पण तीन मिनिटंच…. ‘या’ विमानतळानं लागू केला अजब नियम, प्रवाशांनी व्यक्त केला रोष

ही परिस्थिती नियंत्रणात कशी येईल?

पोलिओच्या प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ झाली असूनही पाकिस्तानी अधिकार्‍यांना आशा आहे की, ते विषाणूचा प्रसार रोखू शकतील. देश २८ ऑक्टोबर रोजी नवीन देशव्यापी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करेल. पाकिस्तानच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे, “पोलिओ निर्मूलन पाकिस्तानचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या एकत्रित योजनेचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत पोलिओचे संक्रमण थांबवण्याचे आहे.”