उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होईल. लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्यात. त्यामुळे या निवडणुकीकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही या निवडणुकीत पुन्हा भाजपला धक्का देण्याची तयारी चालवलीय. बहुजन समाज पक्षाने पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेत आश्चर्याचा धक्का दिला. सर्वसाधारपणे बसप पोटनिवडणुकीत भाग घेत नाही.

तिरंगी सामना

एकूण दहा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये करहल (मैनपुरी), खेर (अलिगढ), कुर्डकी (मोरादाबाद), कटहरी (आंबेडकरनगर), फुलपूर (प्रयागराज), गाझियाबाद (गाझियाबाद), मजवन (मिर्झापूर), मिरापूर (मुज्जफरपूर), मिल्कीपूर (अयोध्या) आणि सिसामू (कानपूर) या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील पाच जागा सध्या समाजवादी पक्षाकडे आहेत, तर भाजपकडे तीन व त्यांचे मित्रपक्ष असलेल्या निशाद पक्ष आणि राष्ट्रीय लोकदलाकडे प्रत्येकी एक जागा आहे. थोडक्यात दोघांकडे प्रत्येकी पाच जागा आहेत. यातील ९ जण लोकसभेवर विजयी झाले, तर समाजवादी पक्षाच्या एका आमदाराला खटल्यात सात वर्षे शिक्षा झाल्याने ही जागा रिक्त आहे.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
issue of traffic congestion was lost from election campaign of Thane district
ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…

हेही वाचा >>>Raksha Bandhan 2024:राखीच्या परंपरेमागची ऐतिहासिक कथा; किती सत्य, किती असत्य?

भाजपकडून खबरदारी

लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये राज्यात भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. यंदा हे संख्याबळ थेट ३३ वर घसरले. यातून पक्षांतर्गत आरोपांची मालिका रंगली. पोटनिवडणुकीत पुन्हा पराभवाचा धक्का बसल्यास देशभर संदेश जाईल याची धास्ती आहे. त्यामुळेच दहा मतदारसंघांसाठी भाजपने ३० हून अधिक मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. याखेरीज १५ ज्येष्ठ नेते या मतदारसंघात तैनात केले जाईल. मंत्र्यांना हा मतदारसंघात वास्तव्य करण्याचे आदेश भाजपने दिले आहेत. जनतेच्या समस्या ऐकून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार करण्यास बजावण्यात आले आहे. थोडक्यात प्रत्येक मतदारसंघात उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले. पक्ष सर्व १० जागा जिंकेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंह चौधरी यांनी व्यक्त केला.

‘इंडिया’चा निर्धार

इंडिया आघाडीतून समाजवादी व काँग्रेस यांची आघाडी पुन्हा भाजपप्रणीत आघाडीला टक्कर देईल. समाजवादी पक्षाने सहा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची घोषणा केली आहे. विशेषत: अयोध्येतील मिल्कीपूरच्या जागेकडे अधिक लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत अयोध्येची प्रतिष्ठेची जागा भाजपला गमवावी लागली. आता समाजवादी पक्षाने मिल्कीपूर मतदारसंघाची जबाबदारी अवधेश प्रसाद यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या मदतीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते लालबिहारी यादव येथे प्रचाराची धुरा सांभाळतील. थोडक्यात समाजवादी पक्षानेही एकेका मतदारसंघात दोन-तीन प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देत भाजपपुढे आव्हान निर्माण केले आहे. रस्ते किंवा अन्य प्रकल्पांच्या कामांमुळे उत्तर प्रदेशात काही घरे तसेच व्यापारी आस्थापने पाडण्यात आली. जरी नुकसानभरपाई मिळाली असली, तरी सरकारबद्दल रोष होता. लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याची चर्चा आहे. सध्या नझूल जमिनीच्या मुद्द्यावरूनही चर्चा झाली. हे विधेयक तूर्तास विधिमंडळाच्या समितीकडे चर्चेला पाठविण्यात आले आहे. मात्र प्रचारात विरोधक हे मुद्दे उपस्थित करणार हे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>>भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली होती? यंदा या विषाणूचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?

बसपच्या धोरणात बदल

बहुजन समाज पक्ष (बसप) पोटनिवडणूक लढवत नाही. त्यांचे पूर्वीपासूनचे हे धोरण आहे. मात्र पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सर्व दहाही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यांचे भाचे आकाश आनंद यांना पक्षाचे समन्वयक म्हणून पुन्हा जबाबदारी सोपवली. आता प्रचाराचे नेतृत्व तेच करतील असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत बसपला धक्का बसला. त्यांना एकही जागा मिळाली तर नाहीच, मात्र मतांची टक्केवारीही जेमतेम ९.३९ म्हणजे दहा टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली. पक्षाने मोठ्या प्रमाणात मुस्लीम उमेदवार देऊनही फारसा लाभ झाला नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत पक्षाला कितपत यश मिळते यावर कार्यकर्त्यांचे पुढील निवडणुकीसाठी मनोधैर्य अवलंबून असेल. प्रमुख दोन आघाड्यांच्या संघर्षात बसपची मते कमी होत असल्याचे २०२२ ची राज्यातील विधानसभा आता २०२४ मधील लोकसभा निकालावरून दिसून आले.

सरकारची प्रतिष्ठा

उत्तर प्रदेशातील सत्ता भाजपच्या देशव्यापी यशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळेच या दहा जागांची निवडणूक पक्ष तसेच सरकारने प्रतिष्ठेची केली आहे. यश मिळाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास येईल. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. आता पोटनिवडणुकीत लोकसभा निकालांचे उट्टे काढण्याची संधी भाजपला आहे. चांगल्या कामगिरीचा त्यांच्यावर दबाव आहे. अर्थात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षानेही रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भाजप या पोटनिवडणुकीत एकही जागा जिंकणार नाही असा दावा अखिलेश यांनी केला आहे. एरवी पोटनिवडणुकीची फारशी चर्चा होत नाही, पण उत्तर प्रदेशातील या दहा जागा त्याला अपवाद आहेत. आगामी काळासाठी राजकीय संदेश म्हणा किंवा दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून या निकालांकडे पाहिले जाईल.

hrishikesh.deshpande@expressindia.com