Prajwal Revanna Sex Scandal शुक्रवारी (३१ मे) विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणातील आरोपी हासन खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला ताब्यात घेऊन, विशेष न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करणारे विशेष तपास पथक त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेण्याची शक्यता आहे; ज्यामध्ये पौरुषत्व चाचणीचाही (पोटेन्सी टेस्ट) समावेश आहे. पौरुषत्व चाचणी म्हणजे काय? लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये या चाचणीची आवश्यकता का आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

पौरुषत्व चाचणी म्हणजे काय?

लैंगिक क्षमता सिद्ध करण्यासाठी किंवा पौरुषत्व क्षमता शाबूत आहे की नाही हे पाहण्यासाठी पौरुषत्व चाचणी (पोटेन्सी टेस्ट) केली जाते. लैंगिक अत्याचार, घटस्फोट व पितृत्व अशा प्रकरणांमध्ये या चाचणीचा अहवाल वैद्यकीय पुरावा म्हणून सादर केला जातो. अनेकदा आरोपी न्यायालयात आपली बाजू मांडताना आपल्यात लैंगिक ताठरता नसल्याचा दावा करू शकतात. त्यामुळे पोलिसांकडून ही चाचणी आधीच केली जाते. यूरोलॉजिस्ट ही चाचणी करतात.

Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

हेही वाचा : Exit Poll: ‘एक्झिट पोल’ म्हणजे काय? निकालाचा अंदाज कसा लावला जातो?

फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी)च्या कलम ५३ नुसार, अशा गुन्ह्यांमध्ये डीएनए चाचणीसह आधुनिक आणि वैज्ञानिक तंत्रांचा वापर करून रक्त, रक्ताचे डाग, वीर्य, ​​लैंगिक गुन्ह्यानंतरचे स्राव, थुंकी, घाम, केसांचे नमुने व नखे यांची तपासणी केली जाते. समोर आलेले प्रकरण लक्षात घेऊन, नोंदणीकृत वैद्यकीय कर्मचारी कोणत्या चाचण्या करायच्या ते सांगतात आणि मग त्यानुसार या चाचण्या केल्या जातात.

लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये ही चाचणी आवश्यक का?

आरोपी संभाव्य बचावासाठी आपल्यात लैंगिक सामर्थ्य नसल्याचा दावा करू शकतात. अशा वेळी पौरुषत्व चाचणीचा अहवाल सादर केला जातो. परंतु, पौरुषत्व अनेक शारीरिक आणि मानसिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे याकडे ठोस पुरावा म्हणून पाहिले जात नाही. न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून केवळ हे सिद्ध होते की, तपासाच्या वेळी आरोपीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती की निगेटिव्ह.

पौरुषत्व चाचणी ही ‘टू फिंगर टेस्ट’प्रमाणे आहे. लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेल्या महिलेला लैंगिक संबंधाची सवय होती किंवा नाही, हे निश्चित करण्यासाठी ‘टू फिंगर टेस्ट’ चाचणी केली जाते आणि महिलेचे कौमार्य तपासले जाते. ‘टू फिंगर टेस्ट’ला अनेकदा विरोध केला गेलाय; मात्र तरीही ही चाचणी एक प्रक्रिया म्हणून केली जाते. परंतु, या चाचणीच्या अहवालाकडेसुद्धा न्यायालय ठोस पुरावा म्हणून पाहत नाही. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात केवळ त्यातून सुरक्षित राहिलेल्या व्यक्तीचे विधानच ठोस पुरावा मानले जाते.

पौरुषत्व चाचणी आणि कायद्यात झालेले बदल

२०१३ पूर्वी सामर्थ्य चाचण्यांना काही प्रकारची प्रासंगिकता होती. मात्र, कायद्यातील बदलामुळे अनेक गोष्टी बदलल्या. २०१३ पूर्वी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३७५ मधील बलात्काराच्या व्याख्येत ‘पेनिट्रेट’ करणे गुन्हा मानले जाईल, असे दिले गेले होते. परंतु, २०१३ च्या फौजदारी कायद्यातील सुधारणांनंतर बलात्काराच्या व्याख्येची व्याप्ती वाढविण्यात आली. आता कायद्यानुसार, बलात्कारामध्ये केवळ ‘व्हजायनल पेनिट्रेशन’च नव्हे, तर इतर कुठल्याही प्रकारच्या पेनिट्रेशनचा कलम ३७५ व ३७६ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘या’ नवीन निर्णयामुळे आरोग्य विमाधारकांना मिळणार मोठा दिलासा; जाणून घ्या नियमांमध्ये झालेला बदल!

महिनाभरापूर्वी हे सेक्स टेप प्रकरण उघड झाले होते. प्रज्ज्वल रेवण्णा याच्या ड्रायव्हरने क्लिप असणारा पेन ड्राइव्ह पोलिसांना दिला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू करताच प्रज्ज्वल रेवण्णा विदेशात पसार झाला होता. तो जर्मनीत असल्याची माहितीही पुढे आली होती. त्याच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्याने एक व्हिडीओ शेअर करीत, आपण भारतात येऊन आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार भारतात दाखल होताच त्याला बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आले.