आपल्या शरीरासाठी झोप ही अन्न, पाण्याइतकीच महत्त्वाची आहे. झोप आपल्या एकूण आरोग्यासाठी चांगली असते. झोपेत शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. झोपेच्या कमतरतेचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. मात्र, सततच्या अपुर्या झोपेमुळे आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, मध्यम वयाच्या सुरुवातीच्या काळात झोपेची गुणवत्ता कमी असल्यास, त्याचा परिणाम नंतरच्या आयुष्यात आपल्या मेंदूवर दिसून येतो आणि मेंदू वेळेआधी वृद्ध होतो. नवीन अभ्यास नक्की काय सांगतो? अपूर्ण झोपेचा आपल्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? मेंदू वेळेआधी वृद्ध झाल्यास, त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभ्यास कशाबद्दल आहे?
अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वैद्यकीय जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सुरुवातीला ४० वर्षे वय असलेल्या ५८९ लोकांचा अभ्यास करण्यात आला. सहभागींनी झोपेच्या सहा वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करून, दिलेल्या प्रश्नावली पूर्ण केल्या. त्यात कमी झोपेचा कालावधी, झोपेची बिघडलेली गुणवत्ता, झोप न लागणे, झोप लागण्यात अडचण येणे, सकाळी लवकर जाग येणे आणि दिवसा झोप येणे या बाबींचा समावेश होता. पाच वर्षांनंतर त्यांनी तेच सर्वेक्षण पूर्ण केले. अभ्यास सुरू झाल्यानंतर १५ वर्षांनी संशोधकांनी सहभागींच्या मेंदूची तपासणी केली, जेथे मेंदूच्या संकोचनाची पातळी विशिष्ट वयाशी संबंधित असते. या स्कॅनने संशोधकांना मेंदूच्या संकुचिततेच्या आधारावर प्रत्येक सहभागीच्या मेंदूच्या वयाचा अंदाज लावण्यास मदत केली.
हेही वाचा : खलिस्तानींकडून कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना गटात सामील होण्याची धमकी? नेमके प्रकरण काय?
सहभागींना त्यांच्या झोपेच्या सवयींवर आधारित गटबद्ध केले गेले. कमी जोखीम गटातील लोकांना झोपेची एक किंवा कोणतीही समस्या नव्हती, मध्यम गटात दोन किंवा तीन आणि उच्च जोखीम गटात तीनपेक्षा जास्त समस्यांचा समावेश होता. स्कॅनने संशोधकांना मेंदूच्या संकुचिततेचे संकेत शोधून, प्रत्येक सहभागीच्या मेंदूचे वय निर्धारित करण्यात मदत केली, जे वृद्धत्वाचे सूचक आहे. सहभागींना ते कसे झोपले, त्यानुसार गटांमध्ये विभागले गेले. सुमारे ७० टक्के सहभागी सुरुवातीला कमी जोखीम गटात होते, २२ टक्के मध्यम जोखीम गटात होते व आठ टक्के उच्च जोखीम गटात होते.
अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत?
अभ्यासानुसार ४० वर्षे असताना ज्यांना झोपेत अडचणी यायच्या किंवा कमी झोप व्हायची त्यांच्यात वयाच्या ५० व्या वर्षी म्हणजेच मध्यम गटात मेंदूच्या वृद्धत्वाची लक्षणे दिसून आली. निष्कर्ष असे सूचित करतात की, मध्यम गटातील मेंदूचे सरासरी वय निम्न गटापेक्षा १.६ वर्षे अधिक होते, तर उच्च गटाचे सरासरी मेंदूचे वय २.६ वर्षे मोठे होते. “झोपेची बिघडलेली गुणवत्ता, झोप लागण्यात अडचण व सकाळी लवकर जाग येणे ही मेंदूच्या वाढीव वयाशी संबंधित कारणे होती. विशेषत: जेव्हा लोकांमध्ये सतत पाच वर्षांहून अधिक काळ झोपेची हीच अवस्था असेल तर,” असे अभ्यासात नमूद करण्यात आले. सहभागींनी त्यांच्या स्वतःच्या झोपेच्या समस्या नोंदवल्या. या अभ्यासात मेंदूचे आरोग्य बिघडणे आणि झोपेची कमतरता यांच्यातील उच्च संबंध दिसून आला; परंतु झोपेची कमतरता मेंदूचे वृद्धत्व वाढवते हे सिद्ध झाले नाही. “झोपेच्या समस्यांमुळे पुढील आयुष्यात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो, असे अभ्यासात दिसून आले आहे,” असे अभ्यासाचे प्रमुख लेखक, सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. क्लेमेन्स कॅव्हेलेस म्हणाले.
मेंदूचे वृद्धत्व जलद झाल्याने काय धोके उद्भवतात?
डॉ. शेल्बी हॅरिस यांनी सीबीएस न्यूजला सांगितले की, मेंदूचे वृद्धत्व हे संज्ञानात्मक घट, स्मृती समस्या व डिमेन्शियासह न्यूरोडीजनेरेटिव्हच्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहे. “मेंदू वेळेआधी वृद्ध झाल्यास, दैनंदिन कामकाजात आणि मानसिक आरोग्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात; ज्यामुळे एकूणच जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतो. सेंटारा आरएमएच मेडिकल सेंटरच्या स्लीप सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ. फौजिया सिद्दीकी यांनी सांगितले की, मेंदू वेळेआधी वृद्ध झाल्यास एकाग्रतेत अडथळा येणे, चिडचिड, रागाचे प्रमाण वाढणे यांसारख्या समस्या दिसून येतात. झोप सुधारल्याने ही लक्षणेदेखील सुधारतील,” असे त्यांनी सांगितले.
चांगली झोप शरीरासाठी किती फायद्याची?
न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका वेगळ्या अभ्यासानुसार, सक्रिय जीवनशैली राखणे, धूम्रपान सोडणे, संतुलित आहार घेणे व पुरेशी झोप घेणे या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात स्ट्रोक, स्मृतिभ्रंश व नैराश्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. हे संशोधन सूचित करते की, निरोगी श्रेणीमध्ये चार मेट्रिक्स राखणे आवश्यक आहेत; ज्यात शरीराचे वजन, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व रक्तातील साखर यांचा समावेश आहे. हे एकंदरीत मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे अमेरिकन संशोधकांनी सांगितले. अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटी व अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी यांचे सदस्य, अभ्यासाचे लेखक डॉ. सँटियागो क्लोचियाटी-तुओझो यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी मेंदूचे आरोग्य सर्वोपरि आहे, जे आपल्याला उच्च पातळीचे कार्य करण्यास सक्षम करते. “आमच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, मध्यम वयात निरोगी जीवनशैली आणि चांगली झोप यांचा अवलंब केल्यास मेंदूच्या आरोग्यावर नंतरच्या आयुष्यात अर्थपूर्ण परिणाम होऊ शकेल.”
झोपेची गुणवत्ता कशी सुधारावी?
तुमची झोप सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या झोपेला प्राधान्य देणे. त्यामध्ये पुरेशी झोप घेणे, झोपेसाठी योग्य वातावरण असणे, झोपेच्या आधीच्या क्रियाकलापांना टाळणे जसे की, अंथरुणावर टीव्ही किंवा फोन पाहणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे समाविष्ट आहे. “चांगली झोप यावी यासाठी श्वासोच्छ्वासाची तंत्रे, ध्यान, प्रार्थना व विश्रांती यांसारख्या गोष्टींचा आपल्या आयुष्यात समावेश करणे आवश्यक आहे,” असा सल्ला डॉ. फौजिया सिद्दीकी यांनी दिला.
हेही वाचा : इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल म्हणून कसे वापरत आहे? काय आहे ‘मॉस्किटो प्रोटोकॉल’?
झोप सुधारण्यासाठी ज्या बाबीही साह्यभूत ठरू शकतील त्या खालीलप्रमाणे :
- तुमच्या झोपेच्या खोलीत गडद, शांत व थंड वातावरण तयार करा.
- प्रौढांना रात्री किमान सात तासांची झोप आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन सातत्यपूर्ण झोपेचे वेळापत्रक पाळा. हे वेळापत्रक तुमच्या मेंदूला झोपण्याची वेळ कधी आणि उठण्याची वेळ कधी, हे ओळखण्यासाठी प्रशिक्षण देण्यात मदत करते.
- योग्य रीत्या झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करा.
- कॅफिन आणि अल्कोहोलचे मर्यादित सेवन करा.