Revolutionary Marxist Party leader Murder Case केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात २०१२ मध्ये राजकीय वैमनस्यातुन रिवोल्यूशनरी मार्क्सवादी पार्टीच्या नेत्याची निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने केरळसह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. केरळ उच्च न्यायालयाने याच प्रकरणार सोमवारी (१९ फेब्रुवारी) सीपीआय(एम)च्या तीन नेत्यांसह १० जणांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाने आरोपींना ट्रायल कोर्टाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. यासह ट्रायल कोर्टाने ज्या दोघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश उच्च न्यायालयाने रद्द करून दोघांनाही या हत्या प्रकरणात दोषी करार दिला. टी. पी. चंद्रशेखरन हत्या प्रकरण काय होते? या काळाला राजकारणातील रक्तरंजित काळ का म्हणतात? जाणून घेऊ.

४ मे २०१२ रोजी काय घडले?

कोझिकोड जिल्ह्यातील वल्लीकडकडे जात असताना चंद्रशेखरन यांच्या दुचाकीला एसयूव्हीने धडक दिली. चंद्रशेखरन जमिनीवर पडताच हल्लेखोरांच्या टोळीने वाहनातून उडी मारली आणि त्यांची हत्या केली. चंद्रशेखरन यांच्या शरीरावर ५१ खोल जखमा होत्या. दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि चंद्रशेखरन यांच्या मदतीला येणार्‍या लोकांना रोखण्यासाठी मारेकऱ्यांनी पळून जाण्यापूर्वी घटनास्थळावर बॉम्बस्फोट केले. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी एसयूव्हीवर ‘माशा अल्लाह’ असे स्टीकर चिकटवले होते.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

टी. पी. चंद्रशेखरन कोण होते?

टी. पी. चंद्रशेखरन कोझिकोडमधील वाटकाराजवळील ओन्चियम येथील रिवोल्यूशनरी मार्क्सवादी पार्टी (आरएमपी)चे प्रमुख नेते होते. त्यांचे वय ५१ होते. चंद्रशेखरन पूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) सीपीएममध्ये होते. परंतु, २००८-०९ मध्ये एरमला पंचायतीचे अध्यक्षपद जनता दल (एस)ला दिल्याने त्यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारलं. पक्षाच्या जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेतृत्वात सुरू असलेल्या संघर्षामुळे चंद्रशेखरन शेकडो सीपीएम कार्यकर्त्यांसह पक्षाबाहेर पडले. यानंतर चंद्रशेखरन यांनी आरएमपीची स्थापना केली, ज्यामुळे सीपीएमला राग आला; कारण निवडणुकीच्या काळात याचा थेट प्रभाव सीपीएमवर होणार होता.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखरन यांनी वडकारा (वाटकारा) जागेवरून निवडणूक लढवली. १९९६ पासून सीपीएमने ही जागा सतत जिंकली होती. ही जागा सीपीएमसाठी सुरक्षित जागांपैकी एक मानली जात होती. या जागेवर काँग्रेसचे मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी सीपीएमच्या पी. सतीदेवी यांचा ५६,००० हून अधिक मतांनी पराभव करून निवडणूक जिंकली. भाजपाच्या उमेदवाराला ४०,००० हून अधिक मते मिळाली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या चंद्रशेखरन यांना जवळपास २२,००० मते मिळाली. या निवडणुकीत चंद्रशेखरन यांनी निवडणूक लढवणे सीपीएमच्या पराभवाचे कारण मानले जात होते. याचिकाकर्त्यांनी आरोप केला की, कोझिकोड आणि कन्नूरमधील स्थानिक सीपीएम नेत्यांनी चंद्रशेखरन विरोधात कट रचला. चंद्रशेखरन यांना संपवण्यासाठी अनेक हत्यांचे गुन्हे दाखल असलेल्या मारेकऱ्यांना त्यांनी कामावर ठेवले.

प्रकरणाचा तपास कसा पुढे गेला?

या हत्येने केरळमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांच्या यावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. ओमन चंडी यांच्या काँग्रेस नेतृत्वातील सरकारमध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री थिरुवंचूर राधाकृष्णन यांनी हत्येचा कट रचणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळवून देण्याची आणि चंद्रशेखरन यांना न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली. संशयित आरोपींच्या अटकेवरून असे उघड झाले की, स्थानिक सीपीएम नेत्यांनी चंद्रशेखरन यांच्या हत्येसाठी सात सदस्यीय मारेकरी टोळीला सुपारी दिली होती. या सर्व लोकांना एकामागून एक पकडण्यात यश आले. मारेकर्‍यांच्या अटकेनंतर हे सिद्ध झाले की, ते एकूण ७५ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील असून यातील नऊ राजकीय हत्या त्यांनी सीपीएमसाठी केल्या. २०००-२०१२ दरम्यान कन्नूर जिल्ह्यात झालेल्या राजकीय हत्यांमध्ये या मारेकर्‍यांचा थेट सहभाग असल्याचे आढळून आले.

कथित राजकीय हत्येतील तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर कोझिकोड आणि कन्नूरमधील सीपीएम नेते पी. के. कुन्हानंदन, के. सी. रामचंद्रन, सी. एच. अशोकन, के. के. कृष्णन आणि जिओथी बाबू यांना अटक करण्यात आली. कोझिकोडमध्ये सीपीएमचे विद्यमान जिल्हा सचिव पी. मोहनन यांनाही कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, परंतु ट्रायल कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

दोषी ठरलेली नेतेमंडळी कोण आहेत?

ट्रायल कोर्टाने आरोपींना दोषी ठरवले होते. त्यापैकी के. सी. रामचंद्रन, मनोजन आणि पी. के. कुन्हानंदन हे सीपीएमचे स्थानिक नेते होते. यात प्रदीपनला फक्त तीन वर्षांची शिक्षा झाली. सीपीएमचे आणखी एक नेते सी. एच. अशोकन यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. कन्नूरच्या राजकीय संघर्ष क्षेत्र असलेल्या पनूरमधील सीपीआय(एम) प्रमुख कुन्हानंदन यांचाही २०२० मध्ये तुरुंगात मृत्यू झाला. या प्रकरणातील अन्य आरोपींच्या यादीत अनुप, मनोज कुमार ऊर्फ किरमाणी मनोज, एन. के. सुनील कुमार ऊर्फ कोडी सुनी, राजेश टीके, मोहम्मद शफी, अन्नान स्जिथ, के. शिनोज आणि पी. व्ही. रफीक यांच्या नावांचा समावेश आहे. सीपीएमचे दोन स्थानिक नेते के. के. कृष्णन आणि जिओथी बाबू यांच्या निर्दोष मुक्ततेची याचिका न्यायालयाने बाजूला ठेवली. २६ फेब्रुवारीला उच्च न्यायालय यावर निर्णय देणार आहे.

दोषींना तुरुंगात विशेष सुविधा?

२०१६ मध्ये सीपीएम सत्तेत आल्यानंतर दोषींना दीर्घ पॅरोल देण्यात आले होते. ज्या तुरुंगात दोषींना ठेवण्यात आले होते, तेथे सीपीएमचे वरिष्ठ नेते दिसले. २०२० मध्ये पक्षाचे नेते कुन्हानंदन यांचे निधन झाल्यानंतर, सीपीएमने त्यांना निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. २०१७ मध्ये तत्कालीन सीपीएम आमदार ए. एन. शमसीर यांनी या प्रकरणातील दोषी असलेले मोहम्मद शफी यांच्या घरी भेट दिली. दोषींना तुरुंगात विशेष सुविधा मिळाल्याचाही आरोप आहे. सर्व दोषी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे आढळले आहे. या दोषींपैकी एक सुनील कुमार ऊर्फ कोडी सुनी, तुरुंगाच्या आतून त्याची टोळी चालवत असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा : मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या बाईक-टॅक्सीला भारतात अधिक व्यवहार्य करण्यासाठी काय करता येईल?

चंद्रशेखरन यांच्या हत्येचा राजकारणावर परिणाम

केरळमध्ये कट रचल्याच्या आरोपावरून सीपीएम नेत्यांना अटक केल्यामुळे गेल्या दशकात राज्यातील राजकीय हत्यांच्या संख्येत घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. चंद्रशेखरनची पत्नी के. के. रमा यांनी रिवोल्यूशनरी मार्क्सवादी पार्टी चालवण्याचे काम हाती घेतले. केरळमधील हिंसाचाराच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. रिवोल्यूशनरी मार्क्सवादी पार्टी कोझिकोड जिल्ह्यातील वडकारा क्षेत्रापुरूती मर्यादित होती. रमा यांनी काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफच्या पाठिंब्याने, २०२१ मध्ये वडकारा जागेवरून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, एलडीएफने पुन्हा कधीही ही जागा जिंकली नाही. मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी २०१४ मध्ये ही जागा राखली. २०१९ मध्ये यूडीएफचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे पुत्र के. मुरलीधरन यांनी या जागेवर विजय मिळवला.

Story img Loader